आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल-13:पुढील सामन्यात ग्लुकोज घेऊन फलंदाजीला यावे लागणार : वीरेंद्र सेहवाग

दुबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चेन्नई सुपरकिंग्जच्या सुमार कामगिरीवर माजी क्रिकेटपटूंचे मत

चेन्नई सुपर किंग्ज शुक्रवारी रात्री दिल्ली कॅपिटल्सकडून ४४ धावांनी पराभूत झाली. यादरम्यान चेन्नई तीन वेळेची चॅम्पियन आहे, असे त्यांच्या खेळीवरून वाटत नव्हते. टीम तीनपैकी दोन सामन्यांत पराभूत झाली. त्यांच्या खराब कामगिरीबद्दल सेहवागने म्हटले की - त्यांच्या खेळाडूंना ग्लुकोजची गरज आहे. दुसरीकडे, आकाश चोप्राने म्हटले की - धोनीला रैनाची उणीव भासतेय, त्याचा पर्याय अद्याप मिळालेला नाही.

चेन्नईचे फलंदाज अपयशी, त्यांना ग्लुकोजची गरज : सेहवाग
“गत उपविजेत्या चेन्नई संघाचे आघाडीचे आणि अनुभवी फलंदाज सातत्याने अपयशी ठरत आहेत. ते सावध खेळी करताना दिसत नाहीत. वेगाने मोठी धावसंख्या उभारू शकत नाहीत. त्यांना आपल्या खेळात सुधारणा करण्यासाठी ग्लुकोजची गरज आहे. त्यांना पुढील सामन्यात फलंदाजीपूर्वी ग्लुकोज घेऊन येण्याची गरज आहे,’असाही खाेचक टाेला सेहवागने लावला. त्यामुळे त्याची ही टीका अधिकच बाेचरी ठरली आहे. चेन्नईला सलग दुसऱ्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला.

शुक्रवारी चेन्नईचा वॉटसन (१४) व मुरली विजय (१०) अपयशी ठरले. आघाडीचे फलंदाज १० षटकांत ४७ धावा करू शकले. प्लेसिस (४३) वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली. केदार जाधवने २६, धोनीने १५ आणि रवींद्र जडेजाने १२ धावा काढल्या. याच सुमार फलंदाजीचा माेठा फटका टीमला बसला.

आघाडीच्या अपयशामुळे चिंतित : आकाश चोप्रा
आघाडीचे अपयश चिंतेचे मुख्य कारण आहे. त्यामुळे चेन्नईचे संतुलनदेखील बिघडले. धोनीला पाच गोलंदाजांसह खेळण्यास आवडत नाही. मी त्याला पहिल्यांदा पाच गोलंदाजांसह खेळताना पाहिले. धोनीला रैनाची उणीव भासतेय. त्याचा पर्याय अद्याप मिळालेला नाही. जडेजादेखील महागडा ठरतोय. धोनी तळाला खेळत असल्याने टीका होत आहे. मी समजू शकतो की, धोनी कुठे व का फलंदाजी करतोय. धोनी युवा ऋतुराज गायकवाड व विजयला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवतो, हे पाहावे लागेल, असेही आकाश चाेप्राने सांगितले. यादरम्यान त्यांनीही सुमार खेळीवर टीका केली.

बातम्या आणखी आहेत...