जाहिरात
जाहिरात
Home >> Sports

Sports

 • ट्रेंटब्रिज - भारतीय संघातील सलामीवीर अभिनव मुकुंद याने वीरेंद्र सेहवागची जागा घेणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. मात्र, मुकुंदने इंग्लंडविरुद्धच्या बाकी सामन्यात चांगली कामगिरी करणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. सेहवागच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्याने तो या दुखापतीतून अजून सावरू शकलेला नाही. त्यामुळे गौतम गंभीरबरोबर सध्या अभिनव मुकुंद भारतीय डावाची सुरुवात करीत आहे. वेस्टइंडीज दौऱ्यावेळी संघात पदार्पण करणाऱा मुकुंद म्हणाला, सेहवागची जागा मी घेईल, असे कोणी म्हणाले तर ते...
  July 28, 02:29 PM
 • ट्रेंटब्रिज - इंग्लंडचा जलदगती गोलंदाज ख्रिस ट्रेमलेट भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सामन्यात दुखापतीमुळे खेळण्याची शक्यता कमी आहे. पहिल्या कसोटीत पराभव स्वीकाराव्या लागलेल्या भारतीय संघासाठी ट्रेमलेटच्या दुखापतीमुळे एक चांगली बातमी आहे. दुसरीकडे सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीर दुसऱ्या कसोटीसाठी तंदुरुस्त झाले आहेत. ख्रिस ट्रेमलेटला दुखापतीचा त्रास होत असल्याने तो बुधवारी सरावातही सहभागी झाला नव्हता. ट्रेमलेटने पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात चार बळी मिळविले होते....
  July 28, 01:34 PM
 • नवी दिल्ली - इंग्लंडविरुद्ध शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात झहीर खान खेळणार नसल्याचे स्पष्ट होत असताना आता हरभजन सिंगलाही खराब फॉर्ममुळे संघातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. लॉर्डस कसोटीत केलेल्या खराब कामगिरीमुळे हरभजनला संघाबाहेर ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.ट्रेंटब्रिज मैदानावर बुधवारी भारतीय संघ सराव करताना झहीर खान सहभागी झाला नव्हता. तसेच कर्णधार धोनीनेही झहीर खान दुसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याची शक्यता वर्तविली होती. हरभजनने पहिल्या कसोटीत...
  July 28, 01:13 PM
 • ट्रेंटब्रिज - लॉर्डस कसोटीत लाजिरवाणा पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय संघासाठी दुसऱ्या कसोटीपूर्वी एक आनंदाची बातमी आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सलामीवीर गौतम गंभीर दुसऱ्या कसोटीसाठी तुंदुरुस्त झाले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्या शुक्रवारपासून (२९ जुलै) दुसऱ्या कसोटी सामन्यास सुरवात होत आहे.स्नायू ताणले गेल्याने पहिल्या कसोटीतून बाहेर गेलेल्या झहीर खानच्या खेळण्याविषयी मात्र संदिग्धता आहे. झहीर दुसऱ्या कसोटीतून बाहेर गेल्यास एस श्रीसंतची संघात समावेश होण्याची शक्यता...
  July 28, 12:27 PM
 • शांघाय- आघाडीचा भारतीय जलतरणपटू संदीप शेजवळपाठोपाठ वीरधवल खाडेनेही फिना विश्व चॅम्पियनशिप जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आगामी लंडन ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवले आहे. पुरुषगटाच्या 100 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धा वीरधवलने 50.34 सेकंदात गाठून ऑलिम्पिक स्पर्धेचा कोटा पूर्ण केला. चीनमध्ये सुरू असलेल्या फिना विश्व चॅम्पियनशिप जलतरण स्पर्धेच्या 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये वीरधवल खाडेने शानदार कामगिरीचे प्रदर्शन केले. 50.34 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करून वीरधवल ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला...
  July 28, 04:52 AM
 • लंडन- इंग्लंड दौर्यावर आलेल्या पाहुण्या भारतीय संघाच्या अव्वल कामगिरीवरच सलामीच्या पराभवामुळे टीकेची तोफ डागली जात आहे. यजमान इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्याच कसोटी सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभवाची धूळ चाखावी लागली. याच पराभवामुळे भारतीय संघाची टीका अन् इंग्लंड संघाच्या कौतुकाची चर्चा चवीने केली जात आहे.भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा धक्का बसला. याच पराभवामुळे भारतीय संघावर...
  July 28, 04:46 AM
 • कॉलेज पार्क- महिला एकेरीतील पराभवाची मरगळ दूर सारून आघाडीची भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने महिला दुहेरीत श्वेदोवासोबत आक्रमक खेळी करत शानदार विजयी सलामी दिली. यजमान अमेरिकन टेनिसपटू बी. कोपेरा - एम. मोहम्मद या जोडीचा 1-6, 3-6 गुणांनी दारुण पराभव करून सानिया मिर्झा - श्वेदोवाने डब्ल्यूटीए हार्ड कोर्ट टेनिस स्पर्धेच्या दुसर्या फेरीत धडक मारली. या स्पर्धेत सानिया मिर्झाला महिला एकेरीच्या सलामीच्या लढतीतच पराभवाचा सामना करावा लागला.श्वेदोवासोबत सानियाची आक्रमक खेळीमहिला दुहेरीच्या...
  July 28, 04:32 AM
 • सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवागलादेखील जे आजपर्यंत जमलेले नाही ते भारतीय संघाच्या द वॉलने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत करून दाखवले. क्रिकेटची पंढरी म्हणून इंग्लंडच्या ज्या लॉर्ड्स मैदानाचा उल्लेख केला जातो आणि जिथे शतक ठोकणे भल्या भल्या फलंदाजांना शक्य झालेले नाही तिथे शतक केले म्हणजे तुमच्या महानतेवर जणू शिक्कामोर्तब होते. आषाढी वारीसाठी आलेल्या वारकयाला थेट विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मिळाल्यावर जो परमानंद होतो तितकाच सर्वोच्च दर्जाचा आनंद...
  July 28, 03:26 AM
 • नमस्कार माही!काय म्हणतोस ? कसा आहेस ? थोडा चिंतेत जरूर असशील. सर्व काही सुरळीत किंवा बरे चालले आहे, असे सध्यातरी म्हणता येणार नाही. लॉर्ड्सवरील पराभव बोचत असेल तुला. बोचणारच. हा पराभव सहजासहजी विसरला जाणे शक्यही नाही. याला जबाबदारही तूच आहेस. इंग्रजांच्या त्यांच्या घरात घुसून बदडून काढण्याची चांगली संधी तुझ्याकडे होती. तू ती गमावलीस. आता पुढच्या एखाद दुसया सामन्यात झुंज देऊन विजय मिळविला तरीही एवढा फायदा होणार नाही. लॉर्ड्सवर इंग्लंडला धूळ चारली असती तर तो पराभव केवळ इंग्लंड संघाच्याच...
  July 28, 03:21 AM
 • लंडन - लॉर्डस कसोटीतील इंग्लंडची प्रभावशाली कामगिरी पाहता इंग्लंडमध्ये भारताला पछाडून कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान विराजमान होण्याचा दर्जा असल्याचे, मत दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू ऍलन डोनाल्ड यांनी व्यक्त केले आहे.डोनाल्ड म्हणाला, इंग्लंडमध्ये अव्वल संघ बनण्याची गुणवत्ता आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने चांगली कामगिरी केली. इंग्लंडचा संघ प्रत्येक सामन्यागणिक आपल्या खेळात सुधारणा करीत आहे. स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस ट्रेमलेट, जेम्स अँडरसन आणि ग्रॅमी स्वान हे सध्या...
