आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयपीएलच्या 13 व्या सत्राचा अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. यातच आता शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स संघात मोठा बदल करण्यात आला आहे. संघाचा विद्यमान कर्णधार दिनेश कार्तिक याने संघाचे कर्णधारपद सोडले आहे. आता संघाच्या कर्णधारपदी इयोन मोर्गन असणार आहे. कोलकाताने आपल्या ट्विटर हॅंडलवरुन याबाब माहिती दिली.
📰 "DK and Eoin have worked brilliantly together during this tournament and although Eoin takes over as captain, this is effectively a role swap," says CEO and MD @VenkyMysore #IPL2020 #KKR https://t.co/6dwX45FNg5
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 16, 2020
आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि संघाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी दिनेशा कार्तिकने कर्णधारपद सोडल्याची माहिती आहे. दिनेश कार्तिकने आयपीएलच्या या मोसमात फक्त एकाच सामन्यात अर्धशतक केले आहे. परंतू, इतर सामन्यात त्याची कामगिरी चांगली राहिली नाही. सध्या, कोलकाता 7 पैकी 4 सामने जिंकून गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.
आज कोलकाता मुंबई आमने-सामने
आयपीएलच्या 13व्या सत्रातील 32 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे. आज मुंबईकडे सलग पाचवा विजय मिळवण्याची संधी आहे. मुंबईसमोर कोलकाता नेहमी दबावात खेळताना दिसतो. यापूर्वी दोन्ही संघात झालेल्या 10 सामन्या मुंबईने कोलकाताला 9 वेळा पराभूत केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.