आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 21वा सामना कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) दरम्यान आज अबुधाबीमध्ये होत आहे. कोलकाताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि चेन्नईला 168 धावांचे आव्हान दिले. हे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानातर उतरलेल्या चेन्नईला फक्त 157 धावांची मजल मारता आली. कोलकाकाकडून चेन्नईचा 10 धावांनी पराभव झाला. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकने संघात कोणतेच नवीन बदल केले नाही. तर, चेन्नईमध्ये पीयुष चावलाच्या जागी कर्ण शर्माला प्लेइंग इलेवनमध्ये संधी मिळाली दिली होती.
धोनी नवीन विक्रमापासून एक पाऊल दूर
चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी ओव्हरऑल टी-20 क्रिकेटमध्ये 300 षटकार मारण्यासाठी फक्त एक पाऊल दूर आहे. 300 चा आकडा पार केल्यास हा विक्रम करणारा धोनी तिसरा भारतीय ठरेल. चेन्नईने सीजनमध्ये 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर, कोलकाताने 4 पैकी 2 जिंकले आहेत.
दोन्ही संघ
चेन्नई: शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायडू, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, सैम करन, शार्दुल ठाकुर, कर्ण शर्मा आणि दीपक चाहर.
कोलकाता: शुभमन गिल, सुनील नरेन, नीतीश राणा, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (कर्णधार आणि विकेटकीपर), इयोन मोर्गन, पैट कमिंस, राहुल त्रिपाठी, शिवम मावी, कमलेश नागरकोटी आणि वरुण चक्रवर्ती.
चेन्नईने 3 आणि कोलकाताने 2 वेळा आयपीएल किताब जिंकला
आयपीएल इतिहासात कोलकाताने दोन फायनल (2014, 2012) खेळले आणि दोन्ही वेळेस चॅम्पियन बनली. दुसरीकडे चेन्नईने सलग 2010 आणि 2011 मध्ये दोन वेळा आयपीएल किताब जिंकला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.