आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:अंतर्ज्योतीवर काम करा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बरोबर काय हे आपण ओळखू शकत नाही तेव्हा आपण डोळस असूनही अंध आहोत. आपण निराश असताना ध्येय कधीच साध्य होणार नाही, कधीच यशस्वी होणार नाही, असे मानतो तेव्हाही आपण अंधच असतो. ज्यांनी दृष्टी गमावली, पण प्रज्ञाचक्षूंनी कुठे पोहोचले अशांकडून शिकावे. साडेपाचशे वर्षांपूर्वीचे सूरदासांचे साहित्य आपल्याला आश्वस्त करत आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी शेक्सपिअरनंतर प्रतिष्ठा मिळवणारे इंग्रज साहित्यिक जॉन मिल्टन यांनी ‘पॅराडाइज लॉस्ट’ नावाचे महाकाव्य लिहिले व त्यानंतरही दोन अद्भुत साहित्य लिहिले. तथापि, जॉन मिल्टन यांनी आपली दृष्टी गमावली होती. एका नेत्रहीनाने अनेकांचे डोळे उघडले. जुनी गोष्ट मान्य करूनही विश्वास बसत नसेल तर आज आपण जगद्गुरू रामभद्राचार्यजींचे स्मरण करू शकतो. ते तर प्रज्ञाचक्षूचे जिवंत उदाहरण आहेत. या सर्वांनी एक गोष्ट चांगल्या रीतीने समजून घेतली होती की, बाह्य दृष्टी गेल्यास मनातील ज्योत खूप कामी येते. आपल्याकडे तर अजूनही संधी आहे. आपण अंतर्ज्योतीवर काम केले तर आपली बाह्यदृष्टी अत्यंत चांगले मार्गदर्शन करू शकेल. या लोकांकडे तर अभाव होता. आपल्याकडे सुविधा आहेत. तरीही आपण चुकलो तर याला विचारांचा आंधळेपणा म्हणता येईल.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com

बातम्या आणखी आहेत...