आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DC vs KXIP:किंग्स इलेवन पंजाबचा सलग तिसरा विजय, गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप; पराभवानंतरही दिल्ली टॉपवर

दुबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिखर धवनचे IPL मध्ये सलग दुसरे शतक

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 38वा सामना किंग्स इलेवन पंजाब (KXIP) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) दरम्यान दुबईत झाला. या सामन्यात पंजाबकडून दिल्लीचा पराभव झाला आहे. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम फंलादाजीचा निर्णय घेत आणि पंजाबला 165 धावांचे टार्गेट दिले होते. पंजाबने 19 ओव्हरमध्येच हे लक्ष्य गाठले. पंजाबकडून निकोलस पूरनने सर्वाधिक 53 धावा केल्या. त्यापाठोपाठ ग्लेन मॅक्सवेल 32 आणि क्रिस गेल 29 धावा केल्या. स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

गेल आणि राहुल लवकर आउट झाले

किंग्स इलेवन पंजाबची सुरुवात खराब झाली. टीमने पावर-प्लेमध्ये 3 विकेट गमवल्या. कर्णधार लोकेश राहुल 15, क्रिस गेल 29 आणि मयंक अग्रवाल 5 रनावर आउट झाले.

दुसरीकडे निकोलस पूरनने 53 आणि ग्लेन मैक्सवेलने 32 रनांची खेळी केली. पूरन (53) लीगमध्ये दुसरे अर्धशतक करुन आउट झाला. पूरनने मॅक्सवेलसोबत चौथ्या विकेटसाठी 69 रनांची पार्टनरशिप केली.

तुषारने सीजनमध्ये पावर-प्लेची सर्वात महाग ओव्हर टाकली

क्रिस गेलने मॅचच्या 5 व्या ओव्हरमध्ये 2 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने 26 रन केले. ही या सीजनमध्ये पावर-प्लेची सर्वात महाग ओव्हर होती, जी तुषार देशपांडेने टाकली.

किंग्स इलेवन पंजाबकडून क्रिस गेल 13 बॉलवर 29 रन काढून रविचंद्रन अश्विनच्या बॉलवर आउट झाला. यानंतर कर्णधार लोकेश राहुल 15 रन काढून अक्षर पटेलच्या बॉलवर आउट.

दिल्लीने 5 विकेटवर 164 रन काढले. दिल्लीची खराब सुरूवात झाली होती. पृथ्वी शॉ (7) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (14) रनांवर आउट झाले. दुसरीकडून ओपनर शिखर धवनने एक बाजू भक्कम सांभाळले आणि 61 बॉलवर 106 रन काढले.

धवनशइवाय कर्णधार श्रेयस अय्यर आणि विकेटकीपर ऋषभ पंत 14-14 रन काढून आउट झाले. श्रेयसने लीगमध्ये आपले दोन हजार रन पूर्ण केले. पंजाबसाठी मोहम्मद शमीने 2 विकेट घेतल्या, तर ग्लेन मैक्सवेल, जिमी नीशम आणि मुरुगन अश्विनला 1-1 विकेट मिळाल्या.

पृथ्वी शॉ सलग चौथ्या मॅचमध्ये फ्लॉप

सलामीवीर पृथ्वी शॉ सलग चौथ्या मॅचमध्ये फ्लॉप ठरला. शॉ 4 मॅचमध्ये फक्त 11 रन काढू शकला. यात राजस्थान आणि चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात झिरोवर ,मुंबईविरोधात झालेल्या सामन्यात 4 आणि आजच्या मॅचमध्ये 7 रन केले.

कर्णधार श्रेयस अय्यरने प्लेइंग इलेवनमध्ये तीन बदल केले आहेत. दिल्ली संघात विकेटकीपर ऋषभ पंत, शिमरॉन हेटमायर आणि डेनियल सॅम्सचे पुनरागमन झाले आहे. त्यांच्यासाठी एलेक्स कैरी, एनरिक नोर्तजे आणि अजिंक्य रहाणेला बाहेर ठेवण्यात आले आहे. पंजाबच्या कर्णधार लोकेश राहुलने संघात एक बदल केला आहे. क्रिस जॉर्डनच्या जागी जिमी नीशमला सामील केले आहे.

दोन्ही संघ

दिल्ली: पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, डेनियल सेम्स, मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, तुषार देशपांडे आणि कगिसो रबाडा.

पंजाब: लोकेश राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मैक्सवेल, दीपक हूडा, मुरुगन अश्विन, जिमी नीशम, मोहम्मद शमी, रवि बिश्नोई आणि अर्शदीप सिंह.

बातम्या आणखी आहेत...