जाहिरात
जाहिरात
Home >> Sports

Sports

 • लंडन- लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावांत अपयशी ठरणारा भारताचा स्टार फलंदाज सचिन तेंडुलकरची आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत दोन स्थानांनी घसरण झाली आहे. मात्र, पहिल्या डावात शतक झळकाविणार्या राहुल द्रविडने सात स्थानांच्या प्रगतीसह टॉप 20 मध्ये स्थान पटकाविले आहे.ऑफस्पिनर हरभजन सिंगलाही सुमार गोलंदाजीचा फटका बसला. तो अव्वल दहा गोलंदाजांच्या यादीतून बाहेर झाला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंराज जेम्स अँडरसनने सामन्याच्या अखेरच्या दिवशी पाच विकेट घेतल्या. याचा त्याला लाभ झाला....
  July 27, 04:23 AM
 • लॉर्ड्स, लंडन- अलीकडच्या काळात पाऊस पडतोय आणि तो थांबल्यानंतर क्रिकेट सामना लागलीच सुरू झाल्याची फारशी उदाहरणे सापडत नाहीत. लॉर्ड्सवर मात्र पाऊस थांबताच तत्काळ खेळ सुरू करता येतो. याचे प्रमुख कारण म्हणजे लॉर्ड्सचे आगळेवेगळे मैदान. या मैदानावर 2003 मध्ये वाळूमिर्शित माती टाकण्यात आली. ही वाळू अतिशय उत्तम दर्जाची आणि महागडी होती. मात्र, त्याचा लाभ लॉर्ड्स स्टेडियमला झाला. आता वर्षाचे 365 दिवस तेथे क्रिकेट होऊ शकते. कित्येक वर्षांपासूनचे मैदान खणून काढताना त्यांनी शतकापासून राखलेल्या...
  July 27, 04:18 AM
 • थेट लंडनहून- इंग्लंडला मालिकेत हवी असलेली वेगवान आघाडी मिळाली. भारतीय संघ मात्र पराभवावर मलमपट्टी करण्याऐवजी निर्धास्तपणे वावरत होता. सामन्यानंतर पराभवाचे पृथक्करण करण्याऐवजी काही खेळाडू बारमध्ये, काही खेळाडू नाइट क्लबकडे रवाना झाले. काही खेळाडूंनी सेंट जेम्स कोर्ट हॉटेलच्या मधली चिंचोळी गल्ली पकडली. काही खेळाडू मैत्रिणींसमवेत गप्पा-टप्पा करण्यात मग्न होते.भारतीय संघ व्यवस्थापनाने दोन दिवसांवर आलेल्या दुसर्या कसोटीसाठी कोणती योजना आखली आहे? जहीर खान तंदुरुस्त नाही. गत दौर्यात...
  July 27, 04:11 AM
 • लंडन- भारताला लॉर्ड्स कसोटी तब्बल 196 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. क्रिकेटची पंढरी म्हणून गणल्या जाणार्या या मैदानावर कसोटीतील नंबर वन असलेल्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारताकडून चार खेळाडू खलनायक ठरले. वेगवान गोलंदाज जहीर खाने सर्वात आधी संघाला अडचणीत आणले. यानंतर कर्णधार धोनी, गौतम गंभीर आणि हरभजन सिंग यांनी मोठी गोची केली.या पराभवामुळे टीम इंडियाचे कसोटीतील नंबर वनचे स्थान धोक्यात आले आहे. या मालिकेत भारताला अजून तीन सामने खेळायचे आहेत. जर पुढच्या दोन्ही...
  July 27, 04:07 AM
 • दुबई - लॉर्डस कसोटीत दोन्ही डावांत शतक झळकाविण्यात अपयशी ठरलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑफस्पिनर हरभजन सिंग यांची आयसीसी जागतिक कसोटी क्रमवारीत घसरण झाली आहे. तर राहुल द्रविडने सात स्थानांची प्रगती करीत पहिल्या २० खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे.हरभजनला आपली कमाल दाखविता न आल्याने त्याला पहिल्या दहा गोलंदाजांच्या यादीतून बाहेर जावे लागले आहे. तर भारताच्या दुसऱ्या डावात पाच बळी घेणाऱ्या अँडरसन कारकिर्दीतील सर्वोच्च स्थानी पोचला आहे. तो सध्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या...
  July 26, 06:47 PM
 • लंडन - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात स्नायू ताणले गेल्याने मैदानाबाहेर जावे लागलेला झहीर खान दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी संघात एस. श्रीसंतचा समावेश केल्याचे कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने सांगितले. झहीर खेळणार नसल्याने भारतासमोरील अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.दुसरा कसोटी सामना सुरु होण्यास तीन दिवस शिल्लक असले तरी झहीरची दुखापत पाहता तो तंदुरुस्त होईल असे वाटत नसल्याचे धोनीने सांगितले. त्यामुळेच झहीरच्या जागी संघात एस. श्रीसंतची निवड करण्यात...
  July 26, 05:04 PM
 • लंडन - भारताला पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून १९६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार धोनीने या पराभवाची जबाबदारी स्वीकारण्याची ऐवजी भारतीय संघातील खेळाडूंच्या दुखापतींना पराभवासाठी जबाबदार धरले आहे.धोनी म्हणाला, सामन्याच्या सुरवातीपासूनच आम्ही झहीर खानसारख्या मुख्य गोलंदाजाला दुखापतीमुळे मुकलो. तसेच हरभजनच्या फिरकीला खेळपट्टीकडून मदत मिळत नव्हती. सचिनला तापाने हैराण केले होते. तर गंभीरच्या कोपऱ्याला चेंडू लागल्याने तो दुखापतग्रस्त झाला. दुसऱ्या डावात गंभीरचा...
  July 26, 03:43 PM
 • लंडन - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर शतकांचे शतक पूर्ण करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस मैदानावर सचिनला शतक करण्याची संधी होती. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांनी सचिनला शतक करण्यापासून रोखण्यासाठी प्लॅन आखले होते आणि त्यात ते यशस्वी झाले.सचिन लॉर्डसवर शतक तर दूरच पण अर्धशतकही करू शकला नाही. पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉडने सचिनला अखूड टप्प्याची गोलंदाजी करण्यास सुरवात केली. ब्रॉडचे पाहून इंग्लंडच्या इतर गोलंदाजांनीही सचिनला अखूड टप्प्याचे आणि...
  July 26, 02:47 PM
 • नवी दिल्ली - भारताला पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून १९६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस मैदानावर कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. भारताच्या या पराभवासाठी प्रामुख्याने चार खेळाडू व्हिलन ठरले आहेत.भारताला सर्वात मोठा धोका झहीर खानने दिला आहे. तर कर्णधार महेंद्रसिंह दोनी आणि गौतम गंभीर आणि हरभजन सिंग या चार खेळाडूंचा भारताच्या पराभवात मोठा वाटा आहे. या चार खेळाडूंबरोबरच भारताच्या पराभवामागील पाच प्रमुख...
  July 26, 02:08 PM
 • लंडन - शरद पवार ज्या संस्थेवर काम करतात तेथे आपली छाप सोडतात. आयसीसीच्या अध्यक्षपदाची धुरा वाहतानाही त्यांनी क्रिकेटच्या ग्लोबल प्रसारासाठी काही लक्ष्ये आयसीसीसमोर ठेवली आहेत. आज लॉर्ड्सवर दिव्य मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यापैकी काही योजना आणि उद्दिष्ट्ये त्यांनी सांगितली.क्रिकेटचा फुटबॉलप्रमाणे जगभर प्रसार, प्रचार करण्याची योजना आहे. त्यासाठी आयसीसीने चीन आणि अमेरिका या दोन देशांवर क्रिकेटला व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठा पाठिंबा मिळेल. त्यापैकी अमेरिकेत क्रिकेट काही...
  July 26, 12:49 PM
 • नवी दिल्ली - सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या एटीपी क्रमवारीत भारताचा एकेरीचा स्टार खेळाडू सोमदेव देववर्मनने सहा स्थानांची प्रगती केली. यासह तो कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ 62 व्या स्थानी पोहोचला. याच वेळी भारताची महिला खेळाडू सानिया मिर्झाने क्रमवारीत दोन स्थानांनी प्रगती केली.सोमदेव एकेरीच्या क्रमवारीत आधी 68 व्या स्थानी होता. मात्र, आता तो 62 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या कारकीर्दीतील ही आतापर्यंतची सवरेत्तम क्रमवारी ठरली आहे. पुरुष दुहेरीत संघांच्या क्रमवारीत लिएंडर पेस आणि...
  July 26, 12:46 PM
 • नवी दिल्ली - हॉकी इंडिया आणि भारतीय हॉकी महासंघ (आयएचएफ) यांच्यादरम्यान आज आठ तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर दोघांचे विलीनीकरण झाले नाही. मात्र, या दोघांनी हॉकीच्या भल्यासाठी संयुक्तपणे काम करण्याची तयारी दर्शवली आहे.भारतीय हॉकीतील या दोन्ही संघटनांना विलीनीकरणासाठी केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी सोमवारपर्यंत मुदत दिली होती. माकन कामात व्यग्र असल्याने या बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत.बैठकीला सकाळी 11 वाजता प्रारंभ झाला. ही बैठक सायंकाळी जवळपास 7 वाजता संपली. हॉकी इंडियाचे...
  July 26, 12:43 PM
 • लंडन - लॉर्ड्स कसोटीच्या दुसर्या डावात दमदार गोलंदाजी करणारा भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने कामगिरीचे श्रेय संघाचा अनुभवी गोलंदाज झहीर खानला दिले आहे. मला लॉर्ड्सच्या खेळपट्टीवरील उताराचा फायदा घ्यायचा होता. यासाठी मी पॅव्हेलियन एंडकडून गोलंदाजी केली. मात्र, मी दुसर्या टोकाने गोलंदाजी करावी, असे झहीरला वाटत होते. पहिल्या डावात मी माझ्या मनाप्रमाणेच गोलंदाजी केली. मात्र, दुसर्या डावात मी झहीरचे ऐकले. याचा परिणाम दिसलाच आहे, असे ईशांतने या वेळी सांगितले.पहिल्या डावात ईशांतला...
  July 26, 12:41 PM
 • येथे पार पडलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेच्या फायनलमध्ये उरुग्वे संघाने शानदार कामगिरी करून पेराग्वे संघाला नमवित स्पध्रेचे विजेतेपद पटकाविले. लुई सुआरेज आणि डिएगो फॉरलॉन यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर उरुग्वेने रोमांचक सामन्यात पेराग्वेवर 3-0 ने मात केली.या विजयासह उरुग्वेने विक्रमी 15 व्यांदा या स्पध्रेचे विजेतेपद पटकाविले आहे.लीव्हरपूलचा स्ट्रायकर सुआरेजने सामन्याच्या 12 व्या मिनिटाला पहिला गोल करून संघाला 1-0 ने आघाडी मिळवून दिली.याच्या अवघ्या काही मिनिटानंतर फॉरलॉनने...
  July 26, 06:58 AM
 • कसोटी क्रिकेटच्या ऐतिहासिक 2000 वी आणि उभय संघातील 100 व्या लॉर्ड्स कसोटीत विजयासाठी ठेवलेल्या 458 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या 261 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडने ही कसोटी 196 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.सामना वाचविण्यासाठी भारताची मदार सुरेश रैनावर टिकून होती. रैनाने 78 धावांची झुंजार खेळी केली. त्याने 136 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार मारले. रैनाचा अडथळा अँडरसनने दूर केला. अखेरचा गडी ईशांत बाद झाला त्यावेळी भारताला विजयासाठी आणखी 197 धावांची गरज होती. पहिल्या...
  July 26, 05:42 AM
 • लंडन - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस मैदानावर शतक करण्याची संधी हुकली. सचिनने पहिल्या डावात ३४ आणि दुसऱ्या डावात १२ धावा केल्या. सचिनला मोठी धावसंख्या उभारण्यात येत असलेल्या अपयशामागे त्याने बदललेली बॅट असल्याचे बोलले जात आहे.सचिनने २०१० साली चांगली कामगिरी करीत गेल्या २० वर्षातील सर्वांधिक धावा केल्या होत्या. सचिनच्या या चांगल्या कामगिरीमागे त्याची लकी बॅट कारणीभूत असल्याचे बोलले जात होते. मात्र, सचिनने आपली बॅट बदलली असून, बॅट बरोबर...
  July 25, 07:55 PM
 • लंडन - इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन याने भारतीय संघ थकला असून, या थकव्याला आयपीएल जबाबदार धरले आहे. आयपीएलनंतर भारतीय खेळाडू पूर्ण क्षमतेने खेळू शकलेले नाहीत, त्यामुळे इंग्लंडचा संघ वरचढ ठरत असल्याचे हुसनने म्हटले आहे. 'द डेली मेल' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हुसेन म्हणाला, पहिल्या कसोटीतील भारताची कामगिरी पाहता संघ थकल्याचे स्पष्ट दिसत आहे. वेस्टइंडीज दौऱ्यात चांगली कामगिरी करणारे ईशांत शर्मा, प्रवीण कुमार आणि राहुल द्रवीड हेच इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करीत आहेत. इतर...
  July 25, 06:44 PM
 • सिडनी - ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या बिग बॅश स्पर्धेतून क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करणार आहे. बिग बॅश स्पर्धेत सहभागी असलेल्या ब्रिस्बेन हीट या संघातून हेडन मैदानात उतरणार आहे. हेडनने ३९ व्या वर्षी जानेवारी २००९ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. या स्पर्धेतील सहभागाबरोबरच हेडनने आपण संघाच्या मालकीत काही हिस्सा खरेदी करण्याच्या विचारात असल्याचेही सांगितले. स्थानिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची माझी...
  July 25, 05:13 PM
 • नवी दिल्ली - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटमधील शतकांच्या शतकांची प्रतीक्षा कोट्यवधी क्रिकेटप्रेमींबरोबर जाहिरात कंपन्यांनाही आहे. सचिनच्या शतकानंतर कशाप्रकारे मार्केटींग करायचे हे जाहिरात कंपन्यांनी पूर्वीपासूनच ठरवून ठेवले आहे. काही कंपन्यांनी सचिनच्या नावावर स्कीम चालविण्याचे, तर काहींनी त्याच्या नावाची उत्पादने बाजारात आणण्यास सुरवात केली आहे. अवीवा या वीमा कंपनीने सचिनला भेटण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. सचिनला भेटण्याची प्रत्येकाची इच्छा असते. अशातच या...
  July 25, 04:46 PM
 • कसोटी क्रिकेटच्या ऐतिहासिक 2000 वी आणि उभय संघातील 100 व्या लॉर्ड्स कसोटीत विजयासाठी ठेवलेल्या 458 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या 261 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडने ही कसोटी 196 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.सामना वाचविण्यासाठी भारताची मदार सुरेश रैनावर टिकून होती. रैनाने 78 धावांची झुंजार खेळी केली. त्याने 136 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार मारले. रैनाचा अडथळा अँडरसनने दूर केला. अखेरचा गडी ईशांत बाद झाला त्यावेळी भारताला विजयासाठी आणखी 197 धावांची गरज होती. पहिल्या...
  July 25, 04:11 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात