आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल 2020:बायो बबलचे नियम भंग करणे महागात; खेळाडू स्पर्धेबाहेर, संघाला कोटीचा दंड ठोठावणार

दुबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्येक खेळाडू व कर्मचाऱ्याची पाचव्या दिवशी कोरोना चाचणी

आयपीएलदरम्यान जैवसुरक्षित वातावरणाचा नियम मोडल्यास खेळाडूला स्पर्धेबाहेर व्हावे लागेल. त्याबरोबर त्याच्या टीमला एक कोटी रुपये दंड लावला जाईल आणि सोबतच गुणदेखील कापण्यात येणार आहेत.

बीसीसीआयने सर्व आठ फ्रँचायझींना सांगितले की, जैवसुरक्षित वातावरणाबाहेर गेल्यानंतर खेळाडूला सहा दिवस क्वॉरंटाइन राहावे लागेल. जर खेळाडूने दुसऱ्यांदा असे केल्यास एका सामन्याची बंदी घातली जाईल. तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास स्पर्धेतून बाहेर केले जाईल आणि संघाला त्याच्या जागी बदली खेळाडू मिळणार नाही. चेन्नईचा वेगवान गोलंदाज केएम आसिफने जैवसुरक्षित वातावरणाचा नियम मोडला होता. खेळाडूंना दररोज आरोग्याबाबतीत अटी पूर्ण करणे, जीपीएस ट्रॅकर न घालणे व आवश्यक कोरोना चाचणी वेळेत न केल्यास ६० हजार रुपये दंड द्यावा लागू शकतो. स्पर्धेच्या प्रत्येक पाचव्या दिवशी खेळाडू व सहकारी स्टाफची कोरोना चाचणी केली जातेय. संघाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सक्तीने पालन करून घेण्याची गरज आहे. कारण, अनेक फ्रँचायझी व्यक्तीला सुरक्षित वातावरणात खेळाडू किंवा स्टाफशी चर्चा करण्याची परवानगी देते. त्यांना पहिल्या चुकीबद्दल एक कोटी रुपये दंड लागेल. दुसऱ्यांदा असे केल्यास एक गुण आणि तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास दोन गुण कमी केले जातील.

बातम्या आणखी आहेत...