आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:आकाश अंबानींनी ‘मुंबई इंडियन्स’मध्ये दुर्लक्षित गुणवत्तेला दिली संधी; आता इतर सर्व फ्रँचायझींचेही त्यांच्याच पावलावर पाऊल

दुबई / चंद्रेश नारायणन16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई इंडियन्सचे दिग्गज देशातीलच नव्हे, तर जगभरातील उदयोन्मुख खेळाडूंवरही ठेवतात लक्ष

आकाश अंबानींनी मुंबई इंडियन्स संघात दुर्लक्षित गुणवत्तेला संधी देण्याची प्रथा सुरू केली आहे, आता आयपीएलच्या सर्व फ्रँचायझींना तिचाच अवलंब करावा लागत आहे. जगातील प्रख्यात खेळाडूंना घेऊन स्पर्धा जिंकता येऊ शकते, असे सुरुवातीला मानले जात होते. पण ही धारणा आता बदलली आहे. आता गुणवंत असलेल्या आणि एकजूट होऊन स्पर्धा जिंकून कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनाव राज्य करतील अशा खेळाडूंना महत्त्व दिले जात आहे. फ्रँचायझी पूर्ण वर्षभर दूरवरच्या भागातील गुणवंतांचा शोध घेण्यात व्यग्र असतात, असे गेल्या सात-आठ वर्षांत दिसले आहे. त्याची सुरुवात आकाश अंबानींच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने केली आहे.

आकाश अंबानी संघातील गुणवंतांना घडवण्यासाठी जास्तीत जास्त वेळ व्यतीत करतात. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक जॉन राइट गुणवत्ता शोध मोहिमेचे संचालक आहेत. त्यावरूनच गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी मुंबई इंडियन्सची प्रतिबद्धता दिसते. भारतीय संघाचे माजी यष्टिरक्षक आणि चीफ सिलेक्टर किरण मोरे हे द्रुतगती गोलंदाज टी. ए. सीकर, अभय कुरुविला आणि सलामीचा फलंदाज प्रवीण आमरे यांच्या सहकार्याने मुंबई इंडियन्सच्या अकादमीची जबाबदारी सांभाळतात. हे सर्व दिग्गज संपूर्ण वर्षभर भारतातीलच नव्हे तर जगभरातील उदयोन्मुख खेळाडूंवर लक्ष ठेवतात. जॉन राइट यांनीच जसप्रीत बुमराह आणि पंड्या बंधूंचा रणजी करंडकातील खेळ पाहिला आणि गुणवत्तेच्या आधारावर त्यांना मुंबई इंडियन्सतर्फे आयपीएल खेळण्याची संधी दिली. त्यामुळेच बुमराहची भारतीय संघात निवड झाली आणि आज त्याचे नाव जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांत घेतले जाते. आकाश अंबानींकडून हिरवा कंदील मिळत असल्यामुळेच मोरे आणि राइट आपली जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडत आहेत. आता तर झहीर खानची मुंबई इंडियन्सच्या डायरेक्टर ऑफ क्रिकेट या पदावर नियुक्ती झाली आहे.

इरफान पठाणने लक्ष्मणला दिली अब्दुल समदच्या गुणवत्तेची माहिती
मुंबई इंडियन्सने सुरू केलेल्या प्रथेचाच अवलंब सनरायझर्स हैदराबादमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण करत आहे. त्यामुळेच अब्दुल समद प्रकाशझोतात आला. इरफान पठाण जम्मू-काश्मीर संघाचे मेंटॉर होता तेव्हाच त्याने लक्ष्मणला समदबाबत सांगितले होते. दिल्ली कॅपिटल्सच्या संघात गुणवत्ता शोधण्याचे काम माजी क्रिकेटपटू विजय दहिया आणि मोहम्मद कैफ करत आहेत. कोलाकाता नाइट रायडर्ससाठी अभिषेक नायर, राजस्थान रॉयल्ससाठी साईराज बहुतुले आणि अमोल मुजुमदार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी मालोलन राजगोपालन तर किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी उदयोन्मुख खेळाडूंचा शोध घेत घेऊन त्यांना पैलू पाडत आहेत.