आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबात खलिस्तानी अतिरेक्यांचे वाढणे खूप गंभीर बाब आहे. पंजाब एक महत्त्वाचे सीमेवरील राज्य आहे. त्याची सीमा पाकिस्तान सीमेशी जुडली आहे आणि त्याला ती अस्थिर करायची आहे हे आपण जाणून आहोत. देश १९८० च्या दशकात भिंद्रनवालेचा उदय विसरू शकत नाही. त्यामुळेच सुवर्णमंदिरावर हल्ला झाला आणि इंदिरा गांधींची हत्या झाली. आता अमृतपाल सिंगचा वेगाने उदय होत आहे, जो उघडपणे भिंद्रनवालेला आपला आदर्श म्हणत आहे. भिंद्रनवालेच्या काळानंतर पंजाब हळूहळू सामान्य जीवनाकडे परतला हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे. आज खलिस्तानच्या मागणीवरून फुटीरतावादी आंदोलन पुन्हा उभे राहत आहे. असे का होत आहे? आपण भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती करतोय का, की यापेक्षाही वाईट-नव्या चुका करत आहोत? पहिली गोष्ट, आपण पाहतोय की, घृणास्पद राजकीय संगनमत आणि संधिसाधूपणाची पुनरावृत्ती होतेय. भिंद्रनवालेेंचा उदय होत असताना सत्तारूढ काँग्रेसमध्ये त्याचे प्रबळ समर्थक होते. खलिस्तानची मागणी दाबण्याऐवजी चालना देण्यात आली. योग्य वेळी होणारी अटक राजकीय अडचणी टाकून थांबवण्यात आली. आज हाच खेळ पुन्हा खेळला जात आहे. असा अंदाज वर्तवला जात आहे की, आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी देश व विदेश, दोन्हीत खलिस्तानी समर्थकांची मदत घेतली होती. अजनाला पोलिस ठाण्यावर अमृतपालच्या हल्ल्याच्या प्रकरणात राज्य सरकारची चुप्पी स्पष्ट जाहीर आहे की, त्यांना कठोर कारवाई नकोय. केंद्र सरकारही कोणतीही कारवाई करत नाही हे दुर्दैवी आहे, तर त्यांच्या एनआयएसारख्या यंत्रणा देशभरात आपल्या शक्तीचा वापर करत असतात. दुसरी गोष्ट, प्रशासकीय पातळीवर अयोग्यता व ढिलाईही आहे, ज्यात अकाली व काँग्रेस सरकार, दोन्हींनी सुधारण्याचे प्रयत्न केले नाहीत. पंजाब आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. करापासून होणाऱ्या त्याच्या उत्पन्नाचा जवळपास अर्धा हिस्सा कर्ज चुकवण्यात जातो. शेतकऱ्यांत मोठा असंतोष आहे. तिकडे ड्रग्ज आणि नशेची समस्याही नियंत्रणाबाहेर आहे. पंजाबात २०-२४ वर्षाचे ४५% तरुण बेरोजगार आहेत. नोकरी नसल्याने तरुण शीख, सहजपणे अतिरेकी राजकारणास बळी पडून त्याला चालना देणारे होऊ शकतात. तिसरी गोष्ट, पाकिस्तान सतत खलिस्तानी समर्थकांना चालना देत असतो. तो भारताबाहेर अनेक शीख उग्रवादी संघटनांना निधी देत आला आहे. पंजाबातही तो सीमेपलीकडून पैसे, शस्त्र, ड्रग्ज पाठवत असतो. आयएसआयची पहिल्यापासूनच पंजाबात फुटीरता वाढवण्यात रस आहे. असेच १९८० च्या दशकातही झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत हा धोका नष्ट करण्यासाठी आम्ही काय केले? आपल्या गुप्तचर यंत्रणांनी राज्यात खलिस्तान समर्थकांचे बळ वाढण्यावर लक्ष ठेवले नाही का? ते थांबवण्यासाठी कठोर कारवाई खूप आधी का नाही केली? अखेर ३० वर्षांचा अमृतपाल, जो काही काळ आधी दुबईत राहायचा आणि ज्याला दाढी-मिशीही नव्हती तो रात्रीतूनच भिंद्रनवालेंचा क्लोन होऊ शकत नाही आणि ना ‘वारिस पंजाब दे’सारख्या संघटनेचा मुख्य होऊ शकत. या मागे नक्कीच शक्तिशाली पाठबळ आहे, ज्यांनी या बदलासाठी त्याला तयार केले. सरकार पूर्णपणे अंधारात होते का? चाैथी आणि अखेरची गोष्ट, आपण गेल्या काही काळात राजकारण व धर्माची सांगड पाहिली आहे. हिंदू बहुसंख्याक राजकारणाला प्रोत्साहन देण्यात येते, ज्याला हिंदू राष्ट्राच्या मागणीचे प्रतीक मानले जाते, तर इतर धार्मिक समुदाय याविरोधात होण्यास किती वेळ लागेल? अमृतपालने जाहीरपणे एका मुलाखतीत विचारले होते की, हिंदू राष्ट्राची मागणी करणाऱ्यांवर का कारवाई केली जात नाही? भारतात अनेक धर्म व जातींसोबत, विविधता आधारित एक एकता आहे. तिला जबरदस्तीने समरस करण्याचे प्रयत्न आगीशी खेळण्यासारखे आहे. पंजाब शीखबहुल राज्य आहे. जम्मू-काश्मीर मुस्लिमबहुल, नागालँड, मिझोराम, मेघालय व अरुणाचल ख्रिश्चनबहुल राज्य आहेत. आपल्याला स्पर्धक धार्मिक श्रेष्ठतावादाद्वारे त्यात धार्मिक राष्ट्रवादाची आग पेटवायची आहे का? अनेक मजबूत प्रादेशिक ओळखीही आहेत, ज्यांना अशी विशेष हिंदू ओळखीचा भाग सांगण्यावरून धोका जाणवतो, जे मुख्यत्वे उत्तर भारतातून निघते. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
पवन के. वर्मा लेखक, माजी राज्यसभा खासदार pavankvarma1953@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.