आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:स्वतःवर सर्वाधिक विश्वास हवा

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संघर्षाशिवाय काहीही साध्य होणार नाही. बाहेरच्या जगात प्रत्येक पाऊल निखाऱ्यांवर टाकावे लागेल की काय, अशी कार्यपद्धती झाली आहे. येत्या तीन-चार वर्षांत ७५% लोक घरून काम करू लागतील. त्यामुळे घरातील वातावरणही तापणार हे निश्चित. आधीच घरातून प्रेमाची भावना नाहीशी झाली होती, आता व्यवसायाचा प्रवेश झाला आहे. वर्क फ्राॅम होम केव्हा नरक फ्राॅम होममध्ये रूपांतरित होईल, हे कळणारही नाही. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात असाल तरी आतून थोडे अनोखेपण शोधा. राजकारण्यांच्या घोषणांमध्ये सत्य शोधण्याची, संतांच्या बोलण्यात सत्य शोधण्याची, नोकरशहांच्या निर्णयांवर विश्वास ठेवण्याची आणि आपल्या कृतीत निःस्वार्थीपणा दाखवण्याची हीच वेळ आहे. निःस्वार्थीपणा म्हणजे यशस्वी झालात तर अहंकार नसावा आणि अयशस्वी झाल्यास नैराश्य नसावे. त्यामुळे संघर्षाच्या वातावरणात यश मिळवण्यासाठी स्वतःवर सर्वाधिक विश्वास ठेवा आणि हा विश्वास परम शक्तीशी जोडा.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...