आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

DC vs RCB:दिल्ली कॅपिटल्सचा बंगळुरुवर दणदणीत विजय; पराभवानंतरही RCB ला प्ले-ऑफमध्ये स्थान

अबुधाबीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

IPL च्या 13 व्या सत्रातील 55 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) ने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या नंबरवर पोहचली आहे. आता क्वालिफायर-1 मध्ये 5 नोव्हेंबरला दिल्लीचा सामना मुंबईसोबत होईल. तर, पराभवानंतरही बंगळुरूला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळाले आहे. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

अबु धाबीमध्ये झालेल्या सामन्यात बंगळुरुने 153 रनांचे टार्गेट दिले होते. प्रत्यत्तरात दिल्लीने 19 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 154 रन काढून सामना खिशात घातला. अजिंक्य रहाणेने(60) आयपीएलमध्ये 28वे अर्धशक लगावले. तर, शिखर धवनने(54) 40वी फिफ्टी केली. तर, बंगळुरूकडून शाहबाज अहमदे 2, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदरला 1-1 विकेट मिळाल्या.

बंगळुरुकडून देवदत्त पडिक्कलने सीजनमधील आपले 5वे अर्धशतक लगावले आणि 50 रनावर आउट झाला. एबी डिविलियर्सनेही 35 रनांची खेळी केली. तर दिल्लीच्या एनरिच नोर्तजेने 3, कगिसो रबाडाने 2 आणि रविचंद्रन अश्विनने एक विकेट घेतली.

पावर-प्लेमध्ये 40 रन

बंगळुरुचा ओपनर देवदत्त पडिक्कल आणि जोश फिलिप संघाला चांगली सुरुवात करुन देऊ शकले नाही. जोश फिलिप 12 रन काढून कगिसो रबाडाच्या बॉलवर आउट झाला. बंगळुरुने पावर-प्लेमध्ये 40 रन केले.

कोहली-पडिक्कलदरम्यान 57 रनांची पार्टनरशिप

पहिली विकेट पडल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलने बाजू सांभाळली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 57 रनांची पार्टनरशिप केली. या भागीदारीला रविचंद्रन अश्विनने विराट कोहलीची विकेट घेऊन तोडले.

दोन्ही संघ

बंगळुरू: देवदत्त पडिक्कल, जोश फिलिप, विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शिवम दुबे, शाहबाज अहमद, क्रिस मॉरिस, इसुरु उडाना, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.

दिल्ली: शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस, डेनियल सैम्स, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा आणि एनरिच नोर्तजे.