Home >> Sports

Sports

 • नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट टीम अाता अागामी दाेन महिन्यांच्या अाॅस्ट्रेलियन दाैऱ्यावर रवाना हाेणार अाहे. याच दाैऱ्यात टीम इंडिया तीन टी-२०, चार कसाेटी अाणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार अाहे.येत्या २१ नाेव्हेंबरला या दाैऱ्यातील सामन्यांना सुरुवात हाेईल. क्रिकेटच्या झटपट फाॅरमॅट टी-२० मधील सलामीला भारत अाणि यजमान अाॅस्ट्रेलियन संघ समाेरासमाेर असतील. यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका रंगणार अाहे. ब्रिस्बेनच्या मैदानावर हा सलामी सामना हाेईल. पाहुण्या विंडीजविरुद्धच्या...
  09:04 AM
 • नवी दिल्ली- यंदाच्या सत्रातील सुरुवातीलाच विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला तीन माेठ्या अाव्हानांचा सामना करावा लागेल, हे जवळपास निश्चितच झालेे हाेते. यात दक्षिण अाफ्रिका, इंग्लंड अाणि अाॅस्ट्रेलिया दाैऱ्यांचा समावेश अाहे. या तिन्ही यजमान संघांविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी अत्यंत सुमार अाणि लाजिरवाणी ठरलेली अाहे. त्यामुळे या संघाविरुद्धच्या सुमार रेकाॅर्डमुळे टीम इंडियासाठी हे दाैरे म्हणजे अाव्हानात्मक मानले जातात. येत्या २१ नाेव्हेंबरपासून भारताचा संघ...
  November 13, 11:05 AM
 • चेन्नई- सामनावीर शिखर धवन (९२) अाणि ऋषभ पंतच्या (५८) शानदार शतकी भागीदारीच्या बळावर टीम इंडियाने रविवारी पाहुण्या विंडीज संघाचा मालिकेत धुव्वा उडवला. भारतानेे घरच्या मैदानावरील तिसऱ्या अाणि शेवटच्या टी-२० सामन्यात विंडीजवर राेमहर्षक विजयाची नाेंद केली. भारताने शेवटच्या चेंडूवर सहा गड्यांनी सामना जिंकला. यासह भारताने तीन टी-२० सामन्यांची मालिका ३-० ने अापल्या नावे केली. भारताने प्रथमच विंडीजविरुद्ध सलग तिसरा विजय संपादन केला. प्रथम फलंदाजी करताना विंडीज संघाने ३ बाद १८१ धावा काढल्या...
  November 12, 07:16 AM
 • जर जेमिमा राॅड्रिग्जला एका शब्दात व्यक्त करायचे असल्यास पाॅझिटिव्ही हा शब्दच महत्त्वाचा ठरेल. कारण, तिच्यामध्ये प्रचंड सकारात्मक विचार अाहेत. ती देवाला सर्वात माेठी शक्ती मानते. देवाकडूनच अापल्याला सकारात्मक विचाराची सर्वात माेठी ऊर्जा मिळते, असे तिचे मत अाहे. दाैऱ्यावर नसताना ती नित्यनेमाने चर्चमध्ये जाते. भारतीय संघातील प्रतिभावंत खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तिने क्रिकेटमधील पदार्पणापूर्वी वयाच्या १७ व्या वर्षी राज्यस्तरीय हाॅकी स्पर्धेत मुंबई संघाचे...
  November 11, 10:05 AM
 • गयाना- गत चॅम्पियन वेस्ट इंडीज संघाने अापल्या घरच्या मैदानावर अाता किताबावरचे वर्चस्व अबाधित ठेवण्याच्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. यजमान विंडीज संघाने महिलांच्या टी-२० विश्वचषकाच्या अापल्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशला धूळ चारली. सामनावीर डिंड्रा डाॅटिनच्या (५/५) धारदार गाेलंदाजीच्या बळावर विंडीजने १४.४ षटकांत ६० धावांनी विजयाची नाेंद केली. यासह विंडीजला स्पर्धेत धडाकेबाज विजय संपादन करता अाला. अाता विंडीजचा दुसरा सामना १४ नाेव्हेंबर राेजी द. अाफ्रिकेशी हाेईल. विंडीजची २७...
  November 11, 09:58 AM
 • स्पोर्ट् डेस्क- भारत आणि वेस्टइंडीज यांच्यामध्ये सध्या तीन मॅचची टी-20 सीरीज खेळली जात आहे. या सीरीजमध्ये भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. सीरीजचा तीसरा मॅच रविवारी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सीरीजमध्ये ऑलराउंडर रविंद्र जडेजाला आराम दिला आहे, पण तरिही जडेडा चर्चेत आला आहे. चर्चेचा विषय म्हणजे त्याचा मॅन ऑफ द मॅचचा चेक. Sir Ravindra Jadejas Man Of The Match Cheque Replica (5th ODI #IndvWI) Found In Garbage Dump By An NGO.BCCI Must Get Rid Of These Useless Replicas To Reduce Non-biodegradable Wastes. pic.twitter.com/0QTTTyqB0E Sir Ravindra Jadeja (@SirJadeja) November 10, 2018 कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला...
  November 11, 12:03 AM
 • स्पोर्ट्स डेस्क / गुयाना -महिला टी -20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 34 धावांनी पराभव केला. कर्णधार हरमनप्रित कौरने 51 चेंडूत धडाकेबाज103 धावा केल्या. टी -20 मध्ये शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 5 विकेट्सच्या मोबदल्यात 194 धावा केल्या. महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील कोणत्याही संघाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाने 191 धावा केल्या होत्या. भारताने विजयासाठी दिलेल्या 195 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या टीमने...
  November 10, 04:11 PM
 • प्रोव्हिडेन्स (गयाना)-वेस्ट इंडीजमध्ये आजपासून सुरू झालेल्या महिला T-20 विश्वचषकातील उद्घाटनीय लढतीत कर्णधार हरमनप्रीत कौरचे वेगवान शतक (१०३) व तिने चौथ्या गड्यासाठी जेमिमा राॅड्रीग्जसह केलेल्या १३४ धावांच्या शतकी भागीदारीमुळे भारतीय महिला संघाने तगड्या न्यूझीलंडपुढे विजयासाठी २० षटकांत १९५ धावांचे दमदार लक्ष्य ठेवले. अंतिम वृत्त हाती आले. त्यावेळी न्यूझीलंड संघ ७ षटकांत १ फलंदाज गमावून ५४ धावांवर खेळत होता. भारतीय महिला संघाच्या फलंदाजीचे विशेष आकर्षण कर्णधार हरमनप्रीत कौरची...
  November 10, 08:25 AM
 • गयाना -वेस्ट इंडीजमध्ये आजपासून महिला टी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार असून भारतीय महिलांना तगड्या न्यूझीलंड संघाविरुद्ध आज (९ नोव्हे.) सलामी द्यायची आहे. भारतीय महिला संघ कागदावर तरी समतोल वाटत असला तरी फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांना अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. विशेष बाब अशी की, भारतीय महिला िक्रकेटपटूंना आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांच्या अनुभवाची कमतरता या स्पर्धेत िनश्चितपणे जाणवू शकते. काहीही असले तरी भारताकडे कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे फिरवणाऱ्या तीन दणकेबाज फलंदाज...
  November 9, 08:59 AM
 • मुंबई- भारतीय क्रिकेट संघाचा करिष्मेबाज माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी संपला काय? भारतीय संघातून डच्चू मिळाल्यानंतर तर या अफवांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय प्रशासकांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मुदगल समितीने संशयित म्हणून दिलेल्या क्रिकेटपटूंची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर संशय अधिक गडद होत चालला आहे. प्रत्यक्षात मात्र सध्या वेगळेच घडतेय. महेंद्रसिंग धोनी याला वगळले नाही तर भावी यष्टिरक्षकांना पूर्णपणे पडताळून पाहण्याची संधी कप्तान व निवड समितीला मिळावी यासाठी...
  November 8, 09:53 AM
 • लखनऊ-जबरदस्त फाॅर्मात असलेल्या कर्णधार राेहित शर्माच्या (नाबाद १११) धडाकेबाज विक्रमी शतकाच्या बळावर भारतीय संघाने मंगळवारी मालिका विजयाची नाेंद केली. भारताने मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात पाहुण्या विंडीजवर ७१ धावांनी मात केली. यासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी अाघाडी घेतली. अाता मालिकेतील तिसरा सामना रविवारी हाेणार अाहे. घरच्या मैदानावर जबरदस्त फाॅर्मात असलेल्या भारताचा ३४ दिवसांत (४ अाॅक्टाेबर ते ६ नाेव्हेंबर) विंडीजविरुद्धचा हा सलग तिसरा मालिका विजय...
  November 7, 09:13 AM
 • फुझाेऊ- जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या पी.व्ही. सिंधूने मंगळवारी किताबाच्या अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. तिने चायना अाेपन बॅडमिंटन स्पर्धेत अवघ्या २९ मिनिटांत एकतर्फी विजयाची नाेंद केली. दुसरीकडे भारताच्या अश्विनी पाेनप्पाला अापली सहकारी एन.सिक्की रेड्डीसाेबत महिला दुहेरीच्या सलामीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या जाेडीचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. त्यांचा विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला. त्यापाठाेपाठ मनु अत्री अाणि बी.सुमीत रेड्डीलाही...
  November 7, 07:50 AM
 • लखनऊ- यजमान टीम इंडियाला अाता टी-२० मध्ये सलग सातव्या मालिका विजयाच्या सप्तरंगी यशातून यंदाची दिवाळी पहाट झगमगून टाकण्याची माेठी संधी अाहे. राेमहर्षक विजयी सलामीने फाॅर्मात अालेला यजमान भारतीय संघ अाता मालिका जिंकून चाहत्यांचा दिवाळी साजरी करण्याचा अानंद द्विगुणित करण्यासाठी सज्ज झाला अाहे. यासाठी राेहितच्या कुशल नेतृत्वात विजयी धमाका उडवण्यासाठी भारताच्या युवांनी कंबर कसली. भारत अाणि विंडीज यांच्यातील दुसरा टी-२० सामना अाज मंगळवारी हाेणार अाहे. या सामन्यातील विजयाने भारताला या...
  November 6, 08:53 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - काही क्रिकेटर्स आपल्या खेळापेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत राहतात. भारतीय क्रिकेटसह जगभरात असे अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांना विवाहित महिलांवर प्रेम जडले. हसत-हसत ते या महिलांचे सेकंड हस्बंड देखील बनले आहेत. मॅरिड महिलांवर फिदा होऊन त्यांच्यासोबत संसार थाटणाऱ्या क्रिकेटर्समध्ये शिखर धवनसह अनिल कुंबळे यांचाही समावेश आहे. आम्ही आपल्याला अशाच काही क्रिकेटर्स आणि त्यांच्या लव्ह लाइफबद्दल माहिती देत आहोत. 2 मुलांच्या आईवर फिदा झाला होता शिखर - शिखर धवनची पत्नी आयशा...
  November 6, 12:01 AM
 • स्पोर्ट डेस्क : पाकिस्तानचा युवा फलंदाज बाबर आझम ट्वेंटी -20 मध्ये सर्वात वेगवान 1000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. 24 वर्षीय बाबरने पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी -20 मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात रविवारी विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला. या सामन्यात बाबरने पाकिस्तानसाठी खेळाची सुरुवात करत आणि 58 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 79 धावा केल्या. या सामन्यात 48 धावांवर पोहोचताच बाबरने टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कमी डावांत 1000 धावांचा पल्ला गाठला. या...
  November 5, 02:56 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली 30 वर्षांचा झाला आहे. 5 नोव्हेंबर 1988 रोजी जन्मलेला विराटचा लग्नानंतरचा हा दुसरा वाढदिवस आहे. 11 डिसेंबर रोजी त्याने अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत विवाह केला. यानंतर त्याच्या पहिल्या वाढदिवशी तो व्यस्त असल्याने पत्नीसोबत सेलिब्रेट करू शकला नव्हता. आता मात्र, त्याने पत्नीसोबत उत्तराखंड येथे सेलिब्रेशन करून त्याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. वाढदिवस साजरे केल्यानंतर तो मुंबईला येऊन दिवाळी साजरी करणार आहे. अनुष्काने शेअर...
  November 5, 02:26 PM
 • काेलकाता- चायनामॅन गाेलंदाज कुलदीप यादवच्या (३/१३) धारदार गाेलंदाजीपाठाेपाठ दिनेश कार्तिकच्या (नाबाद ३१) खेळीच्या बळावर टीम इंडियाने अापल्या घरच्या मैदानावर पाहुण्या विंडीजला पराभूत केले. भारताने टी-२० मालिकेच्या सलामी सामन्यात धडाकेबाज विजयाची नाेंद केली. टीम इंडियाने १७.५ षटकांत ५ गड्यांनी सामना जिंकला. यासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील दुसरा सामना उद्या मंगळवारी हाेईल. हा विंडीज संघासाठीचा निर्णायक सामना ठरेल. यातील पराभवाने विंडीजला...
  November 5, 08:06 AM
 • स्पोर्ट्स डेस्क : मुंबईचा क्रिकेटपटू सौरभ नेत्रवळकर याला अमेरिकेचा राष्ट्रीय संघाचा कर्णधार बनवले आहे. 27 वर्षांच्या सौरभ नेत्रवलकर गोष्ट एखाद्या चित्रपट कथेपेक्षा कमी नाही. सौरभ भारतीय क्रिकेटचा एक असे नाव आहे, ज्याने भारतासाठी खेळतांना 2010च्या 19 वर्षाखालील विश्वकपमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा पराक्रम केला होता. संधी न मिळाल्यामुळे शिक्षणावर रमवले मन 2010 मध्ये न्यूझीलंड मध्ये आयोजित 19 वर्षाखालील विश्वकपमध्ये सौरभ ने 9 विकेट आपल्या नावे केल्या होत्या. सहा फुट उंच असलेल्या वेगवान...
  November 4, 05:11 PM
 • कोलकाता- सलगच्या मालिका विजयाने फाॅर्मात असलेला यजमान भारतीय संघ अाता टी-२० सिरीजही जिंकण्याच्या इराद्याने घरच्या मैदानावर उतरणार अाहे. भारत अाणि विंडीज यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला अाज रविवारपासून सुरुवात हाेईल. या मालिकेतील सलामीचा सामना काेलकात्याच्या एेतिहासिक इडन गार्डन मैदानावर हाेणार अाहे. या मालिकेसाठी भारताचा नियमित कर्णधार विराट काेहलीला विश्रांती देण्यात अाली. तर, माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीला संघातून वगळण्यात अाले. त्यामुळे अाता या दाेघांच्या...
  November 4, 11:21 AM
 • अाैरंगाबाद- पहिल्यांदाच यजमानपदाची संधी मिळाल्यानंतर महिलांच्या अखिल भारतीय अांतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेला माेठी प्रसिद्धी मिळावी, यासाठी चक्क क्रीडा संचालक डाॅ. दयानंद कांबळे यांनी खाेटी आवई ठाेकली. या स्पर्धेच्या उद््घाटन साेहळ्यासाठी चक्क अाॅलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक अाणि विनेश फाेगट येणार असल्याचीही घाेषणा करण्यात अाली. मात्र, प्रसिद्धीसाठी क्रीडा विभागाने रचलेला हा कुटिल डाव समाेर अाला. प्रत्यक्षात साक्षी मलिक अाणि तिचे प्रशिक्षक कुलदीप यांच्याशी काेणत्याही...
  November 4, 10:02 AM
 
जाहिरात

RECOMMENDED