आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलमध्ये आज:चेन्नई-हैदराबादसाठी करा वा मरा; विजेत्या संघाला आगेकूचची संधी

दुबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लीगमध्ये दुसऱ्यांदा दाेन्ही संघ समाेरासमाेर; हैदराबादचे पारडे जड

सलगच्या पराभवाने अडचणीत सापडलेल्या गत उपविजेत्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघासाठी मंगळवारची आयपीएलमधील लढत अधिकच महत्वाची मानली जाते. कारण, या सामन्यातील विजेत्यास लीगमधील आपले आव्हान कायम ठेवता येईल. दुसरीकडे सामना गमावणाऱ्या संघाची प्ले आॅफमधील वाट अधिकच खडतर राहणार आहे. जवळपास या टीमला यातून बाहेर पडावे लागेल.

त्यामुळे आता चेन्नई आणि हैदराबाद संघासाठी हा सामना जवळपास करा वा मरा सारखाच आहे. यातूनच या सामन्यात दाेन्ही संघ आपले स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याच्या इराद्यानेच मैदानावर झुंज देणार आहेत. त्यामुळे या दाेन्ही संघातील हा सामना अधिकच रंगतदार हाेण्याची शक्यता आहे. यात धाेनीवर सर्वांची नजर असेल. यात त्याच्याकडून टीमला माेठ्या खेळीची आशा आहे.

सुमार फलंदाजीने चेन्नई पराभूत; दर्जेदार खेळीची आवश्यकता
गत उपविजेत्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला यंदाच्या सत्रामध्ये सुमार फलंदाजीचा सामन्यागणिक फटका बसत आहे. त्यामुळे संघाला प्रत्युत्तरात समाधानकारक खेळी करता येत नाही. यातूनच चेन्नईची टीम पराभवाची मालिका खंडित करू शकत नाही. गत सामन्यात बंगळुरूच्या कर्णधार काेहलीने चेन्नईविरुद्ध ९० धावा काढल्या. तर, चेन्नईचा कर्णधार आणि अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज धाेनी अवघ्या १० धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळे आता पराभवाची ही मालिका खंडित करण्यासाठी संघात काही बदल हाेण्याची शक्यता आहे. चेन्नईचा संघ आता सात सामन्यात पाच पराभवाने गुणतालिकेतमध्ये सातव्या स्थानावर आहे. या टीमच्या नावे आतापर्यंत दाेन विजयासह अवघे चार गुण आहेत.

हेड-टू-हेडमध्ये चेन्नई वरचढ
धाेनीच्या चेन्नई संघाचे आता हैदराबादविरुद्ध रेकाॅर्डमध्ये वर्चस्व कायम आहे. आतापर्यंत या दाेन्ही संघांमध्ये १३ सामने झाले. यातील ९ सामन्यांत चेन्नईने विजयी पताका फडकवली आहे. तसेच हैदराबादला चार सामन्यांत विजयाची नाेंद करता आली. त्यामुळे या कामगिरीत प्रगती साधण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser