आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

DC vs RR:दिल्ली कॅपिटल्सकडून राजस्थान रॉयल्सचा 13 धावांनी पराभव; दिल्लीची गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप, धवन 39 आणि अय्यरची अर्धशतकी खेळी

दुबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयपीएलमध्ये धवनचे 39वे आणि अय्यरचे 15वे अर्धशतक

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 30वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स (डीसी) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर)दरम्यान दुबईत झाला. या सामन्यात दिल्लीने राजस्थानला 13 धावांनी पराभूत केले. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत राजस्थानला 162 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेला राजस्थान संघ फक्त 148 धावा काढू शकला. या विजयासह दिल्ली गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला आहे. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

राजस्थानकडून जोस बटलर 9 बॉलमध्ये 22 धावा काढून आउट झाला. बटलरला ऐनरिक नॉर्टजेने आउट केले. त्यानंतर कर्णधार स्टिव्ह स्मिथला रविचंद्रन अश्विनने आउट केले. स्मिथ फक्त 1 रन काढू शकला. त्यानंतर बेन स्टोक्स 35 बॉलमध्ये 41 धावांवर तुषार देशपांडेच्या चेंडूवर आउट झाला. यानंतर अक्षर पटेलने संजू सॅमसनला आउट केले. सॅमसनने 18 चेंडूत 25 धावा केल्या. त्यानंतर रॉबिन उथप्पा 32 धावांवर आणि राहुल तेवतिया 14 धावांवर आउट झाला.

नोर्तेजने टाकला या सीजनचा सर्वात वेगवान चेंडू

ओपनर जोस बटलर 9 बॉलवर 22 रन काढून आउट झाला. बटलरला एनरिच नोर्तजेने या सीजनचा दुसरा सर्वात वेगवान 155.1 किमी प्रती तासांच्या वेगाने बॉल टाकून क्लीन बोल्ड केले. सीजनचा सर्वात वेगवान बॉल 156.2 किमी प्रती तासांच्या वेगाने नोर्तजेने याच सामन्यात टाकला.

दिल्लीचा कर्णधार अय्यर दुखापतग्रस्त होऊन सामन्यातून बाहेर

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर जखमी होऊन सामन्यातून बाहेर गेला आहे. पाचव्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूला अडवताना अय्यर जखमी झाला.

दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने 53 आणि शिखर धवनने 57 धावा केल्या. शिखरने आयपीलमध्ये 39 वे आणि श्रेयस अय्यरने 15 अर्धशतक लगावले. धवन आणि अय्यरची तिसऱ्या विकेटसाठी 70 पेक्षा जास्त रनांची पार्टनरशिप झाली.

दरम्यान, दिल्लीची सुरुवात खराब झाली होती. संघाने अवघ्या 10 रनांवर दोन विकेट गमावल्या होत्या. दोन्ही विकेट जोफ्रा आर्चरने घेतल्या. अजिंक्य रहाणे 2 आणि पृथ्वी शॉ झिरो रनांवर आउट झाला.

सीजनमध्ये दिल्ली आणि राजस्थानचा हा दुसरा सामना आहे. यापूर्वी शारजाहमध्ये झालेल्या सामन्यात दिल्लीने राजस्थानला 46 धावांनी पराभूत केले होते. दिल्लीने या सीजनमध्ये दुबईच्या मैदानावर तीन सामने खेळले आणि तिन्हीमध्ये विजय मिळाला.

दोन्ही संघ

दिल्ली: पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टोइनिस, एलेक्स कैरी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, कगिसो रबाडा आणि एनरिच नोर्तजे.

राजस्थान: जोस बटलर (विकेटकीपर), बेन स्टोक्स, संजू सैमसन, स्टीव स्मिथ (कर्णधार), रॉबिन उथप्पा, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, जयदेव उनादकट आणि कार्तिक त्यागी.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser