Home >> Sports

Sports

 • स्पोर्ट्स डेस्क - आयएएफ वर्ल्ड अंडर-20 मध्ये अॅथलेटिक चॅम्पियनशिपचे सुवर्ण पदक जिंकून भारताचे नाव साऱ्या जगात चमकवणारी हिमा दास हिच्या कोचवर बलात्काराचे आरोप लागले आहेत. हिमा दासचे देश आणि परदेशात जेवढे कौतुक केले जात आहे त्या सर्वांचे श्रेय तिचे कोच निपोन दास यांना जाते. परंतु, त्याच कोचवर आसामच्या एका महिला खेळाडूने लैंगिक शोषणाचा आरोप दाखल केला आहे. 100 आणि 200 मीटर अॅथलेटिक्समध्ये त्या महिलेने निपोन यांच्याकडून गुवाहाटीच्या इंदिरा गांधी स्टेडिअममध्ये ट्रेनिंग घेतली होती. तिने...
  July 30, 12:44 PM
 • दाम्बुला- कसाेटी मालिकेतील पराभवातून सावरलेला दक्षिण अाफ्रिका संघ रविवारी विजयी ट्रॅकवर परतला. जेपी ड्युमिनीच्या (५३) नाबाद तुफानी अर्धशतकाच्या बळावर अाफ्रिकेने वनडे मालिकेत विजयी सलामी दिली. अाफ्रिकेने सलामीच्या वनडे सामन्यात यजमान श्रीलंका संघावर ५ गड्यांनी मात केली. यासह अाफ्रिकेने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील दुसरा वनडे सामना १ अाॅगस्ट, बुधवारी रंगणार अाहेे. या टीमला नुकत्याच झालेल्या कसाेटी मालिकेत सलग दाेन वेळा पराभवाचा सामना करावा लागला....
  July 30, 08:14 AM
 • ब्लादिवाेस्टाॅक- भारताचा प्रतिभावंत खेळाडू साैरभ वर्मा हा रशिया अाेपन सुपर टूर बॅडमिंटन स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने पुरुष एकेरीचा किताब पटकावला. त्याने अापल्या करिअरमध्ये पहिल्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदाचा बहुमान पटकावला. दुसरीकडे भारताच्या राेहन कपूर अाणि कुहू गर्गने मिश्र दुहेरीत उपविजेतेपद अापल्या नावे केले. त्यांना या गटाच्या फायनलमध्ये पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे भारताची ही दुसरी मानांकित जाेडी उपविजेतेपदाची मानकरी ठरली. माजी नॅशनल चॅम्पियन साैरभ...
  July 30, 07:46 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारताचा इंग्लडंच्या काउंटी टीम एसेक्स विरुद्ध झालेला सामना ड्रॉ झाला. या मॅचमध्ये भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांवर तज्ञांनी सवाल उपस्थित केले. त्यापैकीच शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाराच्या वाइट फलंदाजीवर सर्वाधिक चर्चा झाली. धवन दोन्ही इनिंग्समध्ये शून्यावर बाद झाला. परंतु, याच मॅच दरम्यान तो कॅप्टन विराट कोहलीसह डान्स करताना दिसून आला. एसेक्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. कोहलीसह शिखरचा भांगडा व्हिडिओमध्ये फील्डिंगसाठी उतरणाऱ्या टीम...
  July 28, 06:09 PM
 • मुंबई - भारतीय क्रिकेट टीमच्या कर्णधार पदावरून पायऊतार झाल्यानंतर धोनीने प्रसारमाध्यमांपासून अंतर राखले. त्यानंतर विराट कोहली हा नवा तारा भारतीय क्रिकेटच्या क्षितीजावर चमकू लागला. खराब फॉर्ममुळे काही जणांनी तर धोनीला निवृत्तीचा सल्लाही दिला. त्यामुळे धोनी आता पुर्वीसारखा लोकप्रिय राहिलेला नाही असे तुम्हाला वाटत असेल तर थांबा. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानूसार आजही धोनी हाच भारतीयांच्या गळ्यातील ताईत असल्याचे समोर आले आहे. एका वेबसाईटने याचा सर्व्हे घेतला असता...
  July 27, 05:59 PM
 • लंडन- टीम इंडिया अाणि यजमान इंग्लंड यांच्यातील पाच कसाेटी सामन्यांच्या मालिकेला १ अाॅगस्टपासून सुरुवात हाेत अाहे. येत्या बुधवारपासून बर्मिंघहॅमच्या मैदानावर भारत-इंग्लंड सलामी कसाेटी रंगणार अाहे. या मालिका विजयाच्या इराद्याने टीम इंडिया मैदानावर उतरणार अाहे. एका मालिका विजयाने भारतीय संघाचा अात्मविश्वास द्विगुणित झाला अाहे. त्यामुळे अाता दुसऱ्या मालिका विजयासाठी भारतीय संघ प्रयत्नशील राहिल. मात्र, यासाठी टीम इंडियाला माेठी कसरत करावी लागणार अाहे. या मालिका विजयासाठी भारताला...
  July 27, 09:32 AM
 • दुबई - भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या मॅटर्निटनी लीव्हवर आहे. ती आपला पती आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिकसोबत दुबईतील घरी आहे. याच घरात सानिया आणि शोएबने पाकचा तूफान फलंदाज फखर झमान याला पार्टी दिली. वनडे इंटरनॅशनल सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करण्याचे विक्रम केल्याबद्दल या कपलने त्याला शुभेच्छा दिल्या. पाकिस्तानी क्रिकेटर खर झमान याने नुकतेच झालेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या आपल्या 18 व्या वनडे सामन्यात 1000 धावा पूर्ण केल्या. त्याने सर्वात जलद 1000 धावा करून व्हिव्हियन रिचर्ड्स...
  July 27, 12:23 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - क्रिकेट चाहत्यांना यंदाच्या क्रिकेट हंगामात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. आशिया कप स्पर्धेत 19 सप्टेंबरला क्रिकेटमधील हे दोन कट्टर विरोधक देश एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरतील. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या सामन्यात 2006 नंतर प्रथमच हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ एकमेकांच्या विरोधात यूएईमध्ये मॅच खेळणार आहेत. यापूर्वी या दोन संघांनी शारजाहमध्ये 24 आणि अबू धाबीमध्ये दोन सामने खेळले आहेत. भारत...
  July 25, 06:02 PM
 • मुंबई- यापूर्वीच्या इंग्लंड दौऱ्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जिमी अँडरसन याने भारताच्या कप्तान विराट कोहलीला सतत बकरा केला होता. त्यामुळे २०१८च्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यात या दोघांमधील मैदानावर अाणि बाहेर युद्ध रंगणार यात वाद नाही. त्या युद्धाची पहिली ठिणगी जिमी अँडरसनने टाकली आहे. जोपर्यंत भारत जिंकत आहे तोपर्यंत मी धावा केल्या किंवा नाहीत यामुळे फरक पडत नाही, असे विधान कोहलीने केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना अँडरसनने विराट खोटं बोलतोय! असे विधान केले आहे. विराटला त्याच्या...
  July 24, 09:16 AM
 • काेलंबाे- प्रचंड मेहनतीमधून अाता यजमान श्रीलंका संघाची तपश्चर्या फळाला अाली. श्रीलंका संघाने तब्बल १२ वर्षांनंतर घरच्या मैदानावर बलाढ्य दक्षिण अाफ्रिकेला क्लीन स्वीप दिले. यजमान श्रीलंकेने दुसऱ्या कसाेटीत १९९ धावांनी विजय संपादन केला. यासह श्रीलंका संघाने साेमवारी अाफ्रिकेविरुद्धची दाेन कसाेटी सामन्यांची मालिका २-० ने अापल्या नावे केली. सपशेल अपयशी ठरलेल्या अाफ्रिकेचा या मालिकेत धुव्वा उडाला.दिमुथ करुणारत्ने हा सामनावीर अाणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याची...
  July 24, 09:13 AM
 • नवी दिल्ली- विदर्भ संघाला रणजीचा किताब मिळवून देणारा कर्णधार फैज फझल अाता दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत नेतृत्व करणार अाहे. त्याच्याकडे इंडिया ब्ल्यू संघाच्या कर्णधारपदाची जवाबदारी साेपवण्यात अाली. या स्पर्धेत भारताच्या ब्ल्यू, रेड अाणि ग्रीन संघाची साेमवारी घाेषणा झाली. तसेच दक्षिण अाफ्रिका अ संघाविरुद्ध दाेन चारदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी अाैरंगाबादच्या गुणवंत खेळाडू अंकित बावणेची निवड झाली. ताे ४ अाॅगस्टपासून या मालिकेत यजमान भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करणार अाहे. यासाठी...
  July 24, 09:08 AM
 • बंगळुरू- अाशियाई चॅम्पियन भारतीय संघाने घरच्या मैदानावरील हाॅकी मालिकेत विजयाची हॅटट्रिक नाेंदवली. यजमान भारताने रविवारी पाहुण्या न्यूझीलंड संघाचा तिसऱ्या अाणि शेवटच्या सामन्यात पराभव केला. भारताने ४-० अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. रुपिंदर पाल सिंग (८ वा मि.), सुरेंदर कुमार (१५ वा मि.), मनदीप सिंग (४४ वा मि.) अाणि अाकाशदीप सिंग (६० वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करून भारताचा विजय निश्चित केला. न्यूझीलंडच्या खेळाडूंना शेवटपर्यंत सामन्यात एकही गाेल करता अाला नाही. यातूनच या पाहुण्या...
  July 23, 07:38 AM
 • बंगळुरू - अाशियाई चॅम्पियन भारतीय हाॅकी संघाने घरच्या मैदानावर शनिवारी पाहुण्या न्यूझीलंडचा सलग दुसरा पराभव केला. यासह यजमान भारताने या संघावर मालिका विजयाची नाेंद केली. दुसरीकडे इंग्लंडमध्ये विश्वचषक हाॅकी स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत भारतीय महिलांनी सलामीच्या सामन्यात यजमान अाणि रिअाे अाॅलिम्पिक चॅम्पियन इंग्लंड संघाला बराेबरीत राेखले. भारत अाणि इंग्लंड यांच्यातील लढत १-१ ने बराेबरीत राहिली. यजमान भारतीय पुरुष संघाने घरच्या मैदानावर मालिकेतील दुसऱ्या अाणि निर्णायक...
  July 22, 09:47 AM
 • सध्या भारतीय क्रिकेट संघात दुखापतग्रस्त खेळाडूंची संख्या वाढत आहे. इंग्लडविरुद्ध टेस्ट सिरीज सुरु होण्यापूर्वीच कर्णधार कोहलीला तीन मुख्य खेळाडू गमवावे लागले. विकेटकिपर वृद्धिमान साहा, गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह हे तिन्ही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. या सर्वांमध्ये साहाला झालेल्या दुखापतीमुळे सर्वजण चिंतेत आहेत. कारण एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन चालू असेल्या साहाचे करिअर धोक्यात येऊ शकते कारण फिजिओने ट्रेनिंग दरम्यान काहीतरी चूक केली. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने...
  July 20, 11:56 AM
 • मुंबई - इंग्लंडविरुद्ध पाच कसाेटी सामन्यांच्या मालिकेसाठी पहिल्या तीन लढतींसाठी भारतीय कसोटी क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. टी-२० आणि वनडे मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या डावखुरा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. त्याबरोबर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचादेखील पहिल्या संघात समावेश करण्यात आला. १८ सदस्यीय संघात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे नाव नाही. भुवीच्या पाठीचे दुखणे तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान वाढले होते. पहिल्यापासून दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहचा...
