आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 25 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सचा 37 धावांनी पराभव केला. दुबई खेळलल्या या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून फलंदाजी करत 170 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात उतरलेल्या चेन्नई 8 गडी बाद 132 धावा करता आल्या. चेन्नई विरुद्ध आरसीबीचा हा धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय आहे. याआधी 2010 मध्ये चेन्नईला 36 धावांनी पराभूत केले होते.
लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने (90) आयपीएलमध्ये आपले 38 वे अर्धशतक केले. या विजयासोबत बंगळुरू गुणतालिकेत टॉप-4 मध्ये पोहचला. या सत्रात चेन्नईचा संघ 7 पैकी 5 सामन्यांत पराभूत झाला आहे. चेन्नई सलामीचा सामना जिंकल्यानंतर सलग तीन सामने हारले. आपला 5वा सामना जिंकल्यानंतर चेन्नईने पुन्हा सलग 2 सामने गमावले.
कोहली-पडिक्कलने आरसीबीचा डाव सांभाळला
बंगळुरूने 4 गड्यांच्या मोबदल्यात 169 धावा केल्या. संघाची सुरूवात चांगली झाली नव्हती. केवळ 13 धावांवर पहिली विकेट गमावली होती. यानंतर कर्णधार कोहलीने देवदत्त पडिक्कलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सांभाळला. कोहलीने 52 चेंडूत नाबात 90 आणि पडिक्कलने 34 चेंडूत 33 धावांची खेळी केली. यानंतर कोहलीने शिवम दुबेसोबत मिळून 5 व्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केली. तर चेन्नईसाठी शार्दुल ठाकुरने सर्वाधिक 2 गडी बाद केले. दीपक चहर आणि सॅम करनला देखील 1-1 विकट मिळाली.
शार्दुलने एका षटकात पडिक्कल-डिव्हिलियर्सला बाद केले
शार्दुल ठाकुरने डावाच्या 11 व्या षटकात दोन गडी बाद केले. त्याने देवदत्त पडिक्कल (33) आणि एबी डिव्हिलियर्सला बाद केले. डिव्हिलियर्यला भोपळा देखील फोडता आला नाही. अॅरॉन फिंच 2 धावा करून बाद झाला. दीपक चहरने फिंचचा त्रिफळा उडवला.
आरसीबीमध्ये 2 आणि सीएसकेमध्ये 1 बदल
आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने संघात दोन बदल केले. मोइन अली आणि मोहम्मद सिराजच्या जागी क्रिस मॉरिस आणि गुरकीरत सिंह मानला संधी देण्यात आली आहे. तर सीएसकेमध्ये एक बदल करण्यात आला. केदार जाधवच्या जागी एन जगदीसनला संघात घेण्यात आले. जगदीसनचा हा डेब्यू सामना आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.