आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलमध्ये आज:स्पर्धेत आव्हान कायम ठेवण्यासाठी चेन्नई-राजस्थान आज झुंजणार

दुबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थान रॉयल्सपुढे अडचणींचा डोंगर

आयपीएल २०२० मध्ये प्लेऑफच्या आशा कायम ठेवण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स सोमवारी अबुधाबीमध्ये भिडतील. दाेघांसाठी हा सामना महसत्त्वपूर्ण आहे. दोघांनी आतापर्यंत ९-९ सामने खेळले, ज्यात त्यांचा ६-६ पराभव झाला. या सामन्यात पराभूत झालेल्या संघासाठी प्लेऑफचे दार जवळपास बंद होईल. पहिले खेळाडूंची स्पर्धेतून माघार घेणे आणि त्यानंतर दुखापतग्रस्त झाल्याने चेन्नई टीमचे कंबरडे मोडले. खेळाडूंनी अद्याप लय मिळवली नाही. दिल्ली विरुद्ध सामन्यात त्यांचे क्षेत्ररक्षण अतिशय वाईट झाले. त्यामुळे त्यांची अंतिम चारमध्ये जाण्याची शक्यता कमी झाली. सध्या ड्वेन ब्राव्हो जखमी आहे. त्याच्या जागी हेजलवुडला संधी मिळू शकते. त्यामुळेच ताहीर सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो, गत सत्रात पर्पल कॅप जिंकणारा हा खेळाडू चालू सत्रात एकही सामना खेळू शकला नाही. याशिवाय अद्याप छाप पाडण्यात अपयशी ठरत असलेला केदार जाधवच्या जागी युवा वेगवान गोलंदाज केएम आसिफला संधी दिली पाहिजे. दोन सामने बाहेर राहिल्यानंतर दिल्ली विरुद्ध त्याला फलंदाजी व गोलंदाजी दोन्ही मिळाले नाही.

राजस्थान रॉयल्सपुढे अडचणींचा डोंगर
राजस्थान समाेर अडचणींचा डाेंगर उभा आहे. त्यांना फलंदाजी क्रमात सुधारणा करावी लागेल. उथप्पा सोबत सलामीला बटलर योग्य खेळाडू आहे. गोलंदाजीतदेखील बदल करणे आवश्यक असून उनाडकटच्या जागी वरुण अॅरोनला संधी दिली पाहिजेे. भारताकडून खेळलेला युवा लेग स्पिनर मयंकला खेळवायला हवे. टीम या सामन्यातून लीगमध्ये पुनरागमन करू इच्छिते. दोन्ही संघांत आतापर्यंत २३ सामने खेळवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...