  July 19, 07:43 AM
 • लीड्स- नंबर वन इंग्लंड संघाने घरच्या मैदानावर सरस खेळी करताना मंगळवारी टीम इंडियावर मालिका विजय संपादन केला. यजमानांनी तिसरा अाणि निर्णायक वनडे सामना ८ गड्यांनी जिंकला. यासह इंग्लंड संघाने तीन वनडे सामन्यांची मालिका २-१ ने अापल्या नावे केली. याशिवाय इंग्लंडने घरच्या मैदानावरील सलग दुसऱ्या मालिका पराभवाची नामुष्कीही टाळली. यापूर्वी भारताने तीन टी-२० सामन्यांची मालिका गत अाठवड्यात २-१ ने जिंकली हाेती. अाता भारत अाणि इंग्लंड यांच्यात १ अाॅगस्टपासून पाच कसाेटी सामन्यांची मालिका रंगणार...
  July 18, 08:00 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकरने क्रिकेट खेळण्यापासून संन्यास घेतला तरीही क्रिकेटच्या क्षेत्राशी त्याची नाळ अजुनही घट्ट जुळलेली आहे. सचिन आपले आयुष्य खेळाला देऊ इच्छित आहे. भारताला क्रीडा प्रेमी देशपासून खेळणारा देश बनवणे हे त्याचे स्वप्न आहे. यासाठी सचिनने आपली एक कंपनी स्थापित केली आहे. या कंपनीचे नाव SRK10 असे ठेवण्यात आले आहे. सचिनने 15 वर्षांचा असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वयाच्या 24 व्या वर्षी तो मास्टर ब्लास्टर म्हणून प्रसिद्ध झाला. वयाच्या...
  July 17, 03:58 PM
 • लीड्स- विराट काेहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया अाता सलग दुसऱ्या मालिका विजयासाठी सज्ज झाला अाहे. भारताची नजर अाता तिसऱ्या वनडेत बाजी मारून मालिका अापल्या नावे करण्याकडे लागली अाहे. यासाठी टीम इंडियाला तिसऱ्या अाणि शेवटच्या निर्णायक वनडे सामन्यात यजमान इंग्लंडच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. दाेन्ही संघ अाता लीड्सवरील तिसऱ्या वनडे सामन्यात समाेरासमाेर असतील. या दाेन्ही संघांनी प्रत्येकी एका विजयासह तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधली. त्यामुळे अाता तिसऱ्या...
  July 17, 08:28 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- विंडीजविरुद्ध कसाेटी सामन्यातील गैरवर्तन श्रीलंकन संघाला चांगलेच महागात पडले. याप्रकरणी आयसीसीने कडक कारवाईचा बडगा उगारला. अायसीसीने साेमवारी श्रीलंका क्रिकेट संघाच्या कर्णधार दिनेश चांदिमल, प्रशिक्षक चंडिका हथारुसिंघा आणि व्यवस्थापक असंका गुरुसिंघावर नुकतीच बंदीची कारवाई केली. या सर्वांचे चार वनडे अाणि दाेन कसोटी सामन्यांसाठी निलंबन करण्यात अाले. गत महिन्यात श्रीलंका संघाने विंडीजविरुद्ध कसाेटी सामन्यादरम्यान गैरवर्तन केले. चांदिमलने चेंडूंशी छेडछाड...
  July 16, 09:16 PM
 • माॅस्को- १९९८चा जेता फ्रान्सने २० वर्षांनंतर दुसऱ्यांदा फिफा वर्ल्डकप जिंकला. क्रोएिशयाविरुद्ध फ्रान्सने रविवारी ४-२ असा विजय मिळवला. फ्रान्सकडून एंटोनी ग्रीजमॅन, पॉल पोग्बा, किलियन एम्बापे यांनी गोल केले. क्रोएशियाच्या मारियो मांजुकिचच्या ओनगोलचाही फ्रान्सला लाभ झाला. प्रथमच अंतिम फेरीत दाखल क्रोएिशयाकडून पेरिसिच व मांजुकिच यांनी गोल केले. १९६६ नंतरचा अंतिम फेरीतील हा सर्वात मोठा विजय ठरला. तेव्हा इंग्लंडने प. जर्मनीला ४-२ने हरवले होते. ब्राझीलने १९५८ मध्ये स्वीडनला ५-२ने पराभूत...
  July 16, 06:41 AM
 
जाहिरात

RECOMMENDED