आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वेगळ्या पद्धतीचे अनावरण चर्चेत:डेनी राेमेनने स्काय डायव्हिंग करत केले राजस्थान राॅयल्स टीमच्या जर्सीचे अनावरण

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 19 सप्टेंबरपासून यंदा 13 व्या सत्राच्या आयपीएलला सुरुवात हाेत आहे

येत्या १९ सप्टेंबरपासून यंदा १३ व्या सत्राच्या आयपीएलला सुरुवात हाेत आहे. त्यामुळे सर्वच संघ झपाट्याने लीगच्या तयारीला लागले आहेत. यातच राजस्थान राॅयल्सचे आपल्या टीमच्या जर्सीचे अनावरण जरा अधिकच चर्चेत राहिले आहे. स्काय ड्रायव्हर डेनी राेमेनने दुबई येथे स्काय डायव्हिंग करत या टीमच्या जर्सीचे अनावरण केले.

वेगळ्या पद्धतीच्या या अनावरणाची आता चांगलीच चर्चा रंगत आहे. यादरम्यान ट्रेकिंगच्या ठिकाणी राजस्थान राॅयल्स संघाचे खेळाडू माेठ्या संख्येत उपस्थित हाेते. ‘अशा प्रकारच्या डायव्हिंगच्या आधारे टीमच्या जर्सीचे अनावरण पाहणे अभिमानास्पद आहे. माझ्याही स्काय डायव्हिंगच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया मिलरने दिली.