आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराट्रू-कॉलर अॅपची जगात सर्वाधिक चर्चा भारतात होते. याचे कारण म्हणजे बाजारपेठ. त्याचे सर्वाधिक वापरकर्ते, सर्वाधिक महसूल आणि सर्वात जास्त कर्मचारी भारतीय आहेत. ट्रू-काॅलरच्या अहवालानुसार, स्पॅम कॉलमुळे त्रस्त टॉप-५ देशांमध्ये भारताचा समावेश होतो. अलीकडेच कंपनीने भारतीय वापरकर्त्यांसाठी ‘गव्हर्नमेंट सर्व्हिसेस’ नावाचे फीचर दिले आहे. या अंतर्गत लोक अॅपवर केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांचे विविध विभाग आणि आपत्कालीन क्रमांक शोधू शकतात. तथापि, कंपनीवर नेहमीच गोपनीयतेत दखल व त्याचे उल्लंघन करण्याचा आणि लोकांची ओळख उघड केल्याचा आरोप होत आला आहे. फक्त दहा वर्षांपूर्वीची स्वीडिश कंपनी जगातील सर्वात मोठे कॉलर आयडी अॅप कशी बनली, याबाबत वाचूया या आठवड्याच्या ब्रँड स्टोरीमध्ये.
मॉडेल : ४ प्रकारे तयार होतो डेटाबेस ट्रू-काॅलर जाहिरातींमधून सर्वाधिक (७०%) कमाई करते, त्यानंतर सदस्यत्व (१६.३%) आणि १४% इतर स्रोतांकडून मिळवते. ट्रू-काॅलरच्या डेटाबेसचे चार मुख्य स्रोत आहेत. पहिला अॅप्लिकेशन डाऊनलोडिंग, दुसरा अनेक देशांत अजूनही डिरेक्टरी आहेत, त्यांना यामधूनही माहिती मिळते, तिसरा कंपनीने सार्वजनिकरीत्या नंबर दाखवणाऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमांशी टाय-अप केले आहे आणि चौथा स्रोत आहे एपीआय आणि एसडीके. वेगवेगळ्या संगणक प्रोग्राम्सना एकमेकांशी संपर्काचा हा एक मार्ग आहे.
बाजार : उत्पन्न भारतातून, स्वीडनमध्ये जास्त कर ट्रू-कॉलर भारतात अधिकृतपणे येण्यापूर्वीच भारतातील लोकांनी २०१२ मध्ये डाऊनलोड करणे सुरू केले. तोपर्यंत जगात फक्त १० लाख डाऊनलोड झाले होते. कंपनीच्या एप्रिल-जून २०२२ च्या तिमाही निकालांनुसार, भारतात दैनिक सक्रिय वापरकर्त्यांची संख्या १४% ने वाढून १९.४ कोटी झाली आहे. त्याच वेळी एकूण वापरकर्ते २२ कोटींहून अधिक आहेत. कंपनीच्या विक्रीतही १३०% वाढ झाली आहे. ट्रू-काॅलर भारतातून सर्वाधिक महसूल कमावत आहे, परंतु कर भरण्यात ते मागे असल्याचा आरोप आहे. नॅसडॅक साटॅकहोमकडे दाखल माहितीनुसार ट्रू-काॅलरचा गेल्या वर्षीचा महसूल सुमारे ८३० कोटी रु. होता. यामध्ये भारताचा महसूल ५७८ कोटी रु. आहे. म्हणजे एकूण कमाईच्या ७०%. तथापि, भारतातील आर्थिक विवरणानुसार, आर्थिक वर्ष २०२१ मध्ये महसूल १५८ कोटी दाखवला गेला. व्हाइसरॉय या अमेरिकन रिसर्च ग्रुपने अहवालात म्हटले आहे की, ट्रू-काॅलर भारतातून सर्वाधिक कमाई करत आहे, परंतु स्वीडनमध्ये सर्वात जास्त कर भरते.
सुरुवात : ३ स्टार्टअप अपयशी, मग अॅप निर्मिती ट्रू कॉलर २००९ मध्ये स्टॉकहोम, स्वीडन येथे सुरू झाले. इंजिनिअरिंग करणाऱ्या अॅलेन ममेडी व नामी झारीघलम यांनी दोन स्टार्टअप्सवर काम केले होते. यात त्यांना यश आले नाही. त्यांनी तिसरे स्टार्टअप म्हणून कर्मचारी पुनरावलोकन वेबसाइट तयार केली, परंतु त्यानंतर त्यांना अनोळखी नंबरवरून कॉल येऊ लागले, ते अनोळखी नंबर ओळखण्यासाठी त्यांना कॉलर आयडी अॅप बनवण्याची कल्पना सुचली. सुरुवातीला ते फक्त ब्लॅकबेरीसाठी बनवले होते. २०१२ पर्यंत त्यांचे अॅप १० लाख डाऊनलोड झाले होते आणि कंपनीचे एकूण १५ कर्मचारी होते. परंतु ते महसुलाचे मॉडेल बनवू शकले नाहीत. पण, त्यांचे वापरकर्ते मध्य पूर्व देश आणि भारतात वाढत होते. यानंतर ममेडी आणि नामी यांनी ट्रू-सॉफ्टवेअर स्कँडिनेव्हिया नावाची कंपनी स्थापन केली आणि मार्केटिंग सुरू केले. ट्रू-काॅलरने ८ ऑक्टोबर २०२१ रोजी नॅसडॅक स्टाॅकहोमवर आयपीओ आणला. आज जगातील सुमारे ३० कोटी लोक ट्रू-काॅलर अॅप वापरतात.
वाददेखील : युरोप आणि उर्वरित जगासाठी वेगवेगळी गोपनीयता धोरणे ट्रू-कॉलर सुरुवातीपासूनच गोपनीयतेचे उल्लंघन केल्याच्या आरोपांना सामोरे जात आहे. युजर्सचे फोनबुक्स सर्व्हरवर अपलोड केल्याबद्दल ट्रू-काॅलरवर टीका होत आहे. कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने भारतातील एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, संमती देणाऱ्यांपेक्षा आपलेे फोन नंबर ओळखण्यासाठी संमती न देणारे अधिक आहेत, परंतु त्यांना ट्रू-काॅलरमध्ये जोडले आहे. ट्रू-काॅलरच्या कॉलर आयडीव्यतिरिक्त इतर फंक्शन्स वापरायचे असल्यास तुम्हाला काँटॅक्ट लिस्टची परवानगी द्यावी लागेल. भारतात डेटा संरक्षणाबाबत ठोस कायदा नसल्याचा फायदा कंपनीने घेतल्याचे आरोप झाले आहेत. ट्रू-काॅलरच्या गोपनीयता धोरणातदेखील फरक आहे, युरोपियन देशांमध्ये वेगळे धोरण आहे आणि उर्वरित जगासाठी वेगळे आहे. गेल्या वर्षी ट्रू-कॉलरविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. पुढे ती सर्वोच्च न्यायालयात गेली. मात्र, यंदा सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली.
ट्रू-काॅलरचे सहसंस्थापक नामी झारीघलम (डावीकडे) व अॅलेन ममेडी.अॅलेन मुख्य कार्यकारी अधिकारी, तर नामी चीफ सेल्स आॅफिसर आहेत. नामी मूळचे इराणी असून वयाच्या तिसऱ्या वर्षी कुटुंबासह स्वीडनला गेले होते. तर अॅलेन यांचा जन्म स्वीडनमधील निर्वासित छावणीत झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.