आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CSK vs KXIP:चेन्नईकडून पंजाबचा 9 गडी राखून पराभव; किंग्स इलेवन प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर

अबुधाबीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

IPL च्या 13 व्या सत्रातील53वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेवन पंजाबदरम्यान अबुधाबीमध्ये झाला. सामन्यात चेन्नईने पंजाबचा 9 गडी राखून पराभव केला. या पराभवासह पंजाब प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर गेला आहे. सामन्याचा स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

चेन्नईने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने चेन्नईला 154 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात चेन्नईने 18.5 ओव्हरमध्ये सामना खिशात घातला. चेन्नईच्या रुतुराज गायकवाडने सर्वाधिक 62 धावा केल्या. यानंतर फाफ डू प्लेसीने 48 आणि अंबाती रायडूने 30 धावा केल्या. पंजाबकडून क्रीस जॉर्डनने एक विकेट घेतली.

चेन्नईची शानदार सुरुवात

चेन्नईच्य ाओपनर्सने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. फाफ डु प्लेसिस आणि रितुराज गायकवाडने बाजू भक्कमपणे सांभाळत पावर-प्लेमध्ये 57 रन केले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 82 रनांची पार्टनरशिप केली.

पंजाबकडून दीपक हूडाने लीगमध्ये आपले दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने 30 बॉलवर सर्वाधिक 62 रनांची नाबाद खेळी केली. तर, चेन्नईच्या लुंगी एनगिडीने 3 विकेट घेतल्या. शार्दूल ठाकुर, इमरान ताहिर आणि रविंद्र जडेजाला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

गेल-पूरन अपयशी

चांगल्या सुरुवातीनंतरही पंजाबचा संघ गडबडला. लोकेश राहुल 27 बॉलवर 29 रन, निकोलस पूरन 6 बॉलवर 2 रन आणि क्रिस गेल 19 बॉलवर 12 रन काढून आउट झाले. पंजाबने या 3 खेळाडूंच्या विकेट फक्त 10 रनांच्या अंतराग गमावल्या.

राहुल-मयंकने करुन दिली चांगली सुरुवात

पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने मयंक अग्रवालसोबत मिळून संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी चांगले शॉट्स लावून 32 बॉलवर 48 रनांची ओपनिंग पार्टनरशिप केली. या भागीदारीला लुंगी एनगिडीने तोडले. दोघांनाही एनगिडीने आउट केले.

धोनी म्हणाला- यलो जर्सीमध्ये माझा शेवटचा सामना नाही

चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आयपीएलमधून निवृत्ती घेण्याच्या चर्चांना पुर्णविराम लावला. सामन्यूपूर्वी टॉसदरम्यान डॅनी मॉरिसनने धोनीला विचारले की, आयपीएलमध्ये हा तुझा शेवटचा सामना आहे का ? त्यावर धोनी म्हणाला, बिलकूल नाही. यलो जर्सीमधील हा माझा शेवटचा सामना नाही. पुढेही खेळत राहिल.

प्ले-ऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी पंजाबला हा सामना जिंकणे गरजेचे आहे. या सामन्यात पराभव झाल्यास पंजाबसाठी प्ले-ऑफचे सर्व दार बंद होतील आणि संघ लीगमधून बाहेर जाईल. तर, प्ले-ऑफमधून बाहेर झालेल्या चेन्नईचा हा या सीजनमधील शेवटचा सामना आहे.

चेन्नईमध्ये 3 आणि पंजाबमध्ये दोन बदल

चेन्नईने संघात 3 बदल केले आहेत. शेन वॉटसन, मिशेल सैंटनर आणि कर्ण शर्माला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यांच्याजागी फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर आणि शार्दूल ठाकुरला संघात घेण्यात आले आहे. तर, पंजाबमध्ये ग्लेन मैक्सवेलच्या जागी जीमी नीशम आणि अर्शदीप सिंहच्या जागी मयंक अग्रवालला संधी देण्यात आली आहे.

दोन्ही संघ

चेन्नई: फाफ डु प्लेसिस, रितुराज गायकवाड़, अंबाती रायडू, एन जगदीशन, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार, विकेटकीपर), रविंद्र जडेजा, सैम करन, दीपक चाहर, इमरान ताहिर, शार्दूल ठाकुर आणि लुंगी एनगिदी.

पंजाब: लोकेश राहुल (कर्णधार, विकेटकीपर), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, निकोलस पूरन, मनदीप सिंह, जिमी नीशम, दीपक हूडा, क्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, रवि बिश्नोई आणि मोहम्मद शमी.