आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:तुम्हीही होऊ शकता राजऋषी

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक माणसाकडे एक वारसा असतो. श्रीमंत असो की गरीब, ‘मागे काय सोडून जाणार’ हा विचार असायला हवा. भिकारीही मागे काही तरी सोडून जातो. भिकारी दिसला तर त्याला आरसा समजून त्यात स्वतःची प्रतिमा पाहा. हे दीनबंधू आरशाच्या रूपात सांगतील की, प्रत्येक माणूस आपापल्या परीने भिकारी आहे. राजा असो वा श्रीमंत, जितकी मागणी असेल तितका भिकारी कधीच नसतो. होय, ज्याची मागणी संपली त्याच्यापेक्षा मोठा राजा नाही, असे स्वामी रामतीर्थ म्हणत असत.

हे मोठे लोक कुठे ना कुठे कुणासमोर तरी भिकारीच आहेत. कृष्णाने गीतेत एक शब्द दिला आहे - ‘राजऋषी’. राजऋषी म्हणजे योगाचे जाणकार. याचा अर्थ राजा ऋषीसारखा झाला, असा नाही. राजा कुठलाही असला तरी तोही भिकारीच असतो. हो, जो ऋषी होईल, म्हणजेच योगी होईल, तोच कृष्णाच्या दृष्टीने खरा राजा आहे. म्हणून भिकाऱ्याला पाहाल तेव्हा आपल्या आतील भिकाऱ्याचे विश्लेषण करा आणि त्याला ऋषी बनवा. मग तुम्हीही ‘राजऋषी’ व्हाल.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta