आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:अन्नाच्या शुद्धतेवर मेहनत घ्या

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अन्न ही मनुष्याची शांतता संबंधित असलेल्या गोष्टींमध्ये प्रमुख आहे. पूर्वीच्या काळी जेवण अगदी साधे होते. अन्न किती ताजे आणि किती उपयोगी आहे हे बघून कळू शकत होते. पण, आज पॅकिंगच्या जमान्यात अन्नामागे वेगळे असते आणि सांगितले वेगळेच जाते. हा अन्नदात्यांचा देश आहे. या देशात शेतकरी हा प्रमुख असलाच पाहिजे, कारण तो आपल्याला अन्न देतो आणि त्या अन्नाचा आपल्या धार्मिक आचरणावर परिणाम होतो. पण, अन्नदात्याच्याही बाबतीत दिसते वेगळे आणि घडते काही वेगळेच. दर ३७ मिनिटांनी एक शेतकरी आत्महत्या करतो. हा आकडा अविश्वसनीय आहे, पण चुकीचा नाही. शेतकरीही राजकारणाचे प्यादे झाला आणि त्यामुळे अन्न हा लोकांच्या चवीचा व आस्वादाचा विषयच राहिला. ज्यांना आपले आचरण शुद्ध करायचे आहे त्यांनी अन्नाच्या शुद्धतेवर मेहनत घ्यावी आणि जसे दिसते तसे अन्न नसेल हे दृश्य टाळावे. अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक घास पोटात जाऊ द्या, अन्यथा बाहेरील अपचनासारखी स्थिती आपल्या पोटातही होईल.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...