आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Will The Yuan Coin Work Instead Of The US Dollar? | Article By Anshuman Tiewari

अर्थात्:अमेरिकन डॉलरऐवजी युआनचे नाणे चालेल?

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनने सप्टेंबरमध्येच आपल्या नवीन बोर्डावर पहिले प्यादे हलवले होते. उझबेकिस्तानमधील समरकंद येथे शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत चीन, इराण आणि रशियाने त्यांच्या चलनांचा व्यापार करण्यासाठी एका अद्वितीय त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली. अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देणारा हा पहिला सामूहिक पुढाकार होता. याचे मुख्य केंद्र चीनचे चलन म्हणजेच युआन आहे. नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ बीजिंगमध्ये असताना चीन आणि पाकिस्तानच्या केंद्रीय बँकांनी युआनमध्ये व्यापार आणि क्लिअरिंगसाठी करार केला. कर्ज आणि गुंतवणूक म्हणून पाकिस्तानला चीनचे युआन मिळत आहे. पाक सरकार याचा वापर रशियाकडून तेल आयात करण्यासाठी करेल. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शी जिनपिंग सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. चीन हा सौदी अरेबियाचा सर्वात मोठा ग्राहक आणि पुरवठादारही आहे. दोन्ही देशांनी युआनमध्ये तेल खरेदी आणि विक्री करण्याचे मान्य केले. त्यानंतर लगेचच जिनपिंग गल्फ को-ऑपरेशन कौन्सिलच्या बैठकीला उपस्थित राहिले, तिथे त्यांनी शांघाय पेट्रोलियम आणि गॅस एक्सचेंजमध्ये युआनमध्ये तेल व्यापार सुरू करण्याची घोषणा केली. डॉलरच्या तुल्यबळ कोण? : डॉलरला आव्हान देण्याची युआनची तयारी सात-आठ वर्षांपूर्वी सुरू झाली. मध्यवर्ती बँकेकडे युआनचा आंतरराष्ट्रीयीकरण विभाग आहे, त्याने चीनच्या हार्बिन बँक आणि रशियाच्या सेबर बँक यांच्याशी आर्थिक सहकार्य करार करून युआनचे आंतरराष्ट्रीयीकरण सुरू केले. या करारानंतर जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था म्हणजे रशिया आणि चीनमध्ये रुबल-युआन व्यापार सुरू झाला. या व्यापारासाठी हाँगकाँगमध्ये युआनसाठी क्लिअरिंग सेंटर उभारण्यात आले. २०१६ मध्ये आयएमएफने युआनचा एसडीआरमध्ये समावेश केला, तो विदेशी चलनांचा प्रीमियम क्लब आहे. यामध्ये अमेरिकन डॉलर, युरो, येन आणि पाउंड आधीच समाविष्ट आहेत. आयएमएफचे सदस्य चलन म्हणून एसडीआरचा वापर करतात. चीनच्या चलन व्यवस्थेच्या विश्वासार्हतेबद्दल सखोल प्रश्न निर्माण झाले आहेत, परंतु व्यापार शक्तीच्या बळावर एसडीआर बास्केटमध्ये चीनचा हिस्सा २०२२ अखेरपर्यंत ११ ंवरून १२.२८% ंपर्यंत वाढेल. कोविडदरम्यान जानेवारी २०२१ मध्ये चीनच्या मध्यवर्ती बँकेने ग्लोबल इंटरबँक मेसेजिंग प्लॅटफॉर्म स्विफ्टसोबत करार केला. ही बेल्जियन संस्था जगातील बँकांमधील माहितीची प्रणाली चालवते. यानंतर चीनमध्ये स्विफ्टचे डेटा सेंटर तयार करण्यात आले. डिजिटल युआनसाठी जागतिक योजना : यावर्षी जुलैत चीनने शांघाय, ग्वांगडोंग, शांक्सी, बीजिंग, झेजियांग, शेन्झेन, क्विंगदाओ व निंगबो येथे सेंट्रल बँक डिजिटल युआनवर केंद्रित पेमेंट सिस्टिमची चाचणी सुरू केली. ही सर्व शहरे साखर उद्योग आणि व्यापाराची केंद्रे आहेत. या प्रणालीमुळे विदेशी कंपन्यांना युआनमध्ये पैसे देणे आणि गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. ही अशा प्रकारची पहिली डिजिटल चलन क्लिअरिंग प्रणाली आहे. अलीकडेच बीजिंगने हाँगकाँग, थायलंड आणि अमिरातीसोबत डिजिटल चलन व्यवहारांच्या चाचण्या सुरू केल्या आहेत.

