आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CSK vs KKR:चेन्नई सुपर किंग्सकडून कोलकाता नाइट रायडर्सचा 6 विकेटने पराभव; कोलकाताचा प्लेऑफचा मार्ग कठीण

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

IPL च्या 13 व्या सत्रातील 49वा सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) दरम्यान दुबईत झाला. यात चेन्नईने कोलकातावर 6 गडी राखून विजय मिळवला आहे. चेन्नईने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कोलकाताने चेन्नईला 173 रनांचे टार्गेट दिले होते. स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

चेन्नईकडून रितुराज गायकडावने धडाकेवाज 72 धावांची खेळी करुन संघाला मजबुत स्थितीत नेले. त्यानंतर रवींद्र जडेजाने 11 बॉलमध्ये 33 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला.

कोलकाताकडून नीतिश राणाने IPL मध्ये 11 वे अर्धशतक लगावले. राणाने 61 बॉलवर 87 रन काढले. दिनेश कार्तिकने नाबाद 21 आणि कर्णधार इयोन मॉर्गनने 15 रन केले. तर, चेन्नईकडून लुंगी एनगिडीने 2, रविंद्र जडेजा, कर्ण शर्मा आणि मिशेल सैंटनरने 1-1 विकेट घेतल्या.

सीजनमध्ये पहिल्यांदा केकेआरची 50+ रनांची ओपनिंग पार्टनरशिप

कोलकाताची सुरुवात चांगली झाली. ओपनर शुभमन गिल आणि नीतीश राणाने पहिल्या विकेटसाठी 53 रनांची ओपनिंग पार्टनरशिप केली. ही या सीजनमधील कोलकाताची अर्धशतकी भागादारी झाली आहे. या भागीदारीला कर्ण शर्माने तोडले. कर्णने शुभमन गिलला 26 रनांवर आउट केले.

दोन्ही संघ

चेन्नई: शेन वॉटसन, रितुराज गायकवाड़, अंबाती रायडू, एन जगदीशन, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार, विकेटकीपर), रविंद्र जडेजा, सैम करन, दीपक चाहर, मिशेल सैंटनर, कर्ण शर्मा आणि लुंगी एनगिदी.

कोलकाता: शुभमन गिल, नीतीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, इयोन मॉर्गन (कर्णधार), रिंकू सिंह, सुनील नरेन, पैट कमिंस, लोकी फर्ग्यूसन, वरुण चक्रवर्ती और कमलेश नागरकोटी.