  July 27, 05:51 PM
 • लंडन - इंग्लंडचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी इंग्लंडचा फिरकीपटू माँटी पानेसर याला सचिन तेंडुलकरला नेट प्रॅक्टीसवेळी मदत न करण्यास सांगितले आहे.फ्लॉवर म्हणाले, पानेसरने लॉर्डस कसोटीपूर्वी सचिनला नेट प्रॅक्टीस करताना मदत केली होती. त्यामुळे मला वाटतेय की संघातील कोणत्याही खेळाडूने विरोधी संघातील खेळाडूला मदत करणे चुकीचे आहे. पानेसरशी मी या विषयाबाबत बोलणार असून, मला आशा आहे की तो यापुढे असे करणार नाही. चार सामन्यांपैकी एक सामना आम्ही जिंकला असून, शुक्रवारपासून सुरु होणारा दुसरा...
  July 27, 04:51 PM
 • नवी दिल्ली - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर की मेजर ध्यानचंद यांच्यापैकी कोणाला देशातील सर्वोत्तम पुरस्कार 'भारतरत्न' मिळावा याविषयी चर्चा सुरु असताना, अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने माझे वडील प्रकाश पदुकोण यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केली आहे. प्रकाश पदुकोण हे दिग्गज बॅडमिंटन खेळाडू आहेत.दीपिकाला सचिन की ध्यानचंद यांच्यापैकी कोणाला भारतरत्न मिळावा, असे विचारले असता तिने मी माझ्या वडिलांवर खूप प्रेम करते त्यामुळे त्यांनाच हा पुरस्कार मिळावा असे म्हटले. मात्र, नंतर तिने...
  July 27, 03:59 PM
 • ब्राझीलिया - ब्राझीलचा महान फुटबॉलपटू पेले यांची २०१४ मध्ये होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष दिलमा रोसेफ यांनी पेलेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पेले यांनी आपल्याला हा सन्मान आपल्यासाठी गर्वाची बाब असल्याचे म्हटले आहे. पेले म्हणाले, ब्राझीलसाठी १९५८ साली पहिल्यांदा विश्वकरंडक खेळल्यानंतर कायमच ब्राझीलमध्ये फुटबॉल खेळाचे प्रमोशन करण्यासाठी मी तयार असतो. ही माझ्यावरील मोठी जबाबदारी असून, ही जबाबदारी मी...
  July 27, 02:21 PM
 • लंडन - लॉर्डसवरील विजयामुळे उत्साहीत झालेला इंग्लंडचा कर्णधार ऍण्ड्रयू स्ट्रॉस याने इंग्लंड लवकरच भारताचे कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान मिळविण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे.'द टेलिग्राफ' या वृत्तपत्रात स्ट्रॉसने लिहिल्यानुसार, क्रमवारीत अव्वल होण्यासाठी आमच्या संघाला प्रत्येक संधीचा फायदा घेणे आवश्यक आहे. सांघिक प्रदर्शनामुळेच आम्हाला यश मिळाले आणि आता कोणत्याही संघासमोर कमी नाही. भारताविरुद्ध पहिल्या कसोटी पाहिल्या डावात ४७४ धावा केल्यानंतर आमच्या गोलंदाजांनी चांगली...
  July 27, 01:47 PM
 • मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी हरभजन सिंगच्या ऐवजी अमित मिश्राचा संघात समावेश करावा, असे पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रम याने म्हटले आहे.भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्यास ट्रेंट ब्रिज येथे २९ जुलैपासून सुरु होणार आहे. हरभजनने पहिल्या कसोटी सामन्यात ५६ षटकांची गोलंदाजी करीत फक्त एक बळी मिळविला. अक्रम म्हणाला, लॉर्डसवर हरभजनच्या गोलंदाजीत कोणतीच धार दिसली नाही. त्याचे चेंडू जास्त वळत नव्हते आणि त्याला योग्य दिशाही नव्हती. त्यामुळे मला वाटतेय...
  July 27, 01:32 PM
 • जकार्ता - भारताची युवा स्टार खेळाडू पी.व्ही. संधूने इंडोनेशिया आंतरराष्ट्रीय चॅलेंज 2011 बॅडमिंटन स्पध्रेत महिला एकेरीच्या फायनलमध्ये अव्वल मानांकित इंडोनेशियाच्या फ्रान्सिस्का रत्नासारीला पराभूत करून विजेतेपद पटकावले. या विजयासह तिने भारतीय बॅडमिंटनमध्ये नवा इतिहास रचला. स्पध्रेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार स्पध्रेच्या फायनलमध्ये संधूने जागतिक क्रमवारीत 35 व्या क्रमांकावर असलेल्या रत्नासारीला अवघ्या 40 मिनिटांत 21-16, 21-11 ने पराभूत करून बाजी मारली. या विजयासह तिने सुवर्णपदक आपल्या...
  July 27, 12:29 PM
 • नवी दिल्ली - गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत महिला भारत्तोलनात सुवर्णपदक जिंकणारी भारताची युवा खेळाडू रेणुबाला चानू क्रीडा मंत्रालयावर जाम नाराज झाली आहे. यंदा जाहीर झालेल्या अर्जुन पुरस्काराच्या यादीत आपले नाव नसल्याने ती नाराज झाली आहे. या नाराजीमुळे तिने आपले पदक क्रीडा मंत्रालयाला परत करण्याची धमकी दिली आहे. चानूने गेल्या वर्षी 58 किलो वजन गटात बाजी मारली होती.
  July 27, 12:26 PM
 • नवी दिल्ली - इंग्लंडविरुद्ध लॉर्डस मैदानावरील पराभवामुळे भारताच्या क्रिकेटमधील वर्चस्वाला उतरती कळा लागल्याची टीका इंग्लंडचे माजी कर्णधार आणि समालोचक जेफ्री बॉयकॉट यांनी केली आहे. पहिल्या कसोटीप्रमाणेच भारताचा दुसऱ्या कसोटीतही पराभव होईल, असे त्यांनी म्हटले आहे.बॉयकॉट म्हणाले, लॉर्डसवरील पराभवातून हे दिसत होते की, भारताची अव्वल स्थानावरून खाली उतरण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही संघातील फलंदाजांमध्ये जास्त अंतर नाही. पण, भारतीय फलंदाज आपली कामगिरी सुधारण्याची शक्यता आहे. झहीर खान...
  July 27, 12:10 PM
 • सिडने- पुढच्या महिन्यात सुरू होत असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय उपखंडात होणार्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी कांगारूंच्या संघात चार नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. फिल ह्युजेसकडे शेन वॉटसनचा सलामीचा जोडीदार म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ऑफस्पिनर नॅथन लॉयन, फलंदाज शॉन मार्श, युवा वेगवान गोलंदाज ट्रेंट कोपलँड आणि जेम्स पँटिंसन यांचा 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, याच वेळी...
  July 27, 04:37 AM
 • लंडन- लॉर्ड्सवर झालेल्या इतिहासातल्या 2000 व्या कसोटी सामन्यात सध्या जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेल्या टीम इंडियाचा 196 धावांनी लाजिरवाणा पराभव झाला. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पराभवाचे खापर नशिबावर फोडले आहे. खेळाडूंच्या दुखापतीनंतर सर्व काही चुकतच गेले, असे माहीने सामन्यानंतर म्हटले. याशिवाय चेंडूला अनियमित उसळी देणार्या लॉर्ड्सच्या खेळपट्टीनेही घात केला, असेही त्याने स्पष्ट केले.2007 च्या आणि आताच्या मालिकेत आम्ही फरक बघितला. तो फरक आहे लॉर्ड्सच्या खेळपट्टीवरील...
  July 27, 04:28 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात