आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग दिन विशेष:योगाची 8 अंगे आणि त्यांचा अर्थ

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मन, बुद्धी व कर्माला जागृत करून बळकट करण्याचे माध्यम म्हणजे अष्टांग योग

साधारणपणे लोकांमध्ये राग, द्वेष, अहंकार, भय व अविद्या या पाच प्रकारच्या उणिवा असतात. राग म्हणजे एखाद्याशी घट्ट जवळीक. द्वेष म्हणजे एखाद्याला नापसंत करणे, त्याच्याबद्दल वाईट विचार करणे. अहंकारात आदराची भूक असते, तर भीती अज्ञाताची चिंता देते. अविद्या म्हणजे अज्ञान, कार्यक्षमतेचा अभाव. या उणिवांवर मात करण्यासाठी, शिस्त आवश्यक आहे, ती योगाच्या आठ अंगांमधून येते (१) यम, (२) नियम, (३) आसन, (४) प्राणायाम, (५) प्रत्याहार, (६) धारणा, (७) ध्यान, (८) समाधी. कसे ते जाणून घेऊया -

यम आणि नियम : वर्तनाला शिस्त लावतात
यम व नियम ही योगाची पहिली दोन अंगे माणसाला नैतिकदृष्ट्या शिस्त लावतात. ती व्यक्तीच्या वर्तनाला शिस्त लावतात. यम म्हणजे अहिंसा, सत्य, चोरी न करणे, ब्रह्मचर्य आणि गरजेपेक्षा अधिक दान न घेणे यांचे पालन करणे. नियमाचा अर्थ म्हणजे शौच, तृप्ती, तपस्या, स्वाध्याय आणि ईश्वर-प्रणिधान (कर्माचे फळ देवाला अर्पण करणे) यांचे पालन करणे.
उद्देश - मन विचलित करणाऱ्या इच्छांवर नियंत्रण.

आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार : शरीराला शिस्त लावतात
आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार ही योगाची तीन अंगे व्यक्तीला शारीरिक शिस्त लावतात. पतंजलींच्या मते, योगसाधनेसाठी आरामात बसण्याचा पद्धत आसन ही आहे, तर हठयोगात त्याचा सविस्तर अर्थ घेतला आहे. त्यामध्ये शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक आसने आहेत. प्राणायाम म्हणजे प्राणवायू नियंत्रित करणे आणि प्रत्याहार म्हणजे इच्छांवर नियंत्रण ठेवणे.
उद्देश - मन आणि शरीर स्थिर व निरोगी बनवणे.

धारणा, ध्यान आणि समाधी :मनाला शिस्त लावतात
धारणा, ध्यान आणि समाधी यांचा संबंध मानसिक शिस्तीशी आहे. धारणा म्हणजे नाभिचक्र, हृदयाचे कमळ, नाकाचे टोक किंवा जिभेच्या पुढील भागावर मन स्थिर करणे. ध्यान म्हणजे मन पूर्णपणे एकाग्र करणे. ध्यानात स्व, केंद्रबिंदू आणि ध्यानाचा अनुभव कायम राहतो, तर समाधीमध्ये हा अनुभवही संपतो.

उद्देश - मानसिक शिस्त लावणे हा याचा उद्देश आहे.

बातम्या आणखी आहेत...