आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल 2020:बंगळुरूचा चार वर्षानंतर सलामीला विजय; हैदराबादचा 10 धावांनी पराभव, देवदत्त पड्डिकलचे पदार्पणातच अर्धशतक साजरे

दुबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विराट काेहलीच्या नेतृत्वात विजयाचे अर्धशतक साजरे; दमदार विजयाने बंगळुरूची सुरुवात

देवदत्त पड्डिकल (५६), डिव्हिलियर्सच्या (५१) झंझावातापाठाेपाठ नवदीप सैनी (२/२५), शिवम दुबे (२/१५) व सामनावीर यजुवेंद्र चहलच्या (३/१८)भेदक गाेलंदाजीच्या बळावर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने साेमवारी आयपीएलमध्ये विजयाची नाेंद केली. काेहलीच्या नेतृत्वात बंगळुरू संघाने आपल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद टीमचा पराभव १० धावांनी केला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरू संघाने ५ बाद १६३ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादचा १९.४ षटकांत १५३ धावांवर धुव्वा उडाला. त्यामुळे टीमचा विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला. बंगळुरूकडून युवा गाेलंदाज नवदीप सैनी, चहल व शिवम दुबेची कामगिरी सरस ठरली. बंगळुरू संघाने चार वर्षानंतर लीगमधील आपला पहिला सामना जिंकला. तेव्हा आणि आताही सलामीला हैदराबादवर मात केली.

बंगळुरूच्या दाेघांची झंझावाती खेळी

यंदाच्या सत्रात किताबाचा पल्ला गाठण्याच्या इराद्याने विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ मैदानावर उतरला. नाणेफेकीचा काैल सनरायझर्स हैदराबाद संघाला मिळाला. मात्र, प्रथम फलंदाजी करताना बंगळुरू संघाने दमदार सुरुवात केली. केरळच्या युवा देवदत्त पड्डिकल (५६) आणि अॅराेन फिंच (२९) या सलामीच्या जाेडीने संघाला ९० धावांच्या भागीदारीची सलामी दिली. यात पड्डिकलने शानदार खेळी करताना ४२ चेंडूंूमध्ये ८ चाैकारांसह ५६ धावा काढल्या. यासह त्याने पहिल्याच सामन्यात अर्धशतक साजरे केेले. त्याचे पदार्पणातील हे अर्धशतक अधिकच चर्चेत ठरले आहे. त्यानंतर डिव्हिलियर्सने संघाच्या धावसंख्येला गती देत अर्धशतक साजरे केले. त्याने ३० चेंडूंचा सामना करताना चार चाैकार आणि दाेन उत्तंुग षटकारांच्या आधारे ५१ धावा काढल्या. यात टीमचा कर्णधार विराट काेहली अपयशी ठरला. त्याला १४ धावांची खेळी करता आली. त्याचा माेठ्या खेळीचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. त्यामुळेच ताे झटपट पॅव्हेलियनमध्ये परतला. हैदराबाद संघाकडून नटरंजन, व्ही.शंकर आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी १ विकेट घेतली.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीकडे सनराइजर्सचा कर्णधार डेविड वॉर्नरकडून 2016 फायनलच्या पराभवाचा बदला घेण्याची संधी होती, ती त्याने घेतली. वॉर्नरने कोहलीला 8 धावांनी पराभूत करुन दुसऱ्यांना आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले होते. मागच्या सीजनमध्ये आरसीबी सर्वात खाली 8 व्या स्थानावर होती, तर हैदराबाद एलिमिनेटरपर्यंत पोहचली होती.

यापूर्वी हैदराबादने 2009 मध्ये माजी ऑस्ट्रेलियन विकेटकीपर अॅडम गिलक्रिस्टच्या नेतृत्वात आयपीएल किताब जिंकला होता. तेव्हा संघाचे नाव डेक्कन चार्जर्स होते. 2013 मध्ये सन टीवी नेटवर्कने हैदराबादचा संघ विकत घेतल्यानंतर नाव बदलून सनराइजर्स हैदाराबद केले.

दोन्ही संघ

सनराइजर्स हैदराबाद : डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), मनीष पांडे, विजय शंकर, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, मिशेल मार्श, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि संदीप शर्मा.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : एरॉन फिंच, विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, जोश फिलिप (विकेटकीपर), शिवम दुबे, देवदत्त पल्लीकल, वाशिंगटन सुंदर, नवदीप सैनी, उमेश यादव, डेल स्टेन आणि युजवेंद्र चहल.

कोहली एका संघासाठी 50+ सामने जिंकणारा चौथा कर्णधार

आरसीबीने 2016 सोबतच 2011 मध्ये डेनियल विटोरी आणि 2009 मध्ये अनिल कुंबळेच्या नेतृत्वात फायनलपर्यंत धडक मारली होती. पण, प्रत्येक वेळेस संघाचे नशीब खराब निघाले. परंतू, विराट आतापर्यंतचा आरसीबीचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. विराटने 110 सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी 49 सामन्यात संघाला विजय मिळाला. हैदराबादविरुद्ध सामन्या जिंकल्यानंतर विराट आयपीएलमध्ये एका संघाला 50+ सामने जिंकून देणारा चौथा कर्णधार ठरेल. यापूर्वी महेंद्र सिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्स, गौतम गंभीरने कोलकाता नाइट राइडर्स आणि रोहित शर्माने मुंबई इंडियंसला इतके सामन जिंकून दिले आहेत. धोनी एकमेव कर्णधार आहे, ज्याने सीएसकेला 100 सामने जिंकून दिले आहेत.

दोन्ही संघातील महाग खेळाडू

हैदराबादमध्ये वॉर्नर सर्वात महाग खेळाडू आहे. संघाने त्याला 12.50 कोटींमध्ये खरेदी केले आहे. त्यानंतर मनीष पांडेचे नाव आहे, ज्याच्यावर 11 कोटींची बोली लागली आहे. तसेच, आरसीबीमध्ये कोहली 17 कोटी आणि एबी डिविलियर्स 11 कोटींसह सर्वात महाग खेळाडू आहेत.

दोन्ही संघांसाठी फिरकीपडूंची महत्वाची भूमिका असेल

हैदराबादकडे जगातील नंबर-1 गोलंदाज आणि लेग स्पिनर राशिद खान आहे. नंबर-1 ऑलराउंडर आणि ऑफ स्पिनर मोहम्मद नबी तसेच स्पिनर नदीमदेखील आहे. तर, बंगळुरुमध्ये लेग स्पिनर युजवेंद्र चहल, एडम जंपा आणि ऑफ स्पिनर वाशिंगटन सुंदर आहेत.

पिच आणि हवामान रिपोर्ट

दुबईमध्ये सामन्यादरम्यान आकाश साफ असेल. तापमान 27 ते 37 डिग्री सेल्सियसदरम्यान असण्याची शक्यता आहे. पिचमुळे फलंदाजांना फायदा होईल. येथे स्लो विकेट असल्यामुळे स्पिनर्सलाही मदत मिळेल. टॉस जिंकणारा संघ पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. या स्टेडियममध्ये झालेल्या मागील 62 टी-20 सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाचा सक्सेस रेट 56.45% आहे.

वॉर्नर आणि विलियम्सन हैदराबादचे मजबुत फलंदाज

हैदराबादकडे वॉर्नरशिवाय जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, प्रियम गर्ग आणि मनीष पांडेसारखे धुरंधर फलंदाज आहेत. तर, गोलंदाजीमध्येभुवनेश्वर कुमारशिवाय खलील अहमद आणि विराट सिंह आहे.

कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज

आरसीबीमध्ये आयपीएलमध्ये सर्वात जास्त 5,412 धावा करणाऱ्या विराट कोहलीशिवाय एबी डिविलियर्स आणि एरॉन फिंचसारखे तगडे फलंदाज आहेत. तसेच, क्रिस मॉरिस, मोइन अली आणि वाशिंगटन सुंदरसारखे ऑलराउंडरदेखील आहेत. बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये आरसीबीकडे युजवेंद्र चहल, उमेश यादव आणि नवदीप सैनी आहेत.

बातम्या आणखी आहेत...