Home >> Sports

Sports

 • ताश्कंद - येथे होत असलेल्या आशियाई वरिष्ठ कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या राहुल आवारेने 55 किलो वजनगटात सिरियाच्या अलाल्ली फिरासला 6-0 गुणांनी चीत करून ब्राँझपदकाचा बहुमान पटकावला. आवारेने 55 किलो वजनगटाच्या फ्री स्टाईलमध्ये ही चमकदार कामगिरी केली.
  May 22, 12:59 PM
 • 'नाही' हा शब्द ज्याच्या शब्दकोशात नव्हता तो ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर शेन वॉर्नने शुक्रवारी मुंबईत अखेर स्पर्धात्मक क्रिकेटला 'नाही' म्हटले. कारकीर्दीतील अखेरची स्पर्धात्मक लढत तो मुंबईत खेळला. राजस्थान रॉयल्सच्या वतीने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलच्या अखेरच्या साखळी लढतीत अखेरच्या षटकात बळी घेऊन वॉर्नने आपल्या स्पर्धात्मक क्रिकेटची सांगता केली. त्यासाठी त्याने मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहराची, भारतीय क्रिकेटचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या मुंबईची निवड केली. वॉर्नच्या रंगतदार...
  May 22, 12:40 PM
 • नवी दिल्ली - गत महिन्यात बॉब हाटन यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर वाऱ्यावर असलेल्या भारतीय फुटबॉल संघाला प्रशिक्षक मिळाला आहे. अर्माडो कोलाको यांची भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या जुलै महिन्यात दुबईत होणाऱ्या स्पर्धेत अर्माडो यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ खेळणार आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोलाको यांची चार महिन्यांसाठी प्रशिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भारताची कामगिरी सुधारण्यासाठी कोलाको...
  May 22, 12:38 PM
 • नवी दिल्ली - भारतीय महिला संघ कर्णधार झुलन गोस्वामीच्या नेतृत्वाखाली येत्या 23 जूनपासून इंग्लंडमध्ये चार देशांमध्ये होत असलेल्या टवेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. यजमान इंग्लंडसह ऑस्ट्रेलिया, भारत व न्यूझीलंड संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची अंतिम लढत 27 जूनला होणार आहे. साखळीपध्दतीने होत असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक संघ चार सामने खेळणार आहे. इंग्लंडमध्ये पहिल्याच महिला टवेंटी-20 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अंतिम लढत 27 जूनला होणार असून, त्यानंतर 30 जूनला...
  May 22, 12:36 PM
 • धर्मशाळा - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पूर्ण जगात आपल्या असामान्य कामगिरीने प्रसिद्ध असताना तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांनी मात्र आपण सचिन तेंडुलकरला ओळखत नसल्याचे म्हटले आहे.धर्मशाळा येथे क्रिकेट सामना असल्यानंतर नेहमी दलाई लामा यांना आमंत्रित करण्यात येते आणि ते उपस्थितही राहतात. शनिवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि डेक्कन चार्जर्स यांच्यात झालेला सामना पाहण्यासाठी ते स्टेडियमवर आले होते. सामन्यादरम्यान त्यांची मुलाखत घेण्यात आली. तेव्हा त्यांना सचिन तेंडुलकरला ओळखता का असे...
  May 22, 10:14 AM
 • मुंबई - भारतीय संघातील खेळाडूला भेटण्याची प्रत्येक क्रिकेटप्रेमीची इच्छा असते. कानपूरमधील रानू मिश्रा या युवकाची हरभजन सिंगची मुलाखत घेतली आणि हरभजनला एरोप्लेन शॉट शिकविण्याची संधी त्याला मिळाली.पेप्सीने सुरु केलेल्या मीट द गेम चेंजर्स या अभियानाअंतर्गत रानूला हरभजन सिंगला भेटण्याची संधी मिळाली. त्यामुळे रानूने त्याला विजयाचा जल्लोष करताना खेळायचा एरोप्लेन शॉटबद्दल त्याला माहिती दिली. या शॉटमध्ये गोलंदाजाने फलंदाजाला बाद केल्यानंतर मैदानाच्या चारही बाजूला हात फिरवून...
  May 21, 04:17 PM
 • कराची - पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून शाहिद आफ्रिदीची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (पीसीबी) माजी खेळाडूंनी टीका केली आहे. पाकिस्तामध्ये सामने होत नसल्याने अडचणीत असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाचे गेल्या दोन वर्षात पीसीबीकडून 11 वेळा कर्णधार बदलण्यात आले आहेत. पीसीबीचे माजी अध्यक्ष लेफ्टनंट जनरल तौकिर झिया यांनी संघाचा कर्णधार सतत बदलत असल्याने संघात फूट पडत असल्याचे म्हटले आहे. आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी...
  May 21, 01:06 PM
 • दुबई - भारतीय उपखंडात क्रिकेट सामन्यांवर होत असलेल्या सट्टेबाजी कायदेशीर करण्याची मागणी आयसीसीचे आयसीसीचे सीईओ हारुन लॉर्गट यांनी केली आहे. लॉर्गट म्हणाले, भारतासह उपखंडातील देशांनी सामन्यांवर चालणारी सट्टेबाजी कायदेशीर करून त्यावर कर लागू करावा. त्यामुळे सरकारचा महसूल वाढणार आहे आणि सट्टेबाजीमुळे होणाऱ्या गैरव्यवहारांनाही आळा बसेल. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी सट्टेबाजी कायदेशीर करणे हा एक चांगला पर्याय आहे. सट्टेबाजीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा तयार केल्यास सट्टेबाजीमध्ये...
  May 21, 12:47 PM
 • नवी दिल्ली - भारताचा टेनिसस्टार सोमदेव देववर्मन याने जागतिक टेनिस क्रमवारीत एकेरीमध्ये ६६ वे स्थान मिळविले आहे. सोमदेव टेनिस कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानावर आहे. सोमदेवबरोबर भारताच्या इतर टेनिसपटूंनीही क्रमवारीत प्रगती केली आहे. सानिया मिर्झा 74 व्या स्थानावर पोहचली आहे. तर रोहन बोपण्णानेही दुहेरीच्या क्रमवारीत ११व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याचीही कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे. महेश भुपती मिश्र दुहेरीच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आणि लिएँडर पेस सातव्या स्थानावर...
  May 19, 05:13 PM
 • नवी दिल्ली - आयपीएलमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर पॉल वॅल्थटी याने सचिन तेंडुलकरने केलेली माझी प्रशंसा ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च टप्पा असून, अविस्मरणीय असल्याचे म्हटले आहे.मुळचा मुंबईचा असलेल्या वॅल्थटीने आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसरे स्थान मिळविले आहे. तर या यादीत सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे.वॅल्थटी म्हणाला, ''यंदाच्या मोसमात सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा बहुमान फलंदाजीत ख्रिस गेल आणि...
  May 19, 05:09 PM
 • सिडनी - ऑस्ट्रेलियाचा मध्यमगती गोलंदाज स्टुअर्ट क्लार्क याने आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.सिडनीत सुरु होणाऱ्या टवेंटी-20 स्पर्धेत सिडनी सिक्सर्स या संघाच्या व्यवस्थापक पदाची जबाबदारी 35 वर्षीय क्लार्क स्वीकारणार आहे. ही स्पर्धा पुढील महिन्यात सुरु होणार आहे. क्लार्कने आपण सिडनी विद्यापीठाकडून खेळत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. क्लार्क म्हणाला, ''मी क्लबकडून क्रिकेट खेळत राहणार असून, या दरम्यान नवीन खेळाडूंना प्रशिक्षणही देणार आहे....
  May 19, 05:06 PM
 • नवी दिल्ली - आगामी मोसमात विदेश दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. सलामीचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या खांद्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, त्याने इंग्लंड दौऱ्यापर्यंत तंदुरुस्त होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सेहवागने आपल्या खांद्यावर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया केली असून, तो भारताच्या वेस्टइंडीज दौऱ्यास मुकणार आहे. सेहवागला या दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घ्यावी लागली होती. सेहवाग म्हणाला, ''मला आशा आहे की, मी जुलैमध्ये होणाऱ्या इंग्लंड...
  May 19, 04:57 PM
 • कोलंबो - श्रीलंका क्रिकेट मंडळाकडून 19 जुलैपासून सुरु करण्यात येणाऱ्या श्रीलंकन प्रमिअर लीगमध्ये (एसएलपीएल) भारतातील बारा क्रिकेटपटू सहभागी होणार असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.या काळात भारतीय संघाचा वेस्टइंडीज दौरा असून, या लीगमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये मुनाफ पटेल आणि आर आश्विन या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे वेस्टइंडीज दौरा सोडून हे दोन्ही खेळाडू श्रीलंकेत खेळणार का? हा प्रश्न आहे. आयलंड क्रिकेट या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंका मंडळाने सध्या...
  May 19, 04:49 PM
 • मुंबई - आपल्या लेगस्पिन फिरकी गोलंदाजीने आयपीएलमध्ये आतापर्यंत छाप उमटविणारा पुणे वॉरियर्सचा गोलंदाज राहुल शर्माने लकव्यासारख्या आजारातून बाहेर पडून जिद्दीच्या जोरावर चमकदार कामगिरी केली आहे. लकव्याची शिकार झाला असतानाही राहुल शर्माने सराव चालूच ठेवला व आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. राहुलच्या याच मेहनतीचे दखल घेऊन समालोचक रवी शास्त्री यांनी राहुलमध्ये फलंदाजांना रोखून ठेवण्याची क्षमता असून, अनिल कुंबळेची शैली त्याच्या गोलंदाजीत दिसत असल्याचे म्हटले आहे.राहुल शर्माला...
  May 19, 04:45 PM
 • नैरोबी - ऑलिंपिकमध्ये मॅरेथॉन विजेता केनियाचा धावपटू सॅमी वांजीरु याने रहात्या घराच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली. कौंटुंबिक कलहातून 24 वर्षीय वांजीरू याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.केनियाच्या पोलिस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, वांजीरू हा नायहुरुरु येथील रिफ्ट व्हॅलीमध्ये राहत होता. त्याने घराच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली. वांजीरुने आत्महत्या केल्यानंतर लगेचच त्याच्या पत्नीने पोलिस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली.वांजीरु याने आत्महत्या...
  May 19, 04:40 PM
 • नवी दिल्ली - भारताक़डून खेळणारी कोल्हापुरची नेमबाज राही सरनोबत हिने लंडनमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत खेळण्यासाठी आपले स्थान पक्के केले आहे. राहीने अमेरिकेत फोर्ट बेनिंग येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत ब्राँझपदक मिळविले. तिने 25 मीटर पिस्तुल प्रकारात 789.7 गुण मिळवून हे पदक जिंकले. याच कामगिरीवर तिची 2012 मध्ये लंडनमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. ऑलिंपिकसाठी पात्र झालेली राही भारताची सहावी खेळाडू आहे. पात्र झालेल्या इतर खेळाडूंमध्ये...
  May 19, 02:42 PM
 
जाहिरात

RECOMMENDED