आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:सहलींसाठी तुमच्याकडे ‘रघू’ नाही!

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एस. रघू असे त्याचे नाव आहे. भारताच्या बहुतांश क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात आले असेल की, बुधवारी अॅडलेडमध्ये झालेल्या भारत-बांगलादेश टी-२० सामन्यात दर दोन-तीन मिनिटांनी कॅमेरा त्याच्यावर फोकस करत होता. हातात मोठा ब्रश घेऊन तो सीमारेषेच्या बाहेर धावत होता, जणू जॉगिंग करत होता. ज्यांनी त्याला पाहिले नाही त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, तो भारतीय संघाचा थ्रो डाउन स्पेशालिस्ट आहे! संघालाच नाही, तर रघूलाही माहीत होते की, संघ जराही घसरला तर गुणतालिकेचे गणित बिघडेल. तो धावत नव्हता, तर खेळाडूंच्या बूट स्वच्छ ठेवण्याच्या एकमेव उद्देशाने तो ब्रश घेऊन मैदानात गस्त घालत होता. सामन्याच्या काही मिनिटे आधी पाऊस पडत असल्याने ओल्या मैदानात चिखल बुटांच्या स्पाइक्समध्ये अडकू शकत होता, त्यामुळे खेळाडूंना धावण्यास अडचण येऊ शकत होती आणि झेल पकडताना ते घसरण्याचीही शक्यता होती. तुम्हाला आठवत असेल, या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले, मग तो झेल असो किंवा स्टंपवर बाॅल फेकणे असो. खेळाडूंनी चेंडू झटपट यष्टिरक्षकाकडे फेकून अनेक धावा वाचवल्या. आता मला वाटचे कदाचित तुम्ही म्हणत असाल, ‘ठीक आहे, आम्हाला रघू आणि त्या टी-२० मध्ये त्याचे महत्त्व समजले, पण त्याचा आमच्या आगामी सहलीशी काय संबंध?’ थांबा, मी तुम्हाला एकेक पाऊल टाकत तिथे घेऊन जातो. नुकत्याच जाहीर झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या डेटानुसार, कर्ज महागल्याने बेफिकीर किरकोळ कर्ज सप्टेंबरमध्ये २०% वाढले, कोविडच्या उद्रेकानंतरची ही सर्वाधिक वाढ आहे. ग्राहकांच्या मागणी पुन्हा वेगाने वाढण्याचे हे स्पष्ट लक्षण आहे. सर्व क्षेत्रांमध्ये कर्जाची मागणी कायम असताना उपविभागांतील वाढीमुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ कर्ज ३७ लाख कोटींहून अधिक होते. तुम्ही विचार करत असाल की, आधी क्रिकेट आणि आता हा कर्जाचा डेटा! हे काय आहे? पुढे वाचावे, ही विनंती. २२ नोव्हेंबरपासून लग्नाचा हंगाम सुरू होत आहे, हे उघड आहे. या वर्षी रात्रीचा कर्फ्यू किंवा उत्सवांत लोकांची मर्यादा इ. कोविडशी संबंधित कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे यंदा लग्नांची संख्या वाढली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गेल्या दोन वर्षांची कसर काढली जाईल. कोविडमुळे जे समारंभ करू शकले नाहीत, तेही आता नियोजन करत आहेत. भारत या हंगामात लाखो विवाह सोहळ्यांचा साक्षीदार होण्यासाठी सज्ज आहे.

विशेष म्हणजे माझ्या घरीही लग्न आहे व सर्व आमंत्रितांनी येण्याचे मान्य केले आहे. ते अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून लग्नाला येतील, कारण त्यांची गेल्या दोन वर्षांत कुटुंबाशी भेट झालेली नाही. सर्वांना एकाच ठिकाणी भेटण्याची ही त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, ते समजून घ्याल, अशी आशा आहे. लग्नाचा हंगामानंतर ख्रिसमस, त्यानंतर नवीन वर्षाच्या सुट्या आणि कर्ज घेतलेले असले तरी लोक प्रवासाला तयार आहेत. रेल्वे, एअरलाइन्स, हॉटेल्स नफ्यासाठी एकाच वेळी अनेक बुकिंग घेत आहेत. यंत्रणेतील बिघाड, हवामानातील बदल किंवा तांत्रिक वा यांत्रिक बिघाडामुळे परिवहन विभागाकडून काही सहली रद्द होण्याची शक्यता आहे. म्हणूनच मी म्हणत होतो की, आपल्या सहली यशस्वी करण्यासाठी तुमच्याकडे असा एखादा ‘रघू’ असेलच असे नाही.

{ फंडा असा ः नवीन वर्षापर्यंत या दोन महिन्यांत प्रवासाला जाणार असाल तर आपला प्रवास पूर्णपणे सुरक्षित करा, कारण शेवटच्या क्षणी मदत (रघूप्रमाणे) मिळणे कठीण होऊ शकते.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...