जाहिरात
जाहिरात
Home >> Sports

Sports

 • नवी दिल्ली - टी-२० मालिकेतील अपयशातून सावरलेला यजमान भारतीय संघ आता वनडे मालिकेत पाहुण्या आॅस्ट्रेलियाला पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक आहे. भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला आज शनिवारपासून सुरुवात हाेत आहे. भारतासाठी ही विश्वचषकासाठीची तयारी करण्याची शेवटची संधी आहे. कारण, येत्या ३० मेपासून इंग्लंडमध्ये वनडेच्या वर्ल्डकपला सुरुवात हाेणार आहे. त्यामुळे या मालिकेच्या माध्यमातून आता टीम अव्वल कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल. तसेच भारतीय...
  March 2, 10:25 AM
 • लंडन - इंग्लंडचा माजी क्रिकेट कर्णधार अॅलिस्टर कुकला बकिंघम पॅलेसमध्ये नाइटहूड ही उपाधी देण्यात आली. तो १२ वर्षांनी हा सन्मान मिळवणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू बनला. यापूर्वी २००७ मध्ये इयान बोथमला हा सन्मान मिळाला होता. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीयने ३४ वर्षीय कुकला नाइटहूड पदकाने गौरवले. त्याने गेल्या सप्टेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने १६१ कसोटीत १२४७२ धावा केल्या.
  February 28, 12:34 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला ७ गड्यांनी पराभूत करत मालिका २-० ने आपल्या नावे केली. ऑस्ट्रेलियाने ११ वर्षांनी भारताला टी-२० मालिकेत हरवले. यापूर्वी २००८ मध्ये भरताला १-० ने मात दिली होती. ऑस्ट्रेलियाने १९१ धावांचे लक्ष्य २ चेंडू राखून गाठले. ग्लेन मॅक्सवेलने ५५ चेंडूत तुफानी फटकेबाजी करत नाबाद ११३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ सणसणीत चौकार व ९ उत्तुंग षटकार खेचले. तो सामनावीर आणि मालिकावीर ठरला. शॉर्टने ४० धावा आणि हँडकोम्बने नाबाद २० धावांचे...
  February 28, 12:19 PM
 • माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजा जिंके। या आेळींमधून ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेचा महत्व आणि गाेडा वर्णीला आहे. या मराठीचा गाेडवा अवीट असल्याचे जाणवते. याची गाेडी एेकलेल्या लागल्याशिवाय राहत नाही, याचाच प्रत्यय स्पेनमधील बार्सिलाेनाच्या याइझा दे लामाेच्या अस्सल मराठी बाेलण्यातून सहज येताे. व्यावसायकि छायाचित्रकार असलेली याइझा मराठीतील शब्द बाेलायला शिकली. याचे सारे काही श्रेय शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट राेहन श्रीरामवारला जाते....
  February 27, 10:51 AM
 • अमरावती - शासन व प्रशासनाचे कोणतेही पाठबळ नसल्यामुळे मित्रांकडून उसने पैसे घेऊन केरळच्या कन्नूर शहरात झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत (बाॅडी बिल्डींग) सहभागी झालेला अमरावतीचा बाॅडी बिल्डर विजय भोयरने परिश्रमपूर्वक कमावलेल्या पिळदार शरीराचे प्रदर्शन घडवून ९० िकलो वजन गटात सर्वसाधारण विजेतेपदासह मिस्टर इंिडया २०१९ िकताबावर ताबा िमळवला. ७५ िकलो गटात शुभम कडूने रौप्यपदक पटकावले. नुकताच मि. आशिया किताब पटकावणाऱ्या विजयने आजवर जागतिक, आशियाई, राष्ट्रीय, राज्य, विदर्भ व स्थानिक स्तरावर...
  February 27, 10:49 AM
 • दुबई - आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीच्या बैठकीला आज बुधवारपासून दुबई येथे सुरुवात हाेत आहे. ही बैठक २ मार्चपर्यंत चालणार आहे. यादरम्यान आगामी काळातील विविध स्पर्धांसह आयाेजनाच्या विषयावर चर्चा हाेईल. या बैठकीमध्ये भारत-पाक सामन्याचा विषय अधिक लक्षवेधी ठरणारा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून सीइआे राहुल जाेहरी हे या बैठकीदरम्यान उपस्थिती असतील. त्यामुळे ते पाकविरुद्ध सामना खेळण्याबाबतच्या विषयासह आपल्या संघाला विश्वचषकादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्याबाबत...
  February 27, 10:48 AM
 • बंगळुरू - भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा टी-२० सामना आज बुधवारी बंगळुरूच्या मैदानावर रंगणार आहे. सलामीच्या विजयाने पाहुणा आॅस्ट्रेलियन संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे या टीमची नजर आता मालिका विजयावर लागली आहे. मात्र, भारतीय संघाने गत ११ वर्षांपासून आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी-२०ची एकही मालिका गमावली नाही. त्यामुळे या दशकातील मालिका पराभवाची सिरीज खंडित करण्याचा आॅस्ट्रेलियन टीमचा प्रयत्न असेल. मात्र, त्यांना ही मालिका खंडित करण्यासाठी माेठी कसरत करावी लागेल. भारताला...
  February 27, 10:44 AM
 • विशाखापट्टणम - पॅट कमिन्सच्या (नाबाद ७) बळावर अाॅस्ट्रेलिया संघाने रविवारी शेवटच्या चेंडूवर यजमान भारतावर राेमहर्षक विजयाची नाेंद केली. अाॅस्ट्रेलिया संघाने तीन गड्यांनी सलामीचा टी-२० सामना जिंकला. यासह अाॅस्ट्रेलिया संघाने दाेन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अाघाडी घेतली. मालिकेतील दुसरा अाणि शेवटचा सामना बुधवारी हाेणार अाहे. भारताचा टी-२० च्या फाॅरमॅटमध्ये चाैथ्यांदा शेवटच्या चेंडुंवर पराभव झाला. बुमराहने टी-२० मध्ये ५० बळी पुर्ण केले. भारताला प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७...
  February 25, 10:03 AM
 • नवी दिल्ली - भारताची अाघाडीची खेळाडू अपूर्वी चंदेला घरच्या मैदानावरील नेमबाजीच्या विश्वचषकातील पहिल्याच दिवशी चमकली. तिने अव्वल कामगिरी करताना विश्वविक्रमाचा पल्ला गाठला. तिने यासह सुवर्णपदकाचा वेध घेतला. पहिल्या दिवशी साेनेरी यशाचा दुहेरी याेग तिने जुळवून अाणला. याच्या बळावर अपूर्वीने यजमान भारताला विश्वचषकातील पदकाचे खाते साेनेरी यशाने उघडून दिले. तिने १० मी. एअर रायफल प्रकारात चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. शनिवारपासून दिल्लीच्या डाॅ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर विश्वचषक...
  February 24, 11:56 AM
 • नवी दिल्ली - पुलवामा घटनेनंतर देशभरात पाकविरुद्ध प्रचंड संतापाची लाट पसरली अाहे. यातूनच सर्वच क्षेत्रात पाकला विराेध केला जात अाहे. यातूनच अाता क्रिकेटच्या विश्वातही हाच विराेध कायम अाहे. त्यामुळेच अागामी इंग्लंडमधील विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सामना खेळावा की नाही याबाबत चर्चा रंगत अाहे. याबाबत अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीअाय) काेणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतरच अापण याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे बीसीसीअायने स्पष्ट...
  February 23, 11:39 AM
 • मुंबई - यजमान भारतीय महिला संघाने घरच्या मैदानावर इंग्लंड संघावरचे निर्विवाद वर्चस्व शुक्रवारी कायम ठेवले. भारताने सलामी वनडेत इंग्लंडला ६६ धावांनी पराभूत केले. यासह भारताने सात वर्षानंतर (२०१२नंतर) सलग दुसऱ्या सामन्यात इंग्लंडवर मात केली. एकता बिस्टच्या (४/२५) धारदार गाेलंदाजीच्या बळावर भारताने ४१ षटकात विजयश्री खेचून अाणली. या विजयासह भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० ने अाघाडी मिळवली. अाता मालिकेतील दुसरा वनडे सामना साेमवारी हाेणार अाहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना...
  February 23, 10:05 AM
 • बार्बाडाेस - इंग्लंड संघाने गुरुवारी विंडीजविरुद्ध सलामी सामना जिंकून विक्रमाला गवसणी घातली. इंग्लंडने ६ गड्यांनी सलामीचा वनडे सामना जिंकला. यासह इंग्लंडने अापल्या वनडेच्या अातापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात माेठे लक्ष्य गाठण्याचा पराक्रम गाजवला. विंडीजने सलामीच्या वनडे सामन्यात इंग्लंडसमाेर विजयासाठी खडतर ३६१ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात इंग्लंडने ४८.४ षटकांत चार गड्यांच्या माेबदल्यात ३६४ धावा काढून विक्रमाची नाेंद केली. या विजयाच्या बळावर इंग्लंडने पाच वनडे...
  February 22, 12:31 PM
 • मुंबई - येत्या रविवारपासून भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील दाेन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेत आहे. त्यानंतर लगेच आठवडाभरात वनडे मालिका रंगणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वीच यजमान भारतीय संघाला माेठा धक्का बसला. टीममधील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याला पाठीच्या गंभीर दुखापतीमुळे या दाेन्ही मालिकांना मुकावे लागेल. त्यामुळे आता त्याच्या जागी रवींद्र जडेजाचा वनडे संघात समावेश करण्यात आला. मात्र, त्याच्या जागी टी-२० संघात अद्याप काेणालाही...
  February 21, 06:34 PM
 • मुंबई- येत्या २०१९ च्या विश्वचषकाच्या आयोजनासाठी आयसीसीने आयपीएल आणि जगभरात सुरू असलेल्या तत्सम लीग क्रिकेट स्पर्धेतील काही उत्तम कल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील सुमारे १५७ सदस्य देशांमधील क्रिकेटची विविध रूपे, अवतार आणि खेळले जाणारे स्वरूप या विश्वचषकाच्या निमित्ताने प्रकाशात आणण्यासाठी आयसीसीने आज नव्या प्रसार मोहिमेची घोषणा केली. शाळेत, रस्त्यावर, गल्लीबोळात, गॅलरीत, बीचेसवर, घराच्या परसामध्ये, एवढेच नव्हे, तर दिवाणखान्यात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटची छबी किंवा...
  February 21, 07:59 AM
 • दुबई- जगातील नंबर वन महिला टेनिसपटू नाओमी ओसाकाला दुबई ओपनच्या दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. ओकासाचा आपले प्रशिक्षक साशा बेजिन यांना बाजूला केल्यानंतरचा पहिला सामना होता. जपानची ओसाका गेल्या आठवड्यात आपल्या प्रशिक्षकांपासून दूर झाली. बेजिनच्या मार्गदर्शनात ओकासाने यूएस ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन असे दोन ग्रँडस्लॅम जिंकले. अव्वल मानांकित ओसाकाला फ्रान्सच्या क्रिस्टिना म्लादेनोविकने ६-३, ६-३ ने मात दिली. ओसाकाला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. आता क्रिस्टिनाचा सामना...
  February 21, 07:59 AM
 • औरंगाबाद-साईच्या अॅस्ट्रोटर्फ मैदानावर सुरू असलेल्या राष्ट्रीय ज्युनियर हॉकी स्पर्धेत गत विजेत्या हरियाणा संघाने शानदार प्रदर्शन करत बाद फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान मिळवणारा हरियाणा पहिला संघ ठरला. दुसरीकडे यजमान महाराष्ट्र संघाला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. यजमान संघाचे आता जवळपास आव्हान संपुष्टात आले आहे. तगड्या पंजाब संघाला चंदिगड संघाने बरोबरीत रोखले. बुधवारी झालेल्या सामन्यात दिल्ली हॉकी संघाने महाराष्ट्रावर १-० गोलने मात केली. सामन्यात...
  February 21, 07:48 AM
 • मुंबई- यंदा धूलिवंदनाच्या रंगोत्सवाने न्हाऊन निघालेल्या क्रिकेटच्या तमाम चाहत्यांसाठी टी-२० या छोट्या फॉरमॅटच्या थरारक सामन्यात रंगून जाण्याची संधी आहे. होळीनंतर १२ व्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. बीसीसीआयने सुरुवातीच्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यानुसार आता या सत्राच्या आयपीएलला २३ मार्चपासून सुरुवात होईल. या १४ दिवसांच्या वेळापत्रकानुसार ८ मैदानांवर एकूण १७ सामने होतील. यामधील सलामीच्या सामन्यात माजी...
  February 20, 08:54 AM
 • वॉशिंग्टन- माजी नंबर वन सेरेना विल्यम्सने दमदार पुनरागमन करताना जागतिक क्रमवारीमध्ये मोठी प्रगती साधली. तिने महिला एकेरीच्या क्रमवारीच्या टॉप-१० मध्ये धडक मारली. अमेरिकेच्या सेरेनाने ३४०६ गुणांसह दहावे स्थान गाठले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन नाओमी ओसाकाने अव्वल स्थान कायम ठेवले. तसेच रोमानियाची सिमोना हालेप ही दुसऱ्या स्थानावर आली. पुरुष गटात सर्बियाच्या नोवाक योकोविकने आपले अव्वल स्थान कायम ठेवले. स्विसकिंग रॉजर फेडररने सातव्या स्थानावर धडक मारली. तसेच स्पेनचा राफेल नदाल...
  February 20, 08:40 AM
 • औरंगाबाद- यजमान महाराष्ट्र युवा संघाला आपल्या घरच्या मैदानावरील ९ व्या राष्ट्रीय ज्युनियर हॉकी चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. यजमान टीमचा सोमवारी विजयी ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. पाहुण्या गंगपूर-ओडिशा टीमने सोमवारी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात यजमान महाराष्ट्राचा पराभव केला. ओडिशा टीमने २-१ अशा फरकाने सामना जिंकला. अमरदीप लाक्रा (३६ वा मि.) आणि ग्रेगोरी झेसने (५१ वा मि.) गोल करून आपल्या टीमचा विजय निश्चित केला. महाराष्ट्राकडून व्यंकटेश केचेने (२८ वा...
  February 19, 06:54 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - वेस्ट इंडीजचा तुफान फलंदाज ख्रिस गेल लवकरच निवृत्त होत आहे. आगामी क्रिकेट वर्ल्ड कप झाल्यानंतर तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेणार आहे. वेस्ट इंडीजच्या क्रिकेटरने ट्वीट करून यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. येत्या मे ते जुलै पर्यंत इंग्लंड आणि वेल्स येथे वर्ल्ड कप रंगणार आहे. 1999 मध्ये डेब्यू करणारा ख्रिस गेल वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक शतक लावणारा फलंदाज आहे. तो वेस्ट इंडीजचा ब्रायन लारानंतर सर्वाधिक धावा काढणारा क्रिकेटर आहे. 10 हजार धावा पूर्ण...
  February 18, 11:30 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात