आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL मध्ये ब्लॅक लाइव्स मॅटर:हार्दिक पांड्याचे राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यात गुडघ्यावर बसून 'ब्लॅक लाइव्ह मॅटर' आंदोलनाला समर्थन

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई इंडियंसचा धडाकेबाज खेळाडू हार्दिक पांड्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 25 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात 'ब्लॅक लाइव्स मॅटर'ला गुडघ्यावर बसून समर्थन केले. पांड्याने रविवारी झालेल्या सामन्यात 21 बॉलवर 60 धावा केल्या. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर पांड्याने गुडघ्यावर बसून ब्लॅक लाइव्स मॅटरचे समर्थन केले. सामन्यानंतर पांड्याने इंस्टाग्रामवर फोटोही शेअर केली आणि ब्लॅक लाइव्ह मॅटर असे कॅप्शन दिले.

View this post on Instagram

#BlackLivesMatter

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on Oct 25, 2020 at 11:55am PDT

डॅरन सॅमीने आयपीएलमध्ये वर्णभेदाचा आरोप केला होता

या वर्षाच्या सुरुवातील अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर संपूर्ण जगात वर्णभेदाविरोधात ब्लॅक लाइव्स मॅटर आंदोलन सुरू करण्यात आले. यात अनेक क्रिकेटर आणि इतर खेळातील खेळाडूंनी या आंदोलनाचे समर्थन केले. दरम्यान, डॅरन सॅमीने आयपीएलमध्ये 2013 आणि 2014 मध्ये त्याच्यावर वर्णभेदाची टिप्पणी केल्याची माहिती दिल्यानंतर क्रिकेटमध्येही प्रकरण चांगलेच गाजले. वेस्ट इंडीजच्या कॅरेबियन लीगमध्येही पहिल्या तीन सामन्यात सामना सुरू होण्यापूर्वी खेळाडूंनी गुडघ्यावर बसून ब्लॅक लाइव्ह मॅटर आंदोलनाचे समर्थन केले होते.

जेसन होल्डरने ब्लॅक लाइव्स मॅटरवर चर्चा न होण्यावर नाराजी व्यक्त केली होती

सनरायजर्स हैदराबादचा खेळाडून जेसन होल्डरने आयपीएलमध्ये ब्लॅक लाइव्स मॅटर आंदोलनावर चर्चा न झाल्यामुळे आपली नाराजी व्यक्त केली होती.

बातम्या आणखी आहेत...