आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल:लीगमध्ये 5 हजार धावा करणारा रैना, 150 बळी घेणाऱ्या हरभजनशी चेन्नईची टीम करार करू शकते रद्द; पुढील सत्रात खेळण्यावर अनिश्चितता!

दुबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुढील सत्रात मोठा लिलाव कठीण, सर्व संघांना मोजके खेळाडू बदलण्याची संधी

आयपीएल-१३ सत्र सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्जचे दिग्गज खेळाडू सुरेश रैना व हरभजन सिंग वैयक्तिक कारणामुळे बाहेर झाले. रैना तर संघासोबत यूएईतदेखील गेला होता आणि व्यवस्थापनासोबत त्याचा वाद झाल्याची चर्चा होती. त्यानंतर टीमने दोघांचे नाव आपल्या संकेतस्थळावरून काढून टाकले होते. माध्यमांनुसार, आता फ्रँचायझीने मोठे पाऊल उचलले असून दोघांसोबत आपला करार समाप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे आता या कारवाईवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

आयपीएलच्या लिलाव नियमानुसार २०१८ मध्ये हरभजन सिंग व सुरेश रैनाने सीएसकेसोबत तीन वर्षांचा करार केला होता, जो २०२० मध्ये समाप्त होत आहे. सुरेश रैनाला प्रत्येक सत्रासाठी ११ कोटी आणि हरभजन सिंगला २ कोटी रुपये मिळत होते. माहितीनुसार, दोन्ही खेळाडूंना यंदा त्याचे वेतन देण्यात येणार नाही. मात्र, फ्रँचायझीचे सीईओ कशी विश्वनाथनने याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला. वेतनाबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, जेव्हा खेळाडू खेळतात तेव्हाच त्यांना पैसे दिले जातात. जे खेळत नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत. रैना व हरभज सिंगचा करार सीएसकेसोबत २०२० पर्यंत होता. जर फ्रँचायझीने त्यांच्यासोबतचा करार रद्द केला तर त्या दोघांना खूप वाईट परिणाम होईल. पुढील वर्षातील वेळेचा अभाव पाहता बीसीसीआयकडून पुढील वर्षी मोठ्या लिलावाची शक्यता कमी आहे.

पुढील वर्षी नव्याने लिलाव होणार होता. अशा परिस्थितीत फलंदाज सुरेश रैना व हरभजनचा सीएसकेसोबत कोणताच करार राहणार नाही. ते २०२१ च्या सत्रातून बाहेर राहण्याची शक्यता आहे. मात्र, काही संघांना खेळाडूंना बदलण्याची संधी मिळू शकते. अशात त्यांना संधी मिळाली तर वेतनात मोठी कपात होऊ शकते. त्यामुळे दाेघांना कोणत्या संघाकडून संधी मिळते, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच न खेळण्याचा निर्णय त्यांना महागात पडला.

रैनाने चेन्नईकडून तीन किताब पटकावले

सुरेश रैना २००८ पासून लीगमध्ये चेन्नईकडून खेळत आहे. टीमने तीन वेळा किताब जिंकला. रैना त्या विजेत्या संघाचा सदस्य आहे. दाेन सत्रांसाठी टीमबंदी असल्याने तो गुजरातकडून खेळला. १९३ सामन्यांत रैनाने ३३ च्या सरासरीने ५३६८ धावा काढल्या. यात एक शतक व ३८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने २५ बळीदेखील घेतले. एकूण टी-२० करिअरमध्ये त्याने ३१९ सामन्यांत ८३९२ धावा काढल्या. ४ शतके व ५१ अर्धशतके ठोकली. ५३ बळी घेतले. हरभजन मुंबई व चेन्नईकडून खेळला व त्याने एकूण चार किताब जिंकले आहेत.

बातम्या आणखी आहेत...