आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:आपल्या छोट्याशा मदतीद्वारे एखादा ‘तारा’ चमकू लागतो

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘तेव्हा ते माझा मित्र नव्हते, पण मी आणि माझे कुटुंब वाईट टप्प्यातून जात होतो, तेव्हा त्यांनी आम्हाला फोन करून आम्हाला मदत हवी आहे का, असे विचारले. मी भावूक झाले. त्यांनी मला एक मोठी सायनिंग अमाउंट दिली आणि नंतर ती परत घेण्यास नकार दिला. त्यामुळे मी त्यांचा चित्रपट करत आहे का, या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी आमचा चित्रपट बनणार आहे हेच आहे.’ रोहित शेट्टीचा चित्रपट करत असल्याच्या अफवांवर एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता फराह खानने एका मुलाखतीत हे सांगितले. दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक, प्रोड्यूसर फराह त्यांच्या २०१४ च्या हॅपी न्यू इयर चित्रपटापासून अनेकदा रिअॅलिटी शोमध्ये दिसल्या. त्या जाहिरात चित्रपट बनवतात. तर, १९७४ मध्ये जन्मलेले रोहित शेट्टी हा चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे, पण कोणी याबद्दल सांगितल्यावरच त्यांच्यातील हा मानवी पैलू समोर येतो.

यावरून मला अशा लोकांची आठवण येते. अशीच एक व्यक्ती म्हणजे पोलिस सार्जंट प्रकाश घोष. फेब्रुवारी २०२१ मध्ये कोलकात्यातील गरियाघाट रोडवर ड्यूटीवर असताना ते फूटपाथवर राहणाऱ्या एका मायलेकाशी बोलले. महिलेची पती निवर्तला होता आणि ती खानावळीत काम करत होती. तिने सांगितले की, तिला मुलाच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येत नसल्याने त्याला शाळा सोडायची होती. त्यानंतर प्रकाश यांनी त्याची जबाबदारी घेतली. पहाटे, दुपारी आणि सार्वजनिक सुटीच्या वेळी रहदारी कमी असते तेव्हा त्यांनी महिलेचा मुलगा आकाश राऊत याला शिकवायला सुरुवात केली. कोविडमुळे गेली दोन वर्षे क्लास नसल्याने आकाश जवळपास सर्व काही विसरला होता. त्यामुळे प्रकाशने सुरुवातीपासूनच संख्या आणि मुळाक्षरे शिकवायला सुरुवात केली. ते आकाशला गृहपाठ द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी तपासायचे. आकाशने शाळा सोडली नाही. गेल्या महिन्यात त्याला कोलकात्यातील एका मोठ्या मीडिया हाऊसने शिष्यवृत्ती दिली. अशाच प्रकारे सतना (म.प्र.) येथील सोनिया जॉली ११० मुलींना मदत करणार आहेत. यापूर्वी सोनिया यांनी अनेकांना दहा हजार रुपये देऊन अल्प भांडवलात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत केली. हळूहळू त्यांच्या लक्षात आले की, अनेक झोपडपट्टीवासीयांना शिक्षणाची गरज आहे आणि त्यांनी सतना येथील आर्थिकदृष्ट्या मागास मुलांना मदत करण्यास सुरुवात केली. आज त्यांच्याकडे पहिली ते पदवीपर्यंतच्या ११० मुली आहेत. त्या सकाळी ७ वाजता सोनियांच्या घरी येतात आणि नाष्टा करून शाळा-कॉलेजला जातात. आज १२ शिक्षक सोनियांच्या ‘उपकार’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘उपकार हम हैं सोसायटी’शी संबंधित आहेत. ते शिक्षण व्यवस्थेतील पोकळी भरून काढतात आणि मुलींना गृहपाठात मदत करतात. अनेक महाविद्यालये-शाळा या मुलींना मोफत प्रवेश देतात, श्रीमंत लोक कपडे दान करतात. पितृपक्षात आणि नंतर नवरात्रीत अनेकांनी या ११० ‘कन्यांना’ खाऊ घालण्याचा संकल्प केला आहे.

फंडा असा ः आपण एकटे किंवा एकत्र कुणाकडे मदतीचा हात पुढे करतो, तेव्हा फक्त एक ‘तारा’ चमकायला तयार नसतो, तर आपले हृदयही आनंदाने चमकते. तेव्हा आपण म्हणू शकतो, ‘अरे, मी या ताऱ्याला .... असल्यापासून ओळखतो.’

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...