आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलमध्ये आज:दिल्ली-बंगळुरूचा सामना हाेणार क्वार्टर फायनलप्रमाणे

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीने सलग चार सामने गमावले आहेत. त्यांची परिस्थिती आता ‘करा किंवा मरा’ची आहे. टीम सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी भिडेल. हा सामना क्वार्टर फायनलसारखा आहे. एका आठवड्यापूर्वी दिल्ली व बंगळुरूचे प्लेऑफमध्ये पोहोचणे निश्चित मानले जात होते. मात्र, आता मात्र वाटतेय दोन्हीपैकी एक टीम प्लेऑफमध्ये पोहोचेल. या सामन्यात दोघांत जोरदार लढत पाहायला मिळेल. कोणतीच टीम मजबूत नाही आणि कोणतीच टीम कमजोर नाही. लीग फेरीचे दोन दिवस बाकी आहेत आणि आतापर्यंत अंतिम चार संघ निश्चित झाले नाहीत.

दिल्लीची मुख्य अडचण पृथ्वी शॉ, ऋषभ पंत व शिखर धवनची खराब कामगिरी आहे. गत काही सामन्यांत त्यांची कामगिरी ढासळली आणि संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीला दुसरी चिंता आहे कागिसो रबाडा आणि आर. अश्विनच्या प्रदर्शनात घसरण. मधली फळीदेखील कमजोर दिसतेय. हेटमायर व स्टोइनिसदेखील लयीत नाहीत. लेगस्पिनर प्रवीण दुबेला केवळ एका सामन्यात संधी मिळाली, त्याला संधी मिळेल अशी अशा आहे.