आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल:बंगळुरू संघाला नव्या नेतृत्वाची गरज; कर्णधाराच्या भूमिकेत कोहली 8 वर्षांपासून जेतेपदासाठी अपयशी

नवी दिल्ली/दुबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेहलीच्या नेतृत्वावर गंभीर, गावसकर, मांजरेकरांकडून प्रश्नचिन्ह

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची टीम पुन्हा एकदा प्ले ऑफमध्ये स्थान मिळवू शकली होती. त्यांना शुक्रवारी रात्री बाद फेरीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने सहा गड्यांनी हरवले. टीम बाहेर झाल्यानंतर कर्णधार कोहलीला टीकेचा सामना करावा लागला. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, सुनील गावसकर व संजय मांजरेकरने काेहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गंभीरने म्हटले की, बंगळुरूला नव्या कर्णधाराची गरज आहे. कोहली ८ वर्षांपासून ट्रॉफी जिंकून देऊ शकला नाही. गावसकरने म्हटले की, कोहली अपेक्षापूर्ती करू शकला नाही. मांजरेकरने म्हटले की, संघात बदलाची गरज आहे.

आरसीबीत दर्जेदार क्षमतेचा अभाव
पराभवाची जबाबदारी कोहलीने स्वीकारावी : गंभीर

गंभीर म्हणाला की, “आता वेळ आली आहे, कोहलीने जबाबदारी घेतली पाहिजे. त्याने टीमच्या परिणामांबद्दल उत्तर द्यायला हवे. विनाट्रॉफी ८ वर्षे खूप मोठा काळ असतो. कोणताही कर्णधार दाखवा, कर्णधार सोडा खेळाडू दाखवा, ज्याला ८ वर्षे झाली आणि किताब जिंकला नाही. त्यावर खुलासा हवा. कर्णधाराने उत्तर देण्याची गरज आहे. ही केवळ एका वर्षाची गोष्ट नाही. हे यंदाच्या बाबतीत आहे. मी कोहलीच्या विरुद्ध आहे. मात्र, कुठे ना कुठे त्याने हात वरती करून म्हटले पाहिजे, मी जबाबदार आहे.. मी जबाबदार आहे. आर. अश्विनने दोन वर्षे किंग्ज इलेव्हनचे नेतृत्व केले. तो काही देऊ शकला नाही, बाजूला झाला. आपण धोनी व रोहितबाबत बोलतो. मात्र, आपण कोहलीबाबत काही बोलत का नाहीत? धोनीने ३ किताब जिंकले व रोहितने चार. त्यांनी दीर्घकाळ नेतृत्व केले आणि स्वत:ला सिद्ध केले.
रोहितने आठ वर्षे सिद्ध केले नसते तर त्याला बाजूला केले गेले असते.

सुमार गाेलंदाजी
विराट क्षमतेसारखी कामगिरी करण्यात काेहली फेल : गावसकर

गावसकरनेही कडक शब्दात काेहलीवर टीका केली आहे. “कोेहली अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे बंगळुरू टीम प्ले ऑफमध्ये स्थान मिळवू शकली नाही. डिव्हिलियर्स जेव्हा मोठी धावसंख्या उभारतो तेव्हा टीम यशस्वी ठरते. बंगळुरूची गोलंदाजी त्यांचा कमजोर भाग आहे. त्यांच्या संघात अॅरोन फिंचदेखील आहे, जो उत्कृष्ट टी-२० खेळाडू आहे. युवा देवदत्त पड्डीकलने चांगली सुरुवात करून दिली आणि त्यानंतर विराट कोहली आणि डिव्हिलियर्स आहेत, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रीया दिली. यादरम्यान गावसकरनुसार, टीमला फिनिशरची भूमिका बजावणारा खेळाडू शोधावा लागेल. शिवम दुबे त्या भूमिकेसाठी योग्य आहे. शिवमला योग्य जबाबदारी देण्याची गरज आहे. ते सर्व संभ्रमात आहेत. जर टीमला नंबर पाचसाठी चांगला खेळाडू मिळाला तर विराट कोहली व डिव्हिलिर्सवरील दबाव कमी होईल.

खांदेपालट ठरेल अधिक फायदेशीर
दरवर्षी कामगिरीचा दर्जा उंचावण्यात टीम फ्लाॅप

मांजरेकर यांनीही काेहलीच्या नेतृत्वावर आणि टीमच्या घसरलेल्या कामगिरीवर टीकेच्या माध्यमातून फाेकस टाकला. “केवळ कर्णधारच नाही तर, टीमला आपल्या सपोर्ट स्टाफसह अनेक बदल करावे लागतील. आठ सत्रांत विनाकिताब मोठा काळ आहे. जर निकालात बदल हवा असेल तर कर्णधार बदलला गेला पाहिजे. मी विराटकडून अपेक्षा करत नाही. त्याने आपले हात वरती करावे, मी सिद्ध केले नाही. मला वाटते, फ्रँचायझी मालकाने आपले काम करावे. जर टीम किताब जिंकू शकत नाही, त्या फ्रँचायझी मालकाला जबाबदार ठरवेल. कारण, त्यांनी संघाला योग्य कर्णधार दिला नाही, जो निकाल देऊ शकेल, असेही त म्हणाले. त्यांनी निवडीवरदेखील प्रश्न उपस्थित करत म्हटले, टीम प्रत्येक वर्षी चुका दुरुस्त करण्यात अपयशी ठरते. त्यांच्या एक्झिक्युशनमध्ये नाही तर, टीम निवडीमध्ये गडबड आहे.
आरसीबीची अडचणही आहे.