आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलमध्ये आज:विजयी चाैकारासाठी पंजाबची आज बलाढ्य दिल्ली कॅपिटल्सशी झुंज

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युवा कर्णधार लाेकेश राहुलच्या किंग्ज इलेव्हन पंजाब टीमचा आयपीएलमध्ये डबल सुपर आेव्हरमधील एेतिहासिक विजयाने आता आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. त्यामुळे पराभवाची मालिका खंडित करून मिळालेला विजयाचा सूर असाच कायम ठेवण्यासाठी पंजाबचे किंग्ज उत्सुक आहेत. यातून आता आयपीएलमध्ये विजयाचा चाैकार मारण्यासाठी पंजाब संघाने कंबर कसली आहे.

यासाठी पंजाब संघाला आज मंगळवारी युवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या बलाढ्य दिल्ली कॅपिटल्स संघाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. हे दाेन्ही संघ आज दुबईच्या मैदानावर समाेरासमाेर असतील. विजयी माेहीम कायम ठेवताना दिल्ली संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर आहे.

दुसरीकडे पंजाबने शनिवारी रात्री गत चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाला दुसऱ्या सुपर आेव्हरमध्ये पराभूत केले. या सुपर आेव्हरमधील विजयाने पंजाब संघ फाॅर्मात आला आहे. त्यामुळे दिल्लीच्या टीमलाही सामन्यात उल्लेखनीय खेळी करावी लागणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यर हा नुकताच दुखापतीमधून सावरला आहे. मात्र, टीमचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि हेटमेयर अद्याप आक्रमक खेळी करण्यात सपशेल अपयशी ठरत आहे.

मयंक, लाेेकेश राहुल फाॅर्मात : सलगच्या विजयाने पंजाब संघाचा प्ले आॅफमधील प्रवेशाचा मार्ग सुकर करण्याच्या इराद्याने कर्णधार लाेकेश राहुल तुफानी खेळी करत आहे. त्यामुळे आपल्या अर्धशतकी खेळीमध्ये सातत्य ठेवताना त्याने यंदाच्या लीगमध्ये सर्वाधिक धावांच्या यादीतील अव्वल स्थान बळकट केले आहे.

ग्लेन मॅक्सवेल ठरताेय अडसर: पंजाब संघाच्या विजयामध्ये ग्लेन मॅक्सवेलची सुमार खेळी अडसर ठरत आहे. या महागड्या खेळाडूला अद्याप यंदाच्या लीगमध्ये पंजाब संघासाठी माेठी खेळी करता आली नाही.