आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग दिन विशेष:येता-जाता करा या पाच योग क्रिया

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधी-कधी व्यग्रतेमुळे व्यायाम किंवा योगा करण्यासाठी वेळ मिळत नाही. घर किंवा ऑफिसमध्ये कुठेही करता येतील अशा काही छोट्या क्रिया येथे सांगत आहोत. व्यग्र दिनचर्येतही या क्रिया तुम्हाला थकू देणार नाहीत...

१. भिंतीपासून थोडे दूर उभे राहा. आपले हात भिंतीवर ठेवा. वाकून शरीर जमिनीला समांतर आणा. छाती जमिनीच्या दिशेने ढकला. २. भिंतीकडे हात ठेवून उभे राहा, हात समोरून मागे न्या, तळहात भिंतीवर टेकवून ठेवा. ३. भिंतीकडे तोंड करून उभे राहा. आपले हात भिंतीवर ठेवा आणि हळूहळू छाती भिंतीच्या दिशेने दाबा आणि मूळ स्थितीत परत या. असे काही वेळा पुन्हा करा. ४. दरवाजाच्या बाजूच्या पॅनेलवर आपले हात ठेवा आणि छाती पुढे ढकलून पूर्वीच्या स्थितीत या. काही वेळा पुन्हा करा. ५. खुर्चीवर बसून आपला उजवा पाय पुढे पसरवा, दोन्ही हातांनी पायाचे बोट पकडा. पुढे पाहा आणि खाली जाताना वाकू नका. दुसऱ्या पायाने पुन्हा असेच करा. हात विरुद्ध गुडघ्यावर ठेवा आणि मागे पाहण्यासाठी हात मागे खेचत वाकवा.

बातम्या आणखी आहेत...