आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेक अपडेट:ऑनलाइन काम : डिजिटल सुरक्षेचे भान

टीम मधुरिमा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल अनेक लोक फ्री लान्सर म्हणून काम करतात. यापैकी काही जण विशिष्ट कंपन्यांसोबत करार तत्त्वावर कार्यरत असतात, तर काहींना दररोज वेगवेगळ्या क्लायंटसोबत काम करावे लागते. फ्री लान्सर्सना त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे विविध प्रकारच्या फाइल्स डाऊनलोड कराव्या लागतात किंवा लिंक ओपन कराव्या लागतात. अशा वेळी अमुक एखादी लिंक किंवा फाइल सुरक्षित आहे, असे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे या ऑनलाइन कामामध्ये डिजिटल सुरक्षेबद्दल सतर्कता बाळगलेली केव्हाही चांगली...

अँटिव्हायरस सॉफ्टवेअर डाऊनलोड करा प्रत्येक वेबसाइट, ई-मेल इ. सुरक्षित असेल याची शाश्वती नसते. चुकीची फाइल डाऊनलोड झाल्यास, चुकीची लिंक ओपन झाल्यास सायबर अटॅकचा धोका संभवतो. हे टाळण्यासाठी लॅपटॉपमध्ये चांगल्या प्रतीचे अँटिव्हायरस डाऊनलोड करा. अँटिव्हायरस सॉफ्टवेअरमध्ये फायरवॉल टूलची सुविधा असते. त्यामुळे व्हायरसपासून संगणक आणि डिव्हाइसचा अॅक्सेस सुरक्षित राहण्यासही मदत होते.

सार्वजनिक ठिकाणचं मोफत वायफाय नकोच आजकाल सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफायचं अामीष दाखवलं जातं. माणसांचा वावर अधिक असणाऱ्या ठिकाणी हमखास वायफाय मोफत असते. यामुळे लॅपटॉपमध्ये, संगणकामध्ये व्हायरस शिरण्याचीच शक्यता अधिक. अशा प्रकारच्या मोफत सुविधेचं अामीष दाखवून हॅकर्स लोकांच्या फोनमधील, संगणकामधील माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मोफत वायफाय सुविधा घेऊ नका.

कुठलाही मेल ओपन करताना सावध राहा मेल आणि मेसेजच्या माध्यमातून हॅकर्स सिस्टिम आणि फोन हॅक करू शकतात. त्यामुळेच नवीन मेल किंवा मेेसेज ओपन करतेवेळी सतर्क राहा. कुठल्याही अनोळखी मेल, मेसेजला रिप्लाय करणे टाळा. अनोळखी लिंकला क्लिक करणे टाळा. अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी दैनंदिन ओळखीतल्या नावांचाच वापर केला जातो, हे आवर्जून लक्षात ठेवा. त्यामुळे मिळत्याजुळत्या नावांच्या मेल आणि मेसेजपासून सावध राहा.

मेल आयडी, फोन नंबर लिंक नका करू फ्री लान्सिंग करणाऱ्यांचं बहुतांश काम मेल, लिंक याद्वारेच होत असते. अनेक वेबसाइट लॉगइन केल्यानंतरच ओपन होतात. त्या मेलद्वारेच ओपन कराव्या लागतात. मात्र, ही पद्धत चुकीची आहे. केवळ आणि केवळ विश्वसनीय वेबसाइटच ओपन करा. मात्र, त्या ई-मेलसोबत लिंक करू नका. साइन इन करण्यासाठी बँक खात्याशी जोडलेला मेल आयडी आणि फोन नंबर अजिबात वापरू नका.