पुतीन यांनाही ते हवे होते : २०१४ मध्ये युक्रेनवर सुरुवातीच्या आक्रमणानंतर अमेरिकेने निर्बंध लादल्यानंतर रशियाने डाॅलरऐवजी रुबलमध्ये व्यापार वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि २०२० पर्यंत त्याच्या परकीय चलनाच्या साठ्यातील अमेरिकन डॉलरचा हिस्सा निम्मा करण्याचा प्रयत्न केला. जुलै २०२१ मध्ये रशियाच्या अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की, डॉलर-आधारित विदेशी कर्ज पूर्णपणे रद्द केले जाईल. तोपर्यंत हे कर्ज सुमारे १८५ अब्ज डॉलर होते. रशियाने २०१५ मध्ये मीर ही स्वतःची क्लिअरिंग सिस्टिम तयार केली. युरोपच्या स्विफ्टला प्रतिसाद म्हणून रशियाने आर्थिक संदेशांच्या हस्तांतरणासाठी प्रणाली तयार केली, त्यात जगातील २३ बँका जोडल्या गेल्या आहेत. तथापि, युद्ध व कठोर निर्बंधांमुळे रुबलची आर्थिक शक्ती नष्ट झाली. रशिया आता युआनच्या पकडीत आला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, रशियाच्या परकीय चलनाच्या साठ्यात युआनचा वाटा सुमारे १७ टक्के आहे. चीन सध्या रशियाचा सर्वात मोठा तेल-गॅस ग्राहक आणि समस्यानिवारक आहे.

युरोपियन कंपन्या निघून गेल्यानंतर चिनी कंपन्या रशियातील खनिज संपत्ती स्वस्त दरात विकत घेत आहेत. रशियाचे एकीकरण सुरू झाले आहे. भारत ही तिसरी अर्थव्यवस्था आहे, जी आपल्या चलनात म्हणजेच रुपयामध्ये व्यवसायाची भूमिका बनवत आहे. रशियावरील निर्बंधांमुळे भारतीय बँका अडचणीत आल्या आहेत. भारताची सर्वात मोठी आयात (तेल, गॅस, कोळसा, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने) ज्या देशांतून केली जाते, त्यांची देयके फक्त अमेरिकन डॉलरमध्ये दिली जातात. युआनची ताकद : युआन हे जागतिक चलन होण्याच्या अटी पूर्ण करत नाही. परंतु, ते अनेक देशांसाठी पर्यायी पेमेंटचे साधन बनत आहे. चीनकडे दोन मोठ्या शक्ती आहेत. एक म्हणजे सर्वात मोठी आयात-निर्यात आणि दुसरे म्हणजे गरीब देशांना कर्ज. यामुळे युआनचा दबदबा वाढला आहे. चीनच्या मध्यवर्ती बँकेच्या डेटावरून दिसून येते की, युआनमधील व्यापार पेमेंट वर्षाला १५ टक्क्यांनी वाढत आहे. २०२१ मध्ये युआनमधील गैर-आर्थिक व्यवहार सुमारे ३.९१ ट्रिलियन डाॅलरपर्यंत गेले आहेत. २०१७ पासून युआनमध्ये नामांकित बाँड्स हे ग्लोबल बाँड इंडेक्सचा भाग आहेत. शेअर्समधील गुंतवणुकीत युआनचा वाटा ६० टक्के आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

अंशुमान तिवारी मनी-९ चे संपादक anshuman.tiwari@tv9.com

बातम्या आणखी आहेत...