आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया वर्षापासून चीनमध्ये लोकसंख्या घटण्यास सुरुवात झाली आहे, तर पुढील वर्षी भारताची लोकसंख्या १४२.८६३ कोटी, म्हणजे चीनपेक्षा ३० लाख अधिक होईल. पण, या आकडेवारीवरून काही चिंता निर्माण होतात. चीनमधील लोकसंख्या घटण्याचे मुख्य कारण म्हणजे महिलांच्या जननक्षमतेमध्ये एका कालखंडात झालेली तीव्र घट, त्यामुळे आज चीनची तरुणाई अचानक कमी झाली आहे. चीनमध्ये १९८७ मध्ये २०-५९ वर्षे वयोगटातील लोकांची टक्केवारी ५० होती, ती २०११ मध्ये ६१.५ पर्यंत वाढली. चीनने सांख्यिकीय फायद्यातून प्रचंड प्रगती केली तोच हा काळ होता. आता ते चक्र उलटणार आहे. भारतासाठी ही एक चांगली संधी आहे, कारण त्याचा सांख्यिकीय लाभांश घेण्याचा कालावधी २०१८ पासून सुरू झाला आहे, तो पुढील १७ वर्षे चालेल. पण, इथे प्रश्न असा आहे की, अधिक संख्येने तरुणांच्या उपस्थितीनेच फायदा होणार नाही. गर्भापासून बालकांना उत्तम पोषण आहार आणि १८ वर्षे वयापर्यंत उत्तम शिक्षण व सुविधा देणे ही राज्याची पहिली जबाबदारी असेल. मग हेही पाहावे लागेल की, शिक्षणाची दिशा काय आहे? आतापर्यंत चार वर्षांचा सांख्यिकीय लाभांश व्यर्थ गेला आहे. बालकांचे कुपोषण ही अजूनही मोठी समस्या आहे. चीनच्या या दुबळेपणाचा फायदा घ्यायचा असेल तर भारतातील सरकार आणि समाजाला दूरदृष्टी ठेवावी लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.