आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CSK vs RR:राजस्थानचा सीजनमध्ये दुसऱ्यांना चेन्नईवर रॉयल विजय, गुणतालिकेत 5 व्या स्थानी झेप; बटलरचे IPL मध्ये 11 वे अर्धशतक

अबु धाबी2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 37वा मॅच चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) दरम्यान अबु धाबीमध्ये झाला. चेन्नईने टॉस जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला राजस्थानला 126 धावांचे टार्गेट दिले होते. हे या सीजनमधील सर्वात लहान टार्गेट होते. राजस्थानने 17.3 ओव्हरमध्येच लक्ष्य गाठले. जोस बटलरने शानदार 70 धावांची खेळी केली. बटलरचे हे आयपीएलमध्ये 11 वे अर्धशतक आहे. स्कोअरकार्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

चेन्नईकडून धोनीशिवाय रविंद्र जडेजाने नाबाद 35 आणि सॅम करनने 21 रन केले. राजस्थानच्या जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल आणि राहुल तेवतियाला एक-एक विकेट मिळाल्या.

वॉटसन-प्लेसिस लवकर आउट

चेन्नईची खराब सुरुवात झाली. ओपनर फाफ डु प्लेसिस 10 रनांवर जोफ्रा आर्चरच्या बॉवर जोस बटलरकडे कॅच आउट झाला.यानंतर शेन वॉटसन 8 रनांवर कार्तिक त्यागीच्या बॉलवर आउट झाला. सॅम करनला गोपालने आउट केले.

धोनीच्या नावे नवा विक्रम

चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा आयपीएलमध्ये 200 सामना आहे. धोनी एकमेव खेळाडू आहे, ज्याने आयपीएलमध्ये 200 सामने खेळले आहेत. धोनीच्या मागे रोहित शर्माने 197, सुरेश रैनाने 193, दिनेश कार्तिकने 191 आणि विराट कोहलीने 186 सामने खेळले आहेत.

राजस्थान आणि चेन्नईमध्ये झालेल्या मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सने सीएसकेचा शारजाहमध्ये 16 धावांनी पराभव केला होता. सीजनच्या चौथ्या सामन्यात रॉयल्सने 216 रन काढले होते. तर, चेन्नई 200 रन काढू शकली.

चेन्नईमध्ये दोन आणि राजस्थानमध्ये एक बदल

चेन्नईच्या संघात कर्ण शर्मा आणि ड्वेन ब्रावोच्या जागी पीयूष चावला आणि जोश हेजलवुडवा प्लेइंग इलेवनमध्ये जागा मिळाली आहे. तर, राजस्थान टीममध्ये जयदेव उनादकटच्या जागी अंकित राजपूतला घेतले आहे.

दोन्ही संघ

चेन्नई: फाफ डु प्लेसिस, सॅम करन, शेन वॉटसन, अंबाती रायडू, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), रविंद्र जडेजा, केदार जाधव, दीपक चाहर, पीयूष चावला, शार्दूल ठाकुर आणि जोश हेजलवुड.

राजस्थान: रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, संजू सैमसन (विकेटकीपर), स्टीव स्मिथ (कर्णधार), जोस बटलर, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, रियान पराग, श्रेयस गोपाल, अंकित राजपूत आणि कार्तिक त्यागी.

बातम्या आणखी आहेत...