Home >> Sports

Sports

 • पॅरिस - फ्रेंच ओपन टेनिस स्पध्रेत महिला एकेरीचा अंतिम सामना चीनची ली ना आणि इटलीची फ्रान्सेस्का शियावोन यांच्यात शनिवारी रंगणार आहे. या दोघींनी आज आपापले उपांत्य सामने जिंकून फायनलमध्ये धडक दिली.चीनची आघाडीची महिला टेनिसपटू ली ना हिने आज फ्रेंच ओपनमध्ये जबरदस्त कामगिरी करताना फायनलमध्ये धडक मारली. लीने रशियाची टेनिस सुंदरी मारिया शारापोवाचे अभियान रोखले. फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकाविणारी पहिली आशियाई खेळाडू बनण्यापासून ली अवघ्या एका पावलाने दूर आहे.लीने विजेतेपदाची प्रबळ दावेदार...
  June 3, 03:44 AM
 • गौतम गंभीरला खांद्याच्या दुखापतीमुळे वेस्टइंडीज दौऱ्यातून माघार घ्यावे लागल्याने आयपीएलला देशापेक्षा जास्त महत्त्व देत असल्याची गंभीरवर टीका करण्यात आली. आता गंभीरच्या समर्थनात भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली उतरला असून, त्याने आयपीएलकडे दुर्लक्ष करणे अशक्य असल्याचे म्हटले आहे.गांगुली म्हणाला, आयपीएलमध्ये खेळताना कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त होऊ शकतो आणि त्याला आराम करण्याचा पूर्ण अधिकार आहे. खेळाडूसुद्धा एक माणूस आहेत. खेळाडू आयपीएलला देशापेक्षा जास्त महत्त्व देतात,...
  June 2, 08:54 PM
 • विश्वकरंडक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य असलेला मध्यमगती गोलंदाज झहीर खान याने शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी झहीर खान साई संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. काहि दिवसांपूर्वी वेस्टइंडीज दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा कर्णधार सुरेश रैना याने साईबाबांचे दर्शन घेतले होते.
  June 2, 08:10 PM
 • इस्लामाबाद - पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक वकार युनूस यांनी आपले शाहिद आफ्रिदी कोणतेही वैर नसून, आफ्रिदीच्या निवृत्तीविषयीच्या निर्णयाने आपण निराश झाल्याचे म्हटले आहे.'द न्यूज' वृत्तपत्राशी बोलताना वकार म्हणाला, मी पीसीबीच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दौरा अर्धवट ठेऊन आलो होतो. त्यामुळे आफ्रिदीविषयी झालेल्या वादावर मी जास्त बोलू शकत नाही. मात्र, आमच्या दोघांमध्ये कधीच वाद नव्हता. वेस्टइंडीज दौऱ्यावर घडलेल्या घडामोडींचा अहवाल देण्यासाठी वकार आर्यलंड दौरा अर्धवट सोडून...
  June 2, 07:09 PM
 • ऍन्टिगा - भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात चार जूनपासून सुरु होणाऱ्या मालिकेत पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागणारी (यूडीआरएस) प्रणाली लागू न करण्याची बीसीसीआयची मागणी वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने स्वीकारली आहे.बीसीसीआय़ने वेस्टइंडीज क्रिकेट मंडळाकडे ही प्रणाली लागू न करण्याची विनंती केली होती. यानुसार वेस्टइंडीज मंडळाचे प्रवक्त्यांनी भारताविरुद्धच्या टवेंटी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत ही प्रणाली लागू नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत ही प्रणाली लागू करण्यात...
  June 2, 06:44 PM
 • मुंबई - वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी सुरेश रैनाची निवड झाल्याने त्याचे नशीब जोरावर असल्याची चर्चा आहे. आता शिर्डी येथे दर्शनासाठी गेलेल्या सुरेश रैनाबरोबर केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पूर्णा पटेल दिसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.भारतीय संघातील अनेक खेळाडूंची नावे आतापर्यंत अभिनेत्री, मॉडेल यांच्याशी जोडली गेलेली आहेत. सुरेश रैना यापासून आतापर्यंत अलिप्त होता. मात्र, आता रैनाही पूर्णा पटेल हिच्याबरोबर थेट साईबाबांचे दर्शन घेताना...
  June 2, 01:41 PM
 • रांची - भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी सुमारे चार महिन्यानंतर पत्नी साक्षीसह रांची येथील आपल्या निवासस्थानी परतला. या दोघांचे रांचीतील विमानतळावर समर्थकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.विश्वविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या धोनीच्या स्वागत जोरदार करण्यात आले. यापूर्वी रांचीमध्ये धोनी फेब्रुवारीमध्ये राष्ट्रीय स्पर्धांच्यावेळी आला होता. विमानतळाहून ते दोघे हरमू येथे असलेल्या आपल्या निवासस्थानी पोचले. धोनीचा नवा आवतार पाहुन सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का बसला. धोनी...
  June 2, 01:01 PM
 • पॅरीस - गत वर्षभरापासून आपल्या चमकदार कामगिरीच्या बळावर पात्रता फेरीची पायरी ओलांडून फ्रेंच ओपनमध्ये प्रवेश केलेल्या सानिया, ली ना व मारियन बार्टोली यांनी वेगळाच ठसा उमटवला. दुहेरीपाठोपाठच एकेरीत या नवख्या त्रिकूट महिला टेनिसपटूंनी विजयी आघाडी घेऊन फ्रेंच ओपनमध्ये आपला दबदबा निर्माण केला. त्यामुळे आघाडीच्या महिला टेनिसपटूंचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. एकेरीतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर सानियाने दुहेरीत एलेनासोबत पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.एकेरीतील पराभवातून...
  June 2, 11:19 AM
 • मुंबई - सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत टीम इंडिया वेस्ट इंडीज दौऱ्यावर रवाना झाली. या दौऱ्यावर टीम इंडिया १ टी-२0, पाच एकदिवसीय आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे.सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टहून रात्री अडीच वाजता लंडन मार्गे बार्बाडोसला रवाना झाला. भारतीय संघाला त्रिनिदाद येथे ४ जून रोजी एकमेव टी-२0 सामना खेळायचा आहे. यानंतर ६ व ८ जून रोजी त्रिनिदाद व ११ आणि १३ जून रोजी अँटिग्वा येथे वनडे सामने होतील. वनडे...
  June 2, 11:16 AM
 • मुंबई - भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ३१ मे हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. इंडियन क्रिकेट लीग (आयसीएल) या बंडखोर क्रिकेट लीगचा सेनानी कपिलदेव आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचे सर्व पदाधिकारी या दिवशी एकत्रितपणे व्यासपीठावर होते. भारतीय क्रिकेट बोर्डाने सत्कार सोहळ्यायासाठी १९८३ च्या विजेत्या भारतीय संघाला आणि त्यांचा कप्तान कपिलदेवला आमंत्रित केलं होतं. कपिलदेवने दिलखुलासपणे या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि तो मुंबईत झालेल्या या सोहळ्याला उपस्थितही राहिला होता. 'दिव्य मराठी'च्या...
  June 2, 11:09 AM
 • मुंबई - भारताची बॅडमिंटन 'स्टार' सायना नेहवाल आणि तिचे प्रशिक्षक माजी ऑल इंग्लंड विजेते पुल्लेला गोपीचंद यांच्यात नुकतीच दिलजमाई झाली. सायनाला घडविणाऱ्या गोपीचंद यांच्यापासून गेले कित्येक महिने ती अंतर राखून होती. गोपीचंद यांचे सहायक भास्कर हेच तिला मार्गदर्शन करीत होते. चीनमध्ये ग्वांसी येथे नुकत्याच झालेल्या सुर्दीमान कप बॅडमिंटन स्पर्धेत सायना-गोपीचंद ही गुरू-शिष्यांची जोडी एकत्र आली. त्या दौऱ्यादरम्यान दोघांमधील मतभेद दूर झाले. चीनहून परतलेल्या गोपीचंद यांनी 'दिव्य मराठी'शी...
  June 2, 11:02 AM
 • पॅरिस - जागतिक क्रमवारीत सातवी मानांकित रशियन टेनिसपटू मारिया शारापोवा व चीनची ६ वी मानांकित टेनिसपटू ली ना यांनी फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत शानदार प्रवेश केला. भारताच्या 'इंडो-पाक' रोहन बोपन्ना-कुरेशी या जोडीला दुहेरीत पराभवाचा धक्का बसला. शारापोवाची विजयी आघाडीमहिला एकेरीत जर्मनीच्या अंद्रा पेकोविकविरुद्ध मारिया शारापोवा यांच्यात शर्थीची लढत झाली. विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मारियाने २७ च्या कामगिरीला उजाळा दिला. पहिल्या सेटवर शारापोवाने आक्रमक खेळीचे शानदार...
  June 2, 10:55 AM
 • लंडन - पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाकशी इंग्लंडचा कौंटी संघ लिसेस्टरशायर संघाने आगामी सत्रासाठी करार केला आहे. आगामी एफएल टी-२0 स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेऊन क्लबने हा करार केला आहे. रज्जाक ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ऍण्ड्र्यू मॅकडोनाल्डसोबत खेळणार आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणच्या जागी रज्जाकची निवड करण्यात आली आहे. ३१ वर्षीय रज्जाकने ४६ कसोटी, २६२ वन-डे आणि २६ टी-२0 सामने खेळले आहेत. यापूर्वी रज्जाकला हॅम्पशायर, सरे, वॉरविकशायर, मिडिलसेक्सकडून खेळण्याचा...
  June 2, 10:45 AM
 • लंडन - वर्षभरापासून झंझावाती फलंदाजीच्या बळावर ७ शतके ठोकून दोन हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्या जॉन ट्रॉटला यंदाचा इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या वतीने देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा बहुमान मिळाला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या मतदानातूनच हा पुरस्कार खेळाडूंना दिला जातो. २१ या वर्षभरात ट्रॉटने ६८.४ च्या सरासरीने फटकेबाजीचे प्रदर्शन करत २२४६ धावा पूर्ण केल्या आहेत. यामध्ये शानदार ७ शतकेही ठोकली आहेत. तसेच बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस मालिकेतही चमकदार कामगिरी केली...
  June 2, 10:40 AM
 • टेनिसपटू सानिया मिर्झाने रशियाची जोडीदार एलेना वेसनिना हिच्यासोबत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीमध्ये अंतिम फेरीत धडक मारली आहे. या जोडीने अमेरिकेच्या लिझा रेमंड आणि लिझेल ह्युबर या जोडीचा 6-3, 2-6 आणि 6-4 असा पराभव केला. अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या आंद्रेयी लावाकोवा आणि लुसी राडेका या जोडीसोबत त्यांची लढत होणार आहे. या जोडीने अमेरिकेच्या वेनिया किंग आणि कझाकिस्तानच्या यारोस्लावा श्वेदोवा जोडीचा 6-3, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करुन अंतिम फेरी गाठली. सानियाने फेब्रुवारी महिन्यात...
  June 2, 09:44 AM
 • औरंगाबाद -गत वर्षभरापासून आपल्या चमकदार कामगिरीच्या बळावर पात्रता फेरीची पायरी ओलांडून फ्रेंच ओपनमध्ये प्रवेश केलेल्या सानिया, ली ना व मारियन बाटरेली यांनी वेगळाच ठसा उमटवला. दुहेरीपाठोपाठच एकेरीत या नवख्या त्रिकूट महिला टेनिसपटूंनी विजयी आघाडी घेऊन फ्रेंच ओपनमध्ये आपला दबदबा निर्माणकेला. त्यामुळे आघाडीच्या महिला टेनिसपटूंचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. एकेरीतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर सानियाने दुहेरीत एलेनासोबत पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.एकेरीतील पराभवातून...
  June 2, 06:17 AM
 • रांची - टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसोबत आज रांचीला परतला. या वेळी विमानतळावर त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. या वेळी माही पुन्हा नव्या लुकमध्ये अवतरला. धोनीचा नवा लुक बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले. नव्या लुकमध्ये माही पूर्णपणे मिलिटरी मॅन दिसत होता. या वेळी त्याने मिलिटरी शर्टसह मिलिटरी टोपी आणि जीन्स परिधान केली होती. धोनीचा नवा लुक पुन्हा एकदा चर्चेत आला. विश्वचषकानंतर दुसर्याच दिवशी माहीने टक्कल केले होते.
  June 2, 06:07 AM
 • मुंबई - 31 जानेवारी हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. इंडियन क्रिकेट लीग (आयपीएल) या बंडखोर क्रिकेट लीगचा सेनानी कपिलदेव आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचे सर्व पदाधिकारी या दिवशी एकत्रितपणे व्यासपीठावर होते. भारतीय क्रिकेट बोर्डाने सत्कार सोहळ्यासाठी 1983 च्या विजेत्या भारतीय संघाला आणि त्यांचा कप्तान कपिलदेवला आमंत्रित केलं होतं. कपिलदेवने दिलखुलासपणे या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि तो मुंबईत झालेल्या या सोहळ्याला उपस्थितही राहिला होता.दिव्य मराठीच्या...
  June 2, 06:02 AM
 • मुंबई - सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत टीम इंडिया आज वेस्ट इंडीज दौर्यावर रवाना झाली. या दौर्यावर टीम इंडिया 1 टी-20, पाच एकदिवसीय आणि 3 कसोटी सामने खेळणार आहे.सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टहून रात्री अडीच वाजता लंडन माग्रे बार्बाडोसला रवाना झाला. भारतीय संघाला त्रिनिदाद येथे 4 जून रोजी एकमेव टी-20 सामना खेळायचा आहे. यानंतर 6 व 8 जून रोजी त्रिनिदाद व 11 आणि 13 जून रोजी अँटिग्वा येथे वनडे सामने होतील. वनडे मालिकेनंतर...
  June 2, 05:54 AM
 • मुंबई - भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि तिचे प्रशिक्षक माजी ऑल इंग्लंड विजेते पुल्लेला गोपीचंद यांच्यात नुकतीच दिलजमाई झाली. सायनाला घडविणार्या गोपीचंद यांच्यापासून गेले कित्येक महिने ती अंतर राखून होती. गोपीचंद यांचे सहायक भास्कर हेच तिला मार्गदर्शन करीत होते. चीनमध्ये ग्वांसी येथे नुकत्याच झालेल्या सुर्दीमान कप बॅडमिंटन स्पर्धेत सायना-गोपीचंद ही गुरू-शिष्यांची जोडी एकत्र आली.त्या दौर्यादरम्यान दोघांमधील मतभेद दूर झाले. चीनहून परतलेल्या गोपीचंद यांनी दिव्य मराठीशी...
  June 2, 05:35 AM
 
जाहिरात

RECOMMENDED