आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

RCB vs DC:रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 59 धावांनी पराभव, दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाने घेतल्या 4 विकेट्स; गुणतालिकेत दिल्ली अव्वल स्थानी

दुबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 19वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी) दरम्यान दुबईत झाला. बंगळुरुने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्सने बंगळुरुला 197 धावांचे लक्ष्य दिले, पण बंगळुरुचा संघ 20 ओव्हरमध्ये फक्त 139 धावांची मजल मारू शकला. बंगळुरूकडून फक्त कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 43 धावा केल्या. इतर फलंदाजांना 20 धावाही काढता आल्या नाही. या विजयासह दिल्ली गुणतालिकेत टॉपवर केला आहे. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

दिल्लीसाठी सलामी जोडीने 68 रनांची ओपनिंग पार्टनरशिप केली

दिल्ली कॅपिटल्सचे ओपनर शिखर धवन आणि पृथ्वी शॉने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 68 रन केले. यात शॉने 42 आणि धवनने 32 धावा केल्या.

कोहलीने कोरोना नियम मोडला

दिल्लीच्या इनिंगदरम्यान कोहलीने चुकीने बॉलवर लाळ लावली. यानंतर त्याला आपली चुक समजली. परंतू, ही घटना कॅमेरात कैद झाली. यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या रॉबिन उथप्पाने कोरोना नियम मोडला होता.

दोन्ही संघ

दिल्ली: पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, हर्षल पटेल, कगिसो रबाडा आणि एनरिच नोर्तजे.

बंगळुरू: देवदत्त पडिक्कल, एरॉन फिंच, विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स (विकेटकीपर), मोइन अली, शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, इसुरु उडाना, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.