आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल 2020:पहिल्यांदा फायनल खेळण्यासाठी दिल्ली तगड्या मुंबईशी भिडणार; मुंबई व दिल्लीमध्ये पहिला पात्रता सामना आज

दुबईतून चंद्रेश नारायणनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईने 2 लीग सामन्यांत दिल्लीला हरवले आहे, दोन्ही संघांचा विक्रम बरोबरीत

आयपीएल-२०२० चा पहिला पात्रता सामना गुरुवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल. विजेत्या संघाला फायनलचे तिकीट मिळेल. दुसरीकडे, पराभूत संघ बाद लढतीतील विजेत्याशी दुसरा पात्रता सामना खेळेल. यंदाच्या सत्रात मुंबई टीम जबरदस्त खेळत आहे. त्यांनी सर्वप्रथम प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. रोहित शर्मा जखमी झाल्यानंतर कामगिरीत चढ-उतार दिसला. मात्र, अखेरच्या लीग सामन्यात पुन्हा एकदा टीमने पुनरागमन केले. यंदा टीम सर्व क्षेत्रात शानदार कामगिरी करतेय. त्यांच्याकडे फिरकीपटूंची कमी आहे असे म्हणता येणार नाही. कृणाल पांड्या व राहुल चाहरने चांगली कामगिरी केली. दिल्ली कॅपिटल्स गत काही सामन्यांपासून अडचणीत आहे. अंतिम लीग सामन्यात त्यांनी बंगळुरूला पराभूत करत उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.

दोन्ही संघांचा विक्रम बरोबरीत

दोन्ही संघांत आतापर्यंत एकूण २६ सामने खेळवले गेले. मुंबईने १४ व दिल्लीने १२ लढती जिंकल्या. आयपीएलच्या इतिहासात मुंबई व दिल्ली पहिल्यांदा प्लेऑफमध्ये समोरासमोर असतील. यंदाच्या सत्रातील लीगचे दोन्ही सामने मुंबईने सहज जिंकले. टीमने पहिला सामना ५ गड्यांनी आणि दुसरा ९ गड्यांनी जिंकला. या सामन्यातील विजय मुंबईला पाचव्यांदा फायनलमध्ये पोहोचवेल. रोहित शर्माच्या टीमने आतापर्यंत सर्व ४ फायनल जिंकल्या आहेत.