जाहिरात
जाहिरात
Home >> Sports

Sports

 • सिडनी- चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंतच्या धडाकेबाज शतकांपाठाेपाठ कुलदीप यादव (३/७१) आणि रवींद्र जडेजा (२/६२) यांच्या शानदार गाेलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने आता शनिवारी यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका विजयाचा दावा मजबूत केला. यामुळे भारताला ७ दशकांनंतर ऑस्ट्रेलियात मालिका विजयाचा पराक्रम गाजवता येणार आहे. भारताने पहिल्य डावात ६२२ धावांचा डाेंगर रचला. प्रत्युत्तरात यजमान ऑस्ट्रेलिया संघाने चाैथ्या कसाेटीच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात ६ बाद २३६ धावा काढल्या. अद्याप ३८६ धावांनी...
  January 6, 09:55 AM
 • सिडनी - मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत तिसरा दिवसही भारतासाठी चांगला राहिला. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल दाखवली आणि ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना परतीचा मार्ग दाखवला. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 6 बाद 236 अशी झाली. अजूनही ते भारतापेक्षा 386 धावांनी पिछाडीवर आहेत. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीला पहिल्या सत्रात हॅरिस आणि ख्वाजा यांनी चांगली फलंदाजी केली. त्यातही ख्वाजा लवकर बाद झाला. पण हॅरीसने...
  January 5, 02:31 PM
 • स्पोर्ट डेस्क : भारताचे माजी कर्णधार मंसूर अली खान पतौडी यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांना भारताचा सर्वात महान कर्णधार समजले जात असे. त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने प्रथमच परदेशात कसोटी मालिका जिंकली होती. एका अपघातात त्यांच्या एका डोळ्याला इजा झाली होती. पण त्यानंतरही त्यांनी क्रिकेट खेळणे सोडले नाही. मंसूर अली खान पतौडी यांचा जन्म 5 जानेवारी 1941 रोजी भोपाळ येथे झाला होता. 1961 मध्ये एका कार अपघातात एक काचेचा तुकडा त्यांच्या डोळ्यात गेला होता. यामुळे त्यांचा उजवा डोळा खराब झाला. या...
  January 5, 11:25 AM
 • सिडनी- पुजारा जेव्हा ४ वर्षांचा हाेता, तेव्हा रबरच्या बाॅल आणि बॅटने खेळत हाेता. त्याच्या वडिलांनी त्याचा फाेटाे काढला. जेव्हा हा फाेटाे डेव्हलप होऊन आला, तेव्हा वडिलांनी चेतेश्वर म्हणजे चिंटूमधील गुणवत्ता ओळखली. त्याचे वडील अरविंद पुजारा हे रणजीत खेळले हाेते. काका बिपिन साैराष्ट्राकडून रणजी खेळाडू हाेता. चेतेश्वरचे आजाेबा शिवलाल पुजारा लेग स्पिनर हाेते. ते प्रिन्स्ली स्टेट ऑफ ध्रांगधरासाठी खेळत हाेते. पुजारामधील गुणवत्ता ओळखून त्याच्या वडिलांनी त्याला प्रशिक्षण देणे सुरू केले....
  January 5, 09:53 AM
 • दाेहा- तिसऱ्या किताबाच्या इराद्याने खेळत असलेल्या नंबर वन नाेवाक याेकाेविकने शुक्रवारी कतार ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ताे जेतेपदापासून अवघ्या दाेन पावलांवर आहे. दुसरीकडे स्वीसच्या वावरिंकाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याचे आव्हान संपुष्टात आले. सातव्या मानांकित राॅबर्टाे बाऊतिस्ता आगुतने पुरुष एकेरीच्या अंतिम आठमध्ये राेमहर्षक विजयाची नाेंद केली. त्याने सामन्यात स्वीसच्या वावरिंकाचा सरळ दाेन सेटमध्ये पराभव केला. त्याने...
  January 5, 09:49 AM
 • सिडनी- टीम इंडियाने तब्बल ७० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसाेटी मालिकेचा विजय जवळपास निश्चित केला आहे. त्यासाठी चेतेश्वर पुजारासह (१९३), यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (नाबाद १५९) आणि ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (८१) यांनी सरस खेळी केली. या तिघांच्या अव्वल फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने शुक्रवारी यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध चाैथ्या कसाेटीचा पहिला डाव ७ बाद ६२२ धावांवर घाेषित केला. प्रत्युत्तरात अाॅस्ट्रेलियाने दिवसअखेर पहिल्या डावात बिनबाद २४ धावा काढल्या. टीम इंडियाने ८६ वर्षांत ३२ व्यांदा...
  January 5, 09:46 AM
 • अबुधाबी- जगातील सर्वात जुन्या आणि माेठ्या फुटबाॅल चॅम्पियनशिपला आज शनिवारपासून अबुधाबी येेथे सुरुवात हाेत आहे. एएफसी एशियन चषक फुटबाॅल स्पर्धा यंंदा यूएईमध्ये आयाेजित करण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटनाची किक आज अबुधाबीच्या मैदानावर बसणार आहे. या स्पर्धेत यजमान यूएई आणि बहरीन यांच्यात सलामी सामना हाेणार आहे. त्यापूर्वी स्थानिक ६०० कलाकार सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या नृत्याविष्काराने उद््घाटन साेहळ्याला रंगत आणणार आहेत. जगभरातील ३० काेटींपेक्षा अधिक चाहते हा उद््घाटनीय...
  January 5, 09:41 AM
 • सिडनी - सिडनी कसोटीत भारतीय संघ भक्कम स्थितीत पोहोचला आहे. भारताने पहिल्या डावात 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. पहिल्या दिवशी शतक झळकावलेल्या पुजाराने दुसऱ्या दिवशीही उत्तम खेळी केली. पण त्याचे द्विशतक अवघ्या 7 धावांनी हुकले आणि तो 193 धावांवर बाद झाला. तर ऋषभ पंतनेही उत्कृष्ट अशी शतकी खेळी केली. रवींद्र जडेजानेही 81 धावांची खेळी करत भारताच्या मोठ्या धावसंख्येत मोलाची भर घातली.हनुमा विहारीने 42 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया बिनबाद 24.. दरम्यान, भारताने 622 धावांचा डोंगर उभारल्यानंतर दिवसातील...
  January 4, 02:32 PM
 • कतार- जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकला गुरुवारी कतार ओपन टेनिस स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी शर्थीची झुंज द्यावी लागली. मात्र, त्याने पिछाडीनंतरही बाजी मारून राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह त्याने स्पर्धेतील आपले आव्हान राखून ठेवले. सर्बियाच्या याेकाेविकने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत हंगेरीच्या मार्टन फुसकाेविक्सवर मात केली. त्याने ४-६, ६-४, ६-१ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. आता त्याचा अंतिम आठमधील...
  January 4, 08:43 AM
 • सिडनी- जबरदस्त फाॅर्मात असलेल्या चेतेश्वर पुजाराने (नाबाद १३०) आपली लय कायम ठेवताना गुरुवारी यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध चाैथ्या कसाेटीत शानदार शतकाची नाेंद केली. यासह त्याच्या नावे या कसाेटी मालिकेत तिसऱ्या शतकाची नाेंद झाली. ऑस्ट्रेलियामध्ये एकाच मालिकेत तीन वा त्यापेक्षा अधिक शतके झळकावणारा पुजारा हा भारताचा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी सुनील गावसकर व काेहलीने असा पराक्रम गाजवला आहे. पुजारा आणि सलामीवीर मयंक अग्रवालच्या (७७) शतकी भागीदारीच्या बळावर टीम इंडियाने मालिका...
  January 4, 08:38 AM
 • मुंबई -भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या मॅचला सिडनीत सुरुवात झाली. या सामन्याची सुरुवात होताच भारतीय संघाचे सदस्यांनी आपल्या बाह्यांना काळ्या पट्ट्या लावून क्रिकेट विश्वातील दिग्गज प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहिली. रमाकांत आचरेकर यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे यांसारख्या अनेक क्रिकेटपटूंना घडवले आहे. त्यांच्या प्रशिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन...
  January 3, 02:16 PM
 • सिडनी - ऑस्ट्रेलिया विरोधातील कसोटी मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत पहिल्या दिवशी भारताची चांगली सुरुवात झाली. भारताने दिवसअखेर चार विकेट गमावत 303 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने मालिकेतील तिसरे आणि करिअरचे 18 वे शतक पूर्ण केले. तो 130 धावांवर नाबाद आहे. तर मयांक अग्रवालनेही 77 धावा करत मोलाची कामगिरी केली. लोकेश राहुल मात्र पुन्हा अपयशी ठरला आहे. कोहली 23 आणि राहाणे 18 देखिल स्वस्तात बाद झाले. ऑस्ट्रेलियाच्या हेजलवूडने सर्वाधिक दोन तर स्टार्क आणि लियोनने प्रत्येकी एक विकेट घेतली. विराटने...
  January 3, 01:24 PM
 • दाेहा- जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकने यंदाच्या नव्या सत्राला दमदार विजयाने सुरुवात केली. त्याने कतार ओपन टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. त्याने ५५ मिनिटांमध्ये पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात दामिर जुमहूरचा पराभव केला. याेकाेविकने ६-१, ६-२ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह त्याला आपल्या माेहिमेला चांगली सुरुवात करता आली. यासह त्याच्या नावे आता येथील स्पर्धेत १३ व्या विजयाची नाेंद केली. या ठिकाणी त्याला आतापर्यंत एकाच लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे...
  January 3, 09:58 AM
 • सिडनी- भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील चाैथ्या कसाेटीला आज गुरुवारपासून सिडनीच्या मैदानावर सुरुवात हाेत आहे. यातील विजयाने भारताच्या नावे ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसाेटी मालिका विजयाचा पराक्रम नाेंद हाेईल. त्यामुळे या महत्वाच्या कसाेटीसाठी बुधवारी भारतीय संघात काहीसा बदल करण्यात आला. त्यानुसार अश्विनला संधी देण्यात आली. मात्र, त्याच्या सहभागाबाबत व्यवस्थापक आणि कर्णधार विराट काेहलीमधील मते वेगवेगळी असल्याचे दिसते. बुमराह टाकणार कपिलदेवला मागे बुमराहला आता विक्रमात कपिलदेवला...
  January 3, 09:56 AM
 • कार्डिफ- टाॅटेनहॅम हाॅट्सपरने आपली माेहीम अबाधित ठेवताना इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये शानदार विजयाची नाेंद केली. या क्लबने लीगमध्ये कार्डिफ सिटीचा पराभव केला. टाॅटेनहॅमने ३-० अशा फरकाने सामना जिंकला. यासह टाॅटेनहॅमने सलग चाैथ्यांदा कार्डिफवर शानदार विजय संपादन केला. यामुळे या क्लबला कार्डिफविरुद्धचा आपला १०० टक्के विजयाचा विक्रमही कायम ठेवता आला. कार्डिस सिटीच्या मैदानावर टाॅटेनहॅमचा हॅरी केन हा प्रतिभावंत खेळाडू चमकला. त्याने दमदार सुरुवात करताना तिसऱ्याच मिनिटाला गाेलचे खाते...
  January 3, 08:56 AM
 • मुंबई- मैदानावर उतरताच आपल्या कुशल खेळीने विक्रमाला गवसणी घालणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर घडवण्याचे माेलाचे कार्य द्राेणाचार्य रमाकांत आचरेकर यांनी केले. याच विक्रमादित्य सचिनपासून आंतरराष्ट्रीय सामने गाजवणारी क्रिकेटरत्ने त्यांनी भारतीय क्रिकेटला दिली. सचिन तेंडुलकरपासून विनोद कांबळीपर्यंत आणि बलविंदरसिंग संधूपासून रामनाथ पारकर, लालचंद राजपूत, प्रवीण आमरे यांच्यापर्यंत शेकडो कसोटी आणि प्रथम दर्जाचे क्रिकेटपटू घडवणारे क्रिकेटचे भीष्मपितामह, गुरू द्रोणाचार्य...
  January 3, 08:53 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारताचा आघाडीची स्पिनर रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियाच्या विरोधातील सिडनीतील अखेरच्या कसोटीतून बाहेर पडला आहे. अश्विन फिटनेस टेस्ट पार करू शकला नाही. अश्विन 100% फिट नसल्याने निवडीसाठी त्याच्या नावाचा विचार केला जाणार नाही. कर्णधार विराट कोहलीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोहली म्हणाला, अश्विन फिट नाही ही टीमसाठी वाईट बातमी आहे. पण तो दीर्घकाळासाठी फिट व्हावा असे आम्हाला वाटते. यापूर्वीच्या दोन कसोटीही खेळू शकला नाही अश्विन पेटाच्या स्नायूमध्ये असलेल्या...
  January 2, 11:14 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - टेनिस जगतातील दोन सर्वात मोठे स्टार रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स यांच्यात प्रथमच सामना झाला. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या होपमॅन कप स्पर्धेच्या मिक्स्ड डबल्स सामन्यात रॉजर फेडरर आणि बेलिंडा बेनसिस यांची जोडी विजयी ठरली. त्यांनी अमेरिकेच्या फ्रान्सेस टिफोई-सेरेना जोडीला सरळ सेटमध्ये पराभूत केले. ही मॅच पाहण्यासाठी 14 हजाराहून अधिक फॅन्स पोहोचले होते. हा स्पर्धेतील एक नवा विक्रम ठरला. यापूर्वी सिंगल्समध्ये सेरेना आणि फेडरर दोघांनी त्यांचे सामने जिंकले होते....
  January 2, 11:14 AM
 • पर्थ/ ब्रिस्बेन- टेनिस विश्वातील राॅजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स हे दाेघेही दिग्गज मंगळवारी समाेेरासमाेर आले हाेते. या दाेघांमध्ये हाेपमन चषक टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचा सामना रंगला. स्वीसच्या फेडररने आपली सहकारी बेलिंडासाेबत या सामन्यात फ्रान्सेस आणि सेरेनावर मात केली. त्यांनी ४-२, ४-३ अशा फरकाने मात केली. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये १४ हजार चाहत्यांची खास उपस्थिती हाेती. मरेचे तीन महिन्यांनंतर पुनरागमन तीन वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन अँडी मरेने आता टेनिस काेर्टवर...
  January 2, 08:57 AM
 • सिडनी- मेलबर्न कसाेटीतील विजयाने फाॅर्मात आलेला भारतीय संघ आता दाैऱ्यात यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आपल्या नावे करण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाला आता प्रथमच ऑस्ट्रेलियामध्ये कसाेटी मालिका आणि तीन कसाेटी जिंकण्याची संधी आहे. भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील चाैथ्या कसाेटीला उद्या गुरुवारपासून सिडनीच्या मैदानावर सुरुवात हाेत आहे. दाेन विजयांच्या बळावर भारताने चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेमध्ये २-१ ने आघाडी घेतली. त्यामुळे आता तिसऱ्या विजयाने भारताला ही कसाेटी...
  January 2, 08:52 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात