आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटनसचा आयपीएललाही बाय-बाय

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2008 ते 2015 दरम्यान राजस्थान संघाचे लीगमध्ये प्रतिनिधित्व केले
  • 2017 दरम्यान तो काेहलीच्या नेतृत्वात बंगळुरू संघाकडून आयपीएलमध्ये खेळला.

पुढच्या वर्षी हाेणाऱ्या १४ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनी आपल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळताना दिसणार आहे. मात्र, याच टीमच्या सुपर ऑलराउंडर शेन वाॅटसनने आयपीएलला बाय-बाय केले आहे. ताे आता पुढच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये खेळणार नाही. याची माहितीही त्याने सहकारी खेळाडूंना दिली. चेन्नई संघाने लीगमधील आपल्या शेवटच्या सामन्यात किंग्ज इलेव्हनवर धडाकेबाज ९ गड्यांनी विजय संपादन केला. याच विजयाबराेबर चेन्नईला लीगचा शेवट गाेड करून बाहेर पडावे लागले.

वाॅटसन हा मागील दाेन वर्षांपासून चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळताे. यापूर्वी त्याने २००८ ते २०१५ दरम्यान राजस्थान संघाचे लीगमध्ये प्रतिनिधित्व केले. तसेच २०१६ ते २०१७ दरम्यान ताे काेहलीच्या नेतृत्वात बंगळुरू संघाकडून आयपीएलमध्ये खेळला.