आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आयपीएलमध्ये आज:श्रेयसच्या दिल्ली कॅपिटल्ससमाेर गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सचे आव्हान, कॅप्टन वॉर्नर-स्मिथ यांच्यात मोठी लढाई

दुबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल-१३ चा सर्वात रोमांचक सामना रविवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला जाईल. आतापर्यंत दोन्ही संघ चांगल्या लयीत दिसले. हा एक शानदार सामना होईल, मात्र चाहत्यांना मैदानात सामन्याचा आनंद घेता येणार नाही. फक्त टीव्हीवरील चाहते सामना पाहू शकतील. दोन्ही संघांचे तगडे खेळाडू असल्याने त्याचा आनंद घेतील. दिल्लीचा विचार केल्यास त्यांच्याकडे शानदार गोलंदाजी आक्रमण आहे. एनरिच नोर्तजे आणि कागिसो रबाडा ज्या प्रकारे गोलंदाजी करताहेत ती जोडी अत्यंत धोकादायक आहे. आर. अश्विन व अक्षर पटेल जोडीमुळे गोलंदाजी आणखी खुलली. मार्क्स स्टोइनिस व हर्षल पटेलदेखील श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील संघाची मदत करत आहे. फलंदाजीत अडचण येत आहे. सलामीवर पृथ्वी शॉ व शिखर धवनने काही सामन्यात वेगवान सुरुवात करून दिली. मात्र, ऋषभ पंतने अद्याप आक्रमक फलंदाजी केली नाही. दुसरीकडे, स्टोइनिस व हेटमायरने एक-दोन चांगल्या खेळी केल्या. अव्वल फलंदाजांचे अपयश त्यांनी झाकले. मुंबई टीम या कमीचा फायदा उचलू शकते.

मुंबईकडेदेखील शानदार गोलंदाजी आहे. जसप्रीत बुमराह, जेम्स पॅटिनसन व ट्रेंट बोल्टने सत्रात चांगली कामगिरी केली. त्याने नव्या चेंंडूसह अखेरच्या षटकांत बळी घेतले. फिरकीपटूंची अडचण आहे. मात्र, राहुल चहल व कृणाल पांड्याने चांगली कामगिरी केली. हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली नसली तरी पोलार्डने ती जागा भरून काढली आहे. पोलार्डने बॅटनेदेखील चांगले प्रदर्शन केले. आघाडीची फळी अपयशी ठरली तरी पोलार्डसोबत पांड्या बंधू आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकतात. कर्णधार रोहित शर्मा व क्विंटन डिकॉकने आतापर्यंत चांगली सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबई टीम सध्या दिल्लीपेक्षा चांगली दिसतेय. हा स्पर्धेतील उत्कृष्ट सामन्यांपैकी एक राहील, मात्र मुंबईने थोडी आघाडी घेतली आहे.

दोघांनी १२-१२ सामने जिंकले : दोन्ही संघांत आतापर्यंत २४ सामने खेळवण्यात आले. दोघांनी १२-१२ लढती जिंकल्या. अखेरच्या दोन सत्रांतील चार सामन्यांचा विचार केल्यास दिल्लीने ३ आणि मुंबईने केवळ एक सामना जिंकला.

कॅप्टन वॉर्नर-स्मिथ यांच्यात मोठी लढाई
लीगचे सामने आता वेगाने पुढे सरकत आहेत. शुक्रवारी दिल्लीकडून पराभूत झाल्यानंतर राजस्थान टीम रविवारी सनरायझर्स हैदराबादशी भिडेल. राजस्थानला संघ निवडीत सातत्य नसल्याने संघर्ष करावा लागतोय यावर विचार करायला हवा. टीमने अंतिम ११ मध्ये आतापर्यंत १७ खेळाडूंना आजमावले. ही बाब समन्वय आणि संवाद कमी असल्याचे दर्शवते. चार जागतिक दर्जाचे खेळाडू स्मिथ, जोस बटलर, बेन स्टोक्स व जोफ्रा आर्चर संघातून त्यांना गुणतालिकेत तळाला राहावे लागते, ही खेदाची गोष्ट आहे. त्यामागे काही कारणे आहेत. सर्वात मोठे कारण कर्णधार स्टीव्ह स्मिथचा फॉर्म नसणे. त्याचबरोबर मधल्या फळीला अनुभव नाही. संजू सॅमसनने चांगली सुरुवात केली, मात्र त्यानंतर तो विशेष काही करू शकला नाही. त्यामुळे तो तिन्ही प्रकारच्या भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही. युवा यशस्वी जैस्वालदेखील अपयशी ठरला. त्याचप्रमाणे गोलंदाजीची अडचण सुटली नाही. अंकित राजपूत, जयदेव उनाडकट, कार्तिक व वरुण अॅरोनला संधी मिळाली,मात्र, ते अपयशी ठरले.