आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक धक्का:खासगी कारणास्तव हरभजन सिंगने आयपीएलमधून घेतली माघार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हरभजनने आयपीएलमध्ये 160 सामन्यात 150 विकेट्स घेतल्या आहेत

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) ला आणखी एक धक्का बसला आहे. संघातील ऑफ स्पिनर हरभजन सिंगने खासगी कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आहे. यापूर्वीच सीएसकेचा उपकर्णधार सुरेश रैनाही टुर्नामेंट सोडून भारता परतला आहे.

हरभजनने आयपीएलमध्ये 160 सामन्यात 150 विकेट्स घेतल्या आहेत.यादरम्यान 829 धावाही केल्या. महेंद्र सिंह धोनी चेन्नईचा कर्णधार आहे. रैना आणि हरभजनसारख्या अनुभवी खेळाडूंनी माघार घेतल्यानंतर संघाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

सीएसकेचे दोन खेळाडू आणि 11 स्टाफ संक्रमित

काही दिवसांपूर्वीच सीएसके टीमचे 2 खेळाडू दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाडसह 11 स्टाफ मेंबरला कोरोनाची लागण झाली होती. 14 दिवसांच्या क्वारंटाइन पीरियडनंतर पुढच्या आठवड्यात सर्वांची परत कोरोना चाचणी होईल. कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना संघात खेळवले जाईल.

19 सप्टेंबरपासून सुरू होईल आयपीएल

यावर्षी आयपीएल यूएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. सर्व 8 संघामध्ये 60 सामने तीन स्टेडियम दुबई, शारजाह आणि अबु धाबीमध्ये होतील.