जाहिरात
जाहिरात
Home >> Sports

Sports

 • नवी दिल्ली - यंदाच्या १२ व्या सत्रातील आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा समाराेप झाला आणि पाेस्टमॉर्टेम करणाऱ्या चर्चांना उधाण आले. विजय आणि पराभवाच्या चर्चेवर सध्या जाेरदार खडाजंगी सुरू आहे. त्यामुळे यंदाचा हा अंतिम सामना अधिकच रंगतदार झाला. त्यामुळे सामन्यात चेंडूगणिक कलाटणी बसणारे अनेक धक्केही चाहत्यांना बसत हाेते. त्यामुळे सामन्याला आपल्या बाजूने खेचून घेण्यासाठी दाेन्ही संघ वेळाेवेळी कलाटणी देत हाेते. सामन्यादरम्यान प्रत्येक चेंडूवर आम्ही एकमेकांचे डावपेच हाणून पाडत कलाटणी देत...
  May 14, 10:34 AM
 • हैदराबाद -आयपीएलच्या अंतिम लढतीत चेन्नई सुपरकिंग्जला केवळ १ धावेने पराभूत करत मुंबई इंडियन्सने विक्रमी चौथ्यांदा आयपीएल अजिंक्यपद मिळवले. मुंबईविरुद्ध १५० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नई संघाच्या शेन वॉटसनने सर्वाधिक ८० धावा केल्या. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा पाच किताब मिळवणारा पहिला खेळाडू ठरला. २००९ मध्ये तो डेक्कन चार्जर्सच्या संघात होता. राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ रविवारी यंदाच्या १२ व्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीगच्या किताबाचा...
  May 13, 08:18 AM
 • हैदराबाद - गतचॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज आणि तीन वेळचा किताब विजेता मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या सत्रातील आयपीएलची ट्राॅफी जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. या दाेन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी तीन वेळा आयपीएलचा किताब पटकावला. मुंबई इंडियन्सचा संघ २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये किताबाचा मानकरी ठरला हाेता, तर चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये विजेतेपदाचा बहुमान पटकावला हाेता. आता हैदराबादच्या मैदानावर हे दाेन्ही संघ फायनलमध्ये समाेरासमाेर असतील. या सामन्यातून आता मागील ५० दिवसांपासून सुरू...
  May 12, 09:40 AM
 • विशाखापट्टनम- आयपीएलचा गतविजेता संघ चेन्नई सुपरकिंग्सने क्वॉलिफायर-2 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेटने पराभव केला. या विजयासोबत चेन्नईने आठव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने विजयाचे श्रेय आपल्या गोलंदाजानां दिले आहे. धोनी म्हणाला, आमच्या सर्व खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले, खेळपट्टीवर स्पिनरला चांगला स्पीन मिळत होता. दिल्लीकडे डावखूरे फलंदाज असल्यामुळे स्पिनर रविंद्र जडेजाकडे आमचा अधिक कल होता. यादरम्यान त्याने चांगली गोलंदाजी केली....
  May 11, 03:35 PM
 • विशाखापट्टणम -धाेनीच्या कुशल नेतृत्वाखाली गतचॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघाने शुक्रवारी यंदाच्या १२ व्या सत्रातील अायपीएलची फायनल गाठली. यासह तीन वेळच्या किताब विजेत्या चेन्नईने करिअरमध्ये अाठव्यांदा अंतिम फेरीचा पल्ला गाठला. अाता या संघाने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. चेन्नईने १९ षटकांत ६ गड्यांनी सामना जिंकला. यासह चेन्नईला फायनलमधील प्रवेश निश्चित करता आला. चेन्नईचा लीगमधील हा १०० वा विजय ठरला. दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी...
  May 11, 08:06 AM
 • कराची- पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने नुकतीच प्रकाशित केलेली आपली आत्मकथा द गेमचेंजर यात वरिष्ठ खेळाडूंवर वाईट वर्तवणूकीचा खळबजनक आरोप केला आहे. या आत्मकथेत आफ्रिदीने लिहिले की, वरिष्ठ खेळाडूंनी त्याला बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या या विधानावरून पाकिस्तानमध्ये चांगलाच वाद सुरू झाला. यादरम्यान पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने आफ्रिदीचे समर्थन केले आहे. शोएब अख्तर म्हणाला की, मी त्या सर्व गोष्टींचा साक्षीदार आहे. शोएबने दिलेल्या समर्थनामुळे आफ्रिदीने...
  May 10, 06:20 PM
 • विशाखापट्टणम - गत चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज शुक्रवारी आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना हाेणार आहे. हे दाेन्ही संघ विशाखापट्टणमच्या वायएसआर रेड्डी स्टेडियमवर समाेरासमाेर असतील. दिल्लीच्या युवा टीमने एलिमिनेटर सामन्यात हैदराबादचा पराभव केला. या विजयाच्या बळावर दिल्लीने फायनलमधील प्रवेशाच्या आपल्या आशा कायम ठेवल्या. आता चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील विजेत्या टीमची फायनल रविवारी तीन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्ससाेबत हाेणार आहे. चेन्नई...
  May 10, 10:27 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात बुधवारी दिल्ली कॅपिटल्स संघाचा खेळाडू अमित मिश्रा सनराइझ हैदराबादविरूद्धच्या सामन्यात फिल्डींगमध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे आऊट झाला. अशा प्रकारे बाद होणारा या सत्रातील तो पहिला खेळाडू आहे. टूर्नामेंटमध्ये 6 वर्षांनंतर एखाद्या फलंदारजाने फिल्डरला अडचण निर्माण केल्यामुळे बाद झाल्याची अशी घटना घडली आहे. यापूर्वी 2013 मध्ये कोलकाता नाइटरायडर्सकडून खेळणारा युसूफ पठाण पुणे वॉरियर्सविरूद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात अशा प्रकारे आऊट...
  May 9, 05:42 PM
 • नवी दिल्ली -आशियातील सर्वात मोठा दूध ब्रँड अमूल आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा प्रमुख प्रायोजक आहे. अफगाणिस्तानचा संघ प्रशिक्षणापासूनच संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत अमूलचा लाेगाे असलेल्या जर्सीत खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक तेजीने वाढणारा संघ म्हणून मानांकन मिळालेल्या अफगाणिस्तान क्रिकेटशी जाेडले गेल्याबद्दल आम्ही उत्साहित असून हा संघ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करेल, अशी अपेक्षा असल्याचे जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ....
  May 9, 10:50 AM
 • विशाखापट्टणम -सलामीवीर पृथ्वी शॉ (५६) आणि यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (४९) धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबाद संघावर आयपीएलच्या १२ व्या सत्रात बुधवारी २ गडी राखून विजय मिळवला. दिल्लीने पहिल्यांदा प्ले ऑफचा सामना जिंकला. आता दिल्लीचा क्वालिफायर दुसरा सामना चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध १० मे रोजी विशाखपट्टणम येथे होणार आहे. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ८ बाद १६२ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १९.५ षटकांत ८ गडी गमावत विजयी...
  May 9, 08:21 AM
 • नवी दिल्ली - कॅप्टन कूल नावाने ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनीचे जगभरात लाखो चाहते आहेत. पण त्याची वर्षीय जीवाचे देखील अनेक चाहते आहेत. बॉलीवूड अभिनेत्री आणि किंग्स इलेवन पंजाबची सह मालकीण प्रीति झिंटाने मात्र जीवाबाबत धोनीला ट्वीटरवर धमकी दिली आहे. तिने ट्वीट करून लिहिले की, कॅप्टन कूलचे अनेक फँन्स आहेत पण मी त्यांच्या मुलीची फॅन आहे. त्यांनी आपल्या मुलीला वाचवावे. कारण मी त्यांच्या मुलीचे अपहकरण करू शकते. सोशल मीडियावर व्हायरल होत असताता जीवाचे व्हिडिओ सध्या जीवा चार वर्षांची आहे. पण...
  May 8, 02:00 PM
 • चेन्नई -तीन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाने मंगळवारी यंदाच्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली. या संघाने आपल्या करिअरमध्ये पाचव्यांदा आयपीएलची फायनल गाठली आहे. सामनावीर सूर्यकुमारच्या (नाबाद ७१) झंझावाती अर्धशतकाच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने क्वालिफायर सामन्यात यजमान चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव केला. मुंबई संघाने १८.३ षटकांत ६ गड्यांनी सामना जिंकला. यासह मुंबईने दिमाखदारपणे अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे गत चॅम्पियन आणि यजमान चेन्नई...
  May 8, 08:32 AM
 • केंटुकी - अमेरिकेत दरवर्षी घाेड्यांची केंटुकी डर्बी रेस आयाेजित करण्यात येते. या रेसच्या आयाेजनाला १८७५ मध्ये सुरुवात करण्यात आली. त्यामुळे ही सर्वात जुनी हाॅर्स रेस मानली जाते. मात्र, यंदाच्या रेसमध्ये वादग्रस्त निकाल लागला आहे. यामध्ये मॅक्झिमम सिक्युरिटी नावाच्या घाेड्याचा विजयानंतरही किताबाचा बहुमान हुकला. केंटुकी डर्बीच्या १४५ वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विजेत्या घाेड्याला अपात्र ठरवण्यात आले. जवळपास २ किमीच्या रेसमध्ये मॅक्झिमम सिक्युरिटी आणि त्याचा जाॅकी लुईस...
  May 7, 10:36 AM
 • चेन्नई-दोहा येथील एशियन चॅम्पियनशिपमध्ये भारताची लांब पल्ल्याची धावपटू गोमती मरिमुथू नुकतीच ८०० मीटरच्या रेसमध्ये सुवर्णपदकाची मानकरी ठरली. ती तामिळनाडूची धावपटू आहे. दोहा येथील सोनेरी यशामुळे मला नवीन ओळख मिळाली. मला आता मदत केली जात आहे. यापूर्वी मला असे कधीही अनुभवता आले नाही, अशी प्रतिक्रिया एशियन चॅम्पियन गोमतीने दिली. विसाव्या वर्षी गोमतीने धावण्यास सुरुवात केली. तीन वर्षांपूर्वी तिने याच खेळात करिअर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, वडील मरिमुथू आणि प्रशिक्षक गांधी यांच्यावर...
  May 6, 09:06 AM
 • मोहाली-यजमान किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने रविवारी आपल्या घरच्या मैदानावर यंदाच्या आयपीएलमध्ये सहाव्या विजयाची नोंद केली. मात्र, सलगच्या सुमार खेळीमुळे पंजाबला यंदा प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. पंजाबने लीग राउंडच्या आपल्या शेवटच्या सामन्यामध्ये गतचॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव केला. यजमान पंजाब संघाने १८ षटकांत ६ गड्यांनी सामना जिंकला. यासह पंजाबला विजयाने यंदाच्या स्पर्धेचा शेवट गोड करता आला. दुसरीकडे चेन्नईच्या टीमला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, तरीही...
  May 6, 08:58 AM
 • स्पोट्स डेस्क- पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीने आपली आत्मकथा गेम चेंजर लॉन्च करून अनेक खुलासे केले आहेत. अफ्रिदीने माजी भारतीय ओपनर गौतम गंभीरसोबत मैदानात अनेकवेळा झालेल्या वादावरही टिका केलीये. त्याने आत्मकथेत लिहीले की, गंभीरचे स्वतःचे असे काहीच अस्तित्व नाहीये. तो स्वतःला सर डॉन ब्रॅडमन आणि जेम्स बॉन्डचे मिश्रण समजतो. अफ्रिदी म्हणाला की, गंभीरचा स्वभाव हा प्रतिस्पर्धीप्रमाणे नव्हता. खरे पाहीले तर तो आपल्या खेळात एकदम नकारात्म असायचा. अफ्रिदीने आपल्या आत्मकथेत...
  May 5, 12:34 PM
 • बंगळुरू- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने शनिवारी आयपीएलचा शेवट गोड केला. प्ले ऑफमधून बाहेर पडलेल्या बंगळरू संघाने आपल्या घरच्या मैदानावर पाहुण्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा पराभव केला. यजमान बंगळुरूच्या संघाने ४ गड्यांनी सामना जिंकला. यासह बंगळुरू संघाने लीग राउंडच्या शेवटच्या सामन्यात शानदार विजयाची नोंद केली. दुसरीकडे हैदराबाद संघाला सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे टीमचा प्ले ऑफमधील प्रवेश अडचणीत सापडला. हेटमेयर (७५) आणि गुरकिरत...
  May 5, 10:10 AM
 • माेहाली - दाेन वेळच्या चॅम्पियन काेलकाता नाइट रायडर्स संघाने सहाव्या विजयाची नाेंद करून यंदाच्या आयपीएलमधील प्ले ऑफ प्रवेशाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. काेलकाता संघाने शुक्रवारी लीगमधील आपल्या १३ व्या सामन्यात यजमान किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला. काेलकाता संघाने १८ षटकांत सात गड्यांनी सामना जिंकला. यासह काेलकाता संघाने प्ले आॅफच्या शर्यतीमधील आपले आव्हान कायम ठेवले. पंजाबच्या टीमला आपली पराभवाची मालिका खंडित करता आली नाही. प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १८३ धावा काढल्या....
  May 4, 09:27 AM
 • स्पोर्ट डेस्क- इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल (आईसीसी) ने शुक्रवारी टी-20 रँकिंग जारी केली. आयसीसीने पहिल्यांदाच यात 80 संघाचा समावेश केला आहे. भारताला या रँकिंगमध्ये तीन स्थानाचे नुकसान झाले आहे. भारतीय संघ दुसऱ्या स्थानावरून 5 व्या क्रमांकावर घसरला आहे. मागील वर्षी आयसीसी वर्ल्ड टी-20 चॅम्पियनशिप जिंकणारा पाकिस्तान नंबर एक स्थानावर कायम आहे. या सर्व संघांनी आयसीसीच्या टी-20 फॉर्मेटच्या नियमानुसार प्रदर्शन केले होते. दक्षिण आफ्रिका दुसऱ्या आणि इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर टी-20 रॅकिंगमध्ये...
  May 3, 08:27 PM
 • कराची(पाकिस्तान)- पाकिस्तानी क्रिकेट टीमचा माजी कर्णधार शाहिद अफ्रीदीने आपली आत्मकथा गेम चेंजरमध्ये आपल्या खऱ्या वयाचा खुलासा केला आहे. यात त्याने आपल्या जन्माचे वय 1975 सांगितले आहे, पण अधिकृत रेकॉर्डमध्ये त्याचे वय 1 मार्च 1980 आहे. अफ्रीदीने 1996 मध्ये नॅरोबीमध्ये श्रीलंकाविरूद्ध फक्त 37 चेंडूमध्ये सगळ्यात जलद 100 रन पूर्ण केले होते. त्यामुळे डेब्यू मॅच दरम्यान आफ्रिदी 16 वर्षांचा नाही तर 20 किंवा 21 वर्षांचा असेल. अफ्रीदी या सीरीजनंतर नॅरोबीवरून वेस्टइंडीजला गेला होता. येथे त्याने...
  May 3, 12:50 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात