आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिल्लीने चेन्नईचा 44 धावांनी केला पराभव:दिल्ली कॅपिटलचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 वा विजय; पृथ्वी शॉ आणि रबाडा ठरले दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार, या मोसमात चेन्नईचा सलग दुसरा पराभव

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या पृथ्वी शॉने 64 धावांची खेळी केली तर रबाडाने 3 गडी बाद केले

आयपीएल 2020 च्या सातव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्जचा 44 धावांनी पराभव केला. चेन्नईविरुद्ध झालेल्या 22 सामन्यांत दिल्लीचा हा 7 वा विजय आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत दिल्लीने चेन्नईला 176 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरासाठी उतरलेल्या चेन्नईला 20 षटकात 7 बाद 131 धावांपर्यंत मजल मारता आली. या मोसमातील चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव आहे. पृथ्वी शॉ आणि कगिसो रबाडा दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पृथ्वी शॉने 64 धावांची खेळी केली तर रबाडाने 3 गडी बाद केले.

सामन्याचा संपूर्ण स्कोअर बोर्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा

चेन्नईची खराब सुरुवात

दिल्लीने 176 धावांचे दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची खराब सुरुवात झाली. शेन वॉटसन 14 धावा करून अक्षर पटेलच्या चेंडूवर शिमरॉन हेटमायर हातात झेल दिला. यानंतर मुरली विजय देखील एनरिच नोर्त्जेच्या चेंडूवर बाद झाला. विजयने 10 धावा काढल्या.

डु प्लेसिसने IPL मध्ये 2000 धावा पूर्ण केल्या

फाफ डू प्लेसिसने आयपीएलमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. असा करणारा तो 33 वा खेळाडू आहे. प्लेसिसने 74 सामन्यांत 67 डावांत हा आकडा पार केला. त्याने आतापर्यंत या स्पर्धेत 14 अर्धशतके झळकावले आहेत.

दिल्लीने 3 गडी बाद 175 धावा केल्या

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 3 गडी बाद 175 धावा केल्या. दिल्लीच्या पृथ्वी शॉने आयपीएलमध्ये आपले 5 वे अर्धशतक झळकावले. त्याने 64 धावा केल्या. पृथ्वीशिवाय ऋषभ पंतने नाबाद 37, शिखर धवनने 35 आणि श्रेयस अय्यरने 26 धावांची खेळी केली. मार्कस स्टोइनिस 5 धावा करून नाबाद राहीला. तर चेन्नईच्या पीयूष चावलाने 2 आणि सॅम करनने एक गडी बाद केला.

चेन्नईविरुद्ध दुसरी 50+ धावांची सलामीची भागीदारी

दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्यात पहिल्या विकेटसाठी 94 धावांची सलामीची भागीदारी झाली. ही चेन्नईविरुद्ध दिल्लीची दुसरी मोठी सलामीची भागीदारी आहे. यापूर्वी 2008 मध्ये वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली होती.

दोन्ही संघ

चेन्नई : मुरली विजय, शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, सॅम करन, रितुराज गायकवाड, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक), रविंद्र जडेजा, जोश हेजलवुड, दीपक चाहर आणि पीयूष चावला.

दिल्ली : पृथ्वी शॉ, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, कगिसो रबाडा, अमित मिश्रा, एनरिच नोर्त्जे आणि आवेश खान.