जाहिरात
जाहिरात
Home >> Sports

Sports

 • लंडन- मद्याच्या एका जाहिरातीवरून नाराज असलेल्या हरभजनने महेंद्रसिंह धोनीला क्लीन चिट दिली आहे. या जाहिरातीत धोनीने हरभजनची खिल्ली उडविल्याचे दाखवण्यात आले होते. याप्रकरणी हरभजनने विजय मल्ल्या आणि त्यांच्या कंपनीला नोटीस पाठवली होती. हरभजन सिंगने सांगितले की, धोनीला जाहिरातीत काय दाखवणार आहेत याची कल्पना नव्हती त्याने फक्त त्याला जो संवाद दिला होता तो त्याने बोलला होता. जेव्हा जाहिरात प्रसारित करण्यात आली तेव्हाच धोनीला त्याबद्दल माहित झाले. धोनीने मला त्याची कल्पना दिल्याचे...
  July 20, 07:08 PM
 • लंडन- 'क्रिकेटची पंढरी' समजल्या जाणाऱया लंडनमधील लॉडर्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय संघाचे नेतृत्त्व करायला मिळणे हा माझ्या क्रिकेट करिअरमधला सर्वोच्च्य क्षण असून माझ्यासाठी विशेष बहुमानच आहे, असे मत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केले.भारत आणि इंग्लड यांच्या दरम्यान गुरुवारपासून कसोटी क्रिकेट मालिका सुरु होत आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला धोनीने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तो बोलत होता.धोनी म्हणाला, लॉ़डर्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय संघाचे...
  July 20, 05:35 PM
 • थेट लंडनहून...भारताच्या क्रिकेट संघाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याच्या बॅटने लिलावातून तब्बल १ लाख पौंडांची कमाई केली आहे. लंडनमधील एका पंचतारांकित हॉटेलात या बॅटचा लिलाव पार पडला. हा पैसा सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येणार आहे. धोनी याने याच बॅटने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये नाबाद ९१ धावांची जिगरबाज खेळी केली होती आणि भारताचे विश्वविजेता बनण्याचे स्वप्न साकारले होते. वास्तविक आरसीबी इन्व्हेस्टमेंट्स या भारतीय कंपनीने या बॅटसाठी ७५ हजार पौंडांची बोली लावली होती, परंतु...
  July 20, 06:05 AM
 • लॉर्ड्स : लॉर्ड्सच्या जगप्रसिद्ध मैदानावर येत्या २१ जुलैपासून सुरू होत असलेला भारत-इंग्लंडदरम्यानचा कसोटी सामना इतिहासातील २००० वा कसोटी सामना ठरणार आहे. या सामन्यात सर्वांनाच सचिन तेंडुलकरच्या महाशतकाची प्रतीक्षा आहे. मात्र याच मैदानावर आणखी एक महाशतक बनू शकते. भारतीय क्रिकेटची जगप्रसिद्ध त्रिमूर्ती सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची एकूण ९९ शतके आहेत. या तिघांपैकी कोणीही जरी लॉर्ड्स कसोटीवर शतक झळकवले तरी तिघांच्या शतकांचे शतक निश्चित बनू शकेल. यामुळे...
  July 20, 05:27 AM
 • लंडन: वयाच्या १६ व्या वर्षापासून कसोटी सामन्यात आव्हानात्मक खेळीचा उत्साह आजच्या घडीला वयाच्या ३८ वर्षे पूर्ण करणा-या सचिनमध्ये कायम असल्याचे दिसून येते. आपल्या खेळीतला संयम, झंझावात आणि उत्साह कायम ठेवला आहे. प्रचंड मेहनत व आत्मविश्वासाच्या बळावर इतरांपेक्षा वेगळी कामगिरी करणा-या विक्रमादित्य सचिनच्या महानतेला कुठलाही पर्याय नसल्याची प्रतिक्रिया ब्रायन लाराने दिली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये माजी फलंदाज ब्रायन लारा म्हणाला की, क्रिकेटच्या विश्वात...
  July 20, 05:21 AM
 • लंडन : भारताविरुद्ध आगामी मालिकेत इंग्लंडला सचिन तेंडुलकरची नाही, तर महेंद्रसिंग धोनीची भीती वाटतेय. आज लॉर्ड्सवर सरावाला सुरुवात करण्याआधी इंग्लंडच्या फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वानने तशी भीती पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केली. स्वान म्हणत होता, महेंद्रसिंग धोनी हा चमत्कारी क्रिकेटपटू आहे. तो संघाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. तो स्वत: पुढे राहून इतरांसमोर आदर्श ठेवतो. त्याचा रुबाब आणि अदब काय आहे ते कळण्यासाठी तुम्ही भारतात असायला हवे.स्वान म्हणाला, फक्त सचिन तेंडुलकरवर...
  July 20, 05:18 AM
 • लंडन: येत्या २१ जुलैपासून भारतविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सलामीच्या सामन्यातच गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला विश्रांती देण्याच्या जोरदार हालचाली आहेत. मात्र, याबाबत कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. टीम ब्रेसननच्या सरावातील चकमदार कामगिरीमुळेच ब्रॉडचे स्थान संकटात आल्याचेही दिसून येते. गत महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत हरवलेला भेदक गोलंदाजीचा सूर सापडण्यासाठी स्टुअर्ट ब्रॉड प्रयत्नशील आहे. संघातील स्थान पटकावण्यासाठी ब्रॉड उत्सुक आहे. मात्र, टीम...
  July 20, 05:14 AM
 • लंडन : लॉर्ड्सवरील भारत-इंग्लंड यांच्यातील शंभराव्या कसोटीपेक्षा आणि आयसीसीच्या दोन हजाराव्या कसोटीपेक्षा सध्या लंडनमध्ये चर्चा आहे सचिन तेंडुलकरच्या शंभराव्या शतकाची. आधुनिक क्रिकेटचा हा लॉर्ड लॉर्ड्सवर आपल्या शंभराव्या शतकावर शिक्कामोर्तब करील काय, हा प्रश्न जसा सचिनच्या चाहत्यांच्या डोक्यात आहे, तसाच दस्तुरखुद्द सचिनच्याही. नेमक्या याच गोष्टीचा लाभ उठवण्यासाठी इंग्लंड संघ, त्यांचा कप्तान अॅण्ड्र्यू स्ट्रॉस आणि इंग्लंड संघाचे मानसोपचारतज्ज्ञ सज्ज झाले आहेत. इंग्लंडचा...
  July 20, 05:11 AM
 • लंडन : वेस्ट इंडीजच्या खडतर दौ-यानंतर इंग्लंडमध्ये दाखल झालेला भारतीय संघ येथील वातावरणाशी जुळतोय. संघातील बहुतेक खेळाडू लंडनमध्ये भारतीय खाणे मिळाल्यापासून आनंदित झाले आहेत. मानसिक आणि सात्त्विक समाधान आज लॉर्ड्सवरील सरावादरम्यान भारतीय खेळाडूंच्या देहबोलीतून स्पष्ट होत होते. आणखी एका गोष्टीचे समाधान या खेळाडूंना लंडनमध्ये मिळत आहे. प्रत्येक जण पूजाअर्चा करण्यातही मग्न होता. सकाळी सरावाला येण्याआधी पूजा करूनच बहुतेक खेळाडू निघाले होते. सचिन तेंडुलकर गणेशभक्त आहे हे सर्वश्रुत...
  July 20, 05:09 AM
 • लंडन: लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडला क्रिकेटची पंढरी म्हणतात. ब्रिटिशांच्या शिस्तीची चौकट पाळत या मैदानावर क्रिकेट मोठे होत गेले. सुटाबुटातले, टाय लावून क्रिकेटचा आस्वाद घेणारे येथील प्रेक्षक आगळे, तसे क्रिकेट संघटकही आगळे. लॉर्ड्सच्या लाँग रूममध्ये एकेकाळी महिलांना प्रवेशही वर्ज्य होता. आज ती बंधने नाहीत. जगभरात कोणत्याही ड्रेस कोडशिवाय कसोटी क्रिकेट पाहिले जाते. दोन हजाराव्या कसोटीच्या पूर्वसंध्येला लॉर्ड्सने मात्र आपली ती परंपरा कायम ठेवली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासापेक्षाही...
  July 20, 05:04 AM
 • थेट लंडनहून...वेस्ट इंडीजचा दौरा आटोपून इंग्लंडमध्ये आल्यानंतर आम्ही किंचित आळसावलो होतो. त्यामुळे टॉन्टन (सॉमरसेट) येथील सराव सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी निराशाजनक झाली. मात्र त्या कामगिरीची इंग्लंड दौयात पुनरावृत्ती होणार नाही, याची हमी आज भारताचा माजी कप्तान आणि टीम इंडियाचा फलंदाजीचा आधार राहुल द्रविड याने येथे दिली.लॉडर््सवर भारतीय संघाने आज सकाळच्या सत्रात सराव केला. सराव आटोपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना द्रविड पुढे म्हणाला, दौ-यावर असताना एखाद्या सराव सामन्यात असे होते....
  July 20, 05:01 AM
 • लंडन - आयसीसीने ऑनलाइन वोटिंगच्या माध्यमातून निवडलेला सर्वोत्कृष्ठ संघ म्हणजे हा मोठा विनोद असल्याची टीका इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलेक स्टुअर्टने याने केली आहे. या संघात गॅरी सोबर्स आणि माल्कम मार्शल यासारख्या ग्रेट खेळाडूंचा समावेश नसल्याने त्याने आश्चर्य व्यक्त केल आहे.लॉर्डसवर गुरुवारपासून सुरू होणारी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी ही कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील २०००वी कसोटी असणार आहे. त्यानिमित्त आयसीसीने ऑनलाइनच्या माध्यमातून संघ निवडला आहे. या संघात सत्तरच्या...
  July 19, 06:54 PM
 • नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने ज्या बॅटने विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात शेवटचा षटकार मारला. त्या बॅटला लिलावात सचिन तेंडुलकरचे चित्र असलेल्या पेंटिंगपेक्षा कमी किंमत मिळाली आहे. धोनीची बॅट एक लाख पौंड म्हणजे सुमारे ७२ लाख रुपयांना विकली गेली, तर सचिनची पेंटींग अडीच लाख पौंड म्हणजे एक कोटी ७९ लाख रुपयांना विकले गेले.लंडनमधील हिल्टन पार्क लेन येथे झालेल्या लिलावात धोनीच्या बॅटबरोबरच त्याने विश्वकरंडकात वापरलेल्या अनेक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या....
  July 19, 06:30 PM
 • सन फ्रॅन्सिस्को - जपानने पहिल्यांदाच महिला विश्वकरंडक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जपानने अंतिम सामन्यात अमेरिकेचा पेनल्टी शूटआउटमध्ये ३-१ असा पराभव केला. जपानच्या या विजयानंतर सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर ट्विट येण्याचाही विक्रम प्रस्थापित झाला आहे.सन फ्रॅन्सिस्को येथील रियल टाइम ब्लॉगिंग कंपनीने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांनुसार जपान आणि अमेरिका यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान क्षणागणिक ट्विटरवर ७, १९६ युजर्सने ट्विट केले. आतापर्यंत ट्विटरवर कधीच एवढ्या ट्विट आल्या...
  July 19, 02:56 PM
 • नवी दिल्ली - भारत आणि इंग्लंड यांच्यात २१ जुलैपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात युवराज सिंग खेळण्याची शक्यता जास्त आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या योजनेनुसार युवराजला अंतिम संघात स्थान देऊन तो डावाची सुरवात करण्याची शक्यता आहे.पहिल्या कसोटीसाठी संघातील समावेशाबाबत युवराजच्या नावाची चर्चा जोरात आहे. सराव सामन्यात शतकी खेळी करून सुरेश रैनाने संघातील स्थान पक्के केल्यात जमा आहे. रैनाला संघाबाहेर ठेवणे भारतासाठी योग्य ठरणार नाही. युवराज डावाची सुरवात आणि रैनाला मधल्या फळीत...
  July 19, 02:30 PM
 • लंडन - सचिन ग्रेट की लारा ग्रेट अशी एकेकाळी चर्चा असताना आता खु्द्द ब्रायन लारानेच सचिन तेंडुलकर ग्रेट असल्याची कबुली दिली आहे. सचिनची लाराने प्रशंसा केल्याने सचिनच्या चाहता वर्गामध्ये आणखी वाढ झाली आहे. लाराबरोबरच इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलेक स्टुअर्ट याने सचिन हा मॉडर्न काळातील डॉन ब्रॅडमन असल्याचे म्हटले आहे. 'ईस्ट मीट वेस्ट' या ग्रुप संभाषणात कर्णधार महेंद्रसिंह धोनी, लारा, स्टुअर्ट हे सहभागी झाले होते. त्यावेळी लारा म्हणाला, सचिनने सोळाव्या वर्षापासून क्रिकेट कारकिर्दीला सुरवात...
  July 19, 01:48 PM
 • लंडन - इंग्लंड संघातील मधल्या फळीतील फलंदाज इयान बेल याने भारतीय संघाला लक्ष्य केले आहे. ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या मायदेशात जाऊन पराभव केला, मग, भारताचा काय निभाव लागणार, असा इशारा बेलने दिला आहे.बेल म्हणाला, भारताविरुद्धची मालिका जिंकण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. चांगली कामगिरी करीत असेलल्या दोन्ही संघांमध्ये ही मालिका होत आहे. क्रिकेटप्रेमींसाठी ही मालिका मनोरंजनासाठी एक पर्वणीच असणार आहे. इंग्लंडचा संघ भारताकडून कसोटीतील अव्वल स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात आहे....
  July 19, 12:51 PM
 • नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने एक जाहिरात केल्याने फिरकीपटू हरभजन सिंगच्या कुटुंबात वादंग निर्माण झाले आहे. एका मद्य कंपनीच्या जाहिरातीत असे शूट करण्यात आले आहे की, ज्यावरून हरभजन सिंगच्या वडिलांचा अपमान झाल्यासारखे वाटते. यामुळे हरभजनने विजय मल्ल्या यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. यावर विजय मल्ल्या यांनीही या जाहिरातीचे प्रसारण रोखणार नसल्याचे सांगितले आहे. हरभजन आणि विजय मल्या यांच्यातील वादाचे कारण बनलेल्या जाहिरातीविषयी माहिती जाणून घेऊयात...हरभजन...
  July 19, 11:01 AM
 • नवी दिल्ली- दारू तयार करणा-या कंपनीच्या एका जाहिरातीवरून युबी समूहाचे मालक विजय मल्ल्या यांना टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू हरभजन सिंगने नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळाल्यानंतरही मल्ल्या यांनी जाहिरातीचे प्रसारण करणे थांबवलेले नाही. हरभजन सिंगने कायदेशीर कारवाई करावी म्हणून कंपनीने सल्ला दिलेला नाही असे पॅरनॉर्ड रिकॉर्ड या कंपनीने स्पष्ट केले आहे. पण या वादात कंपनी हरभजन सिंग बरोबर आहे असेही कंपनीने म्हटले आहे.ऑफ स्पिनर हरभजन सिंगने आपल्या वकीलाच्या माध्यमातून युबी समुहाचे अध्यक्ष...
  July 19, 09:49 AM
 • वृत्तसंस्था । लंडन. युवराज सिंगकडे जबरदस्त अनुभव असला म्हणून काय झाले. इंग्लंडविरुद्ध येत्या २१ जुलैपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याच्या जागी युवा खेळाडू सुरेश रैनाला अंतिम अकरा खेळाडूंत संधी मिळू शकते. सध्या सुरेश रैना भन्नाट फॉर्मात आहे. याचा त्याला लाभ होऊ शकतो. युवराजप्रमाणेच डावखुरा फलंदाज असलेल्या रैनाची लॉर्ड्स कसोटीतील निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. सुरेश रैनापेक्षा पाच वर्षांनी सीनियर असलेला युवराज आपल्या ९ वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत...
  July 19, 06:12